शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

कठडे नसलेल्या पुलावरून कार कोसळली!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2017 01:19 IST

धामणगाव बढे : गावाजवळील कठडे नसलेल्या इंग्रजकालीन  पुलावरून ४ ऑक्टोबर रोजी सकाळी ७ वाजता कार खाली  कोसळल्याची घटना घडली. यामध्ये कारचालक जखमी झाला. 

ठळक मुद्देचालक जखमी परिसरातील नागरिकांनी वाचविले प्राण  

लोकमत न्यूज नेटवर्कधामणगाव बढे : गावाजवळील कठडे नसलेल्या इंग्रजकालीन  पुलावरून ४ ऑक्टोबर रोजी सकाळी ७ वाजता कार खाली  कोसळल्याची घटना घडली. यामध्ये कारचालक जखमी झाला.        गावाजवळ इंग्रजकालीन पूल असून वाहनांसाठी हा पूल  धोकादायक बनला आहे. कालबाह्य झालेला हा पूल धामणगाव  बढे गावाजवळच असून, या पुलाची अवस्था अत्यंत वाईट  आहे. सदर पुलावर नेहमी वाहनांची वर्दळ असते. या पुलावर  संरक्षण कठडे नसल्याबाबतचे वृत्त वर्तमानपत्रातून अनेक वेळा  प्रकाशित झाले; मात्र संबंधित विभागाने या बाबींकडे दुर्लक्ष  केल्याचे  दिसून आले. धामणगाव बढे येथील शेतकरी राजू  रंगीलदास साखरे (वय २८) आपल्या मोताळा रोडवरील शे ताकडे स्वत:च्या इंडिका गाडीतून जात असताना पुलावर  पडलेल्या खड्डय़ांमुळे एम.एच.0९ ए.बी.७२२0 या इंडिका  गाडीचे स्टेअरींग रॉड तुटल्यामुळे कार नदीपात्रात कोसळली.  त्यामध्ये चालक राजू साखरेसुद्धा गाडीतच अडकलेल्या अवस् थेत पुलाखाली गाडीमध्ये अडकून पडले. पुलाखाली थोडे पाणी  असल्यामुळे कोणत्याही प्रकारची जीवित हानी झाली नाही. कार  खाली कोसळताच आजूबाजूच्या नागरिकांनी आरडाओरड  केली. त्यामुळे असंख्य लोक घटनास्थळी धावत आले. त्यांनी  पुलाखाली उतरून पाण्यामध्ये जावून राजू साखरे यांना गाडीतून  बाहेर काढले व त्वरित रुग्णालयात दाखल केले. यामध्ये राजू  साखरे गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार  सुरू आहेत. या पुलावर कठडे लावण्याची मागणी गावकर्‍यांच्यावतीने  अनेकदा करण्यात आली आहे; मात्र, गावकर्‍यांच्या मागणीची  शासनाने कोणत्याही प्रकारची दखल घेतली नाही. मागील वर्षी  या पुलाच्या पूर्व-पश्‍चिम बाजूला संरक्षण कठडे लावण्यात आले  होते; मात्र पुलावर कोणत्याही प्रकारचे संरक्षण कठडे लावण्यात  आले नाही.