शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

ग्राम पंचायत निवडणुकीचा खर्च सादर करण्यासाठी उमेदवारांची धावपळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2021 11:18 IST

Buldhana News विजयीसह पराभूत उमेदवारांनाही खर्चाची माहिती गाेळा करण्यासाठी धावपळ करावी लागत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : जिल्ह्यातील ४९८ ग्रामपंचायतींसाठी प्रत्यक्ष निवडणूक प्रक्रिया पार पडली असून, निकालही जाहीर करण्यात आले आहेत. आता ९ हजार २२९ उमेदवारांना निवडणुकीचा खर्च महिनाभरात सादर करावा लागणार आहे. त्यामुळे विजयीसह पराभूत उमेदवारांनाही खर्चाची माहिती गाेळा करण्यासाठी धावपळ करावी लागत आहे. जिल्ह्यातील ५२७ ग्रामपंचायतींसाठी निवडणूक प्रक्रिया राबविण्यात आली आहे. २८ ग्रामपंचायती अविराेध झाल्या आहेत, तसेच ४९८ ग्रामपंचायतींसाठी प्रत्यक्ष निवडणूक घेण्यात आली. निवडणुकीसाठी रिंगणातील उमेदवारांना स्वतंत्र बँक खाते उघडण्याचे आदेश निवडणूक आयाेगाने दिले हाेते. शेवटच्या दिवसात उमेदवारांना बँक खाते उघडण्यात अडचणी आल्या हाेत्या. त्यानंतर निवडणूक आयाेगाने शिथिलता दिली हाेती. निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर आता जिल्ह्यातील विजयी उमेदवारांसह पराभूत उमदेवारांना निवडणुकीचा खर्च प्रशासनाला सादर करावा लागणार आहे. हा खर्च सादर न केल्यास उमेदवारांवर अपात्रतेची टांगती तलवार असते. त्यामुळे ग्रामपंचायत निवडणुकीत विजयी उमेदवारांसह पराभूत उमेदवारांनाही आता निवडणुकीचा खर्च सादर करावा लागणार आहे.  त्यासाठी उमेदवारांची धावपळ  सुरू झाली आहे. 

८७० ग्रामपंचायतींचे आरक्षण जाहीर हाेणारग्रामविकास व जलसंधारण विभागाच्या अधिसूचनेनुसार जिल्ह्यातील ८७० ग्रामपंचायतींच्या सरपंचपदांची आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली आहे.   सन २०२० ते २०२५ दरम्यान जिल्ह्यातील सार्वत्रिक निवडणुकीद्वारे गठित होणाऱ्या सरपंचपदांचे आरक्षण २७ जानेवारी २०२१ रोजी तहसीलस्तरावर निवडणूक अधिकारी तथा तहसीलदार हे निश्चित करणार आहेत,   तसेच अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग अंतर्गत स्त्रियांकरिता व खुल्या प्रवर्गांतर्गत स्त्रियांकरिता आरक्षणाची सोडत जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली २९ जानेवारी रोजी स. ११ वाजता जिल्हा नियोजन समिती सभागृह,  बुलडाणा येथे आयोजित करण्यात आली आहे. 

टॅग्स :buldhanaबुलडाणाgram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूक