शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

पेनटाकळी प्रकल्पाचा कालवा फुटला; पिकांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2020 17:13 IST

पेनटाकळी शिवारातील गट नंबर ६५ मध्ये कॅनॉलला मंगळवारी रात्री मोठे भगदाड पडून त्यातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग झाला.

हिवरा आश्रम : प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे पेनटाकळी प्रकल्पाच्या कालव्याला मोठे भगदाड पडून त्यातून विसर्ग झालेल्या पाण्यामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. तात्काळ या कालव्याची दुरुस्ती व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदतीची मागणी होत आहे. कालवा फुटल्याने शेकडाे लीटर पाण्याचा अपव्यय झाला आहे.जिल्ह्यातील मोठा प्रकल्प म्हणून मेहकर तालुक्यातील पेनटाकळी प्रकल्पाची ओळख आहे. सध्या पेनटाकळी प्रकल्प शंभर टक्के पाण्याने भरलेला आहे. या प्रकल्पावर असलेल्या ३८ किलोमीटर कालव्याच्या साह्याने शेतकऱ्यांचे शेती सिंचन होते. प्रकल्प १०० टक्के भरला असल्यामुळे पावसाळ्यात अनेक वेळा पेनटाकळी प्रकल्पाचे वक्रद्वारे उघडण्यात आले होते. यामुळे पैनगंगा नदीकाठच्या १७ गावांतील शेतकऱ्यांचे सोयाबीन पिकासह व इतर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. शासनाच्या उदासीन धोरणामुळे या कालव्याचे काम अजूनही अपूर्ण आहे. या कालव्याची दरवर्षी साफसफाई होत नसल्याने या कालव्यामध्ये मोठी बाभळीची, लिंबाची झाडे व गवतवर्गीय तण वाढले आहे. त्यामुळे कालव्यात पाणी थांबून राहते. याचा फटका हा इतर शेतकऱ्यांना होतो. पेनटाकळी शिवारातील गट नंबर ६५ मध्ये कॅनॉलला मंगळवारी रात्री मोठे भगदाड पडून त्यातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग झाला. यामुळे आत्माराम परशराम अवचार यांचे दोन एकरावरील आंबा, हरभरा, गजानन परसराम अवचार यांचे तीन एकरावरील चिकू, पेरू, ऊस, हरभरा या पिकांचे तर प्रभाकर माधव अवचार यांच्या दीड एकरावर हरभरा या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या पाण्यामुळे पिकाचे नुकसान झाले. त्याचप्रमाणे शेतातील संपूर्ण काळी माती वाहून गेली आहे. या प्रकाराची माहिती मिळताच पेनटाकळी येथील तलाठी ज्ञानेश्वर खरात, कृषी सहाय्यक किशोर इंगळे यांनी घटनास्थळाची पाहणी केली.

शेतात पाणीच पाणीअवचार कुटुंबीयांचे शेतात असलेले स्प्रिंकलर पाइप संच, ठिबक संचाचे नुकसान झाले. शेताला असलेले सिमेंटचे कुंपण त्याचप्रमाणे लोखंडी कुंपण हे पूर्ण पाण्यामुळे वाहून गेले. दरवर्षी या कॅनॉलची साफसफाई होणे गरजेची आहे. पाणी कॅनॉलसमोर जात नसल्याने ठिकठिकाणी सदर कॅनॉल लिकेज होतो. यामुळे कॅनॉलची दुरुस्ती होणे गरजेचे आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाagricultureशेती