शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
3
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
4
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
5
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
6
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
7
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
8
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
9
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
10
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
11
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
12
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
13
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
14
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
15
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
16
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
17
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
18
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
19
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
20
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
Daily Top 2Weekly Top 5

सेना व राकाँच्या पदाधिका-यांना घेतले ताब्यात

By admin | Updated: January 25, 2016 02:20 IST

शेगाव येथे पालकमंत्र्यांना दाखविणार होते काळे झेंडे

शेगाव (जि. बुलडाणा): रेल्वे उड्डाणपुलाच्या लोकार्पणासाठी शेगाव येथे आलेल्या महसूलमंत्री तथा पालकमंत्री एकनाथ खडसे यांचा रस्ता अडवून त्यांना काळे झेंडे दाखविण्याच्या तयारीत असलेल्या शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकार्‍यांना शेगाव पोलिसांनी २४ जानेवारी रोजी ताब्यात घेतले. शेगाव पोलीस ठाण्याचे निरीक्षक बावीस्कर यांना वेळीच ही माहिती मिळाल्याने त्यांनी संबंधितांना ताब्यात घेतले. शिवसेनेने १८ जानेवारी रोजी आंदोलन करून या पुलाचे औपचारिक उद्घाटन केले होते. त्यानंतर पालकमंत्री एकनाथ खडसे यांच्या हस्ते २४ जानेवारीला या पुलाचे विधिवत उद्घाटन झाले. या घटनाक्रमादरम्यान पालकमंत्र्यांना काळे झेंडे दाखविण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळताच ही कारवाई करण्यात आली. शिवाजी चौकातून पोलिसांनी सेनेचे उपजिल्हाप्रमुख अविनाश दळवी, तालुकाप्रमुख रमेश पाटील, सुधाकर शिंदे, दिनेश शिंदे, गजानन हाडोळे यांना ताब्यात घेत स्थानबद्ध केले. त्यानंतर लगेच अग्रसेन चौकातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा सरचिटणीस अमित जाधव व अन्य पदाधिकारी पालकमंत्र्यांच्या ताफ्याला ह्यगो बॅकह्ण व शासनाच्या निषेधाचे फलक दाखविण्याच्या प्रयत्नात असताना त्यांनाही ताब्यात घेण्यात आले आणि फलक व झेंडे जप्त करण्यात आले. ताब्यात घेण्यात आलेल्यांमध्ये अमित जाधव, शेख ताहीर, जगन्नाथ गायकवाड आदींचा समावेश आहे.