शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

अतिक्रमणधारक कुटुंबातील सदस्य होऊ शकतात अपात्र ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2020 04:27 IST

२००६ मध्ये ग्रामपंचायत कायद्यात सुधारणा झाली आहे. ती करताना सरकारी जागेवरील अतिक्रमणाच्या मुद्द्यावर सदस्यांच्या अपात्रतेची तरतूद ...

२००६ मध्ये ग्रामपंचायत कायद्यात सुधारणा झाली आहे. ती करताना सरकारी जागेवरील अतिक्रमणाच्या मुद्द्यावर सदस्यांच्या अपात्रतेची तरतूद असलेल्या कलमाचा समावेश केला गेला आहे. सर्वोच्च न्यायालयाने याच तरतुदीच्या आधारे अपात्र ठरलेल्या महिला सदस्यांनी केलेले अपील फेटाळताना हा निकाल दिला. संबंधित महिला सदस्यांच्या पती व सासऱ्याने सरकारी जमिनीवर अतिक्रमण केले होते. त्याबाबत नागरिकांनी तक्रार केली होती. त्यानुसार महिला सदस्यांना अपात्र ठरविले त्या महिलेने नागपूर खंडपीठात अपील केले. नागपूर खंडपीठाने ही जिल्हाधिकारी व विभागीय आयुक्तांचा निर्णय मान्य केल्याने महिलेने सर्वोच्च न्यायालयात अपील केले. अपात्र महिला सदस्याची अपील फेटाळताना न्यायाधीशांच्या खंडपीठाने नवीन कायद्यातील तरतुदीचा व्यापक अर्थ लावला आहे. त्यामुळे अपात्रता टाळण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या पळवाटा बंद झाल्याने गाव नेत्यांची गोची झाल्याचे पाहायला मिळत आहे. २००६ , मध्ये अपात्रतेची केलेली तरतूद ग्रामपंचायतीबरोबरच नगरपालिका व महानगरपालिकेसाठी एकाच वेळी केली आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निकाल जरी ग्रामपंचायत सदस्याच्या अपात्र संबंधी असला तरी नगरपालिका व महानगरपालिकेतील सदस्यांचाही यात समावेश आहे. अतिक्रमण करणाऱ्या पालिका व महानगरपालिका सदस्य प्रकरणे न्यायालयात गेली तर त्यांचा निकाल या निकाला आधारित होणार हे निश्चित अतिक्रमण करणारा ग्रामपंचायत सदस्य व कुटुंबीयांनी अतिक्रमण केलेल्या जागेत राहणारा सदस्य, त्याचप्रमाणे अतिक्रमण सदस्याच्या काळातील असो वा नसो अतिक्रमण कायम असेल तोपर्यंत ते वारसांनाही लागू राहील. त्याचप्रमाणे महिला सदस्याच्या विवाहपूर्वी झालेली अतिक्रमणही यामध्ये अपात्र ठरणार आहे. त्यामूळे अतिक्रमणधारकांनी अर्ज दाखल करताना आपण अतिक्रमित तर नाहीना ! याची खातर जमा करून घ्यावी लागणार आहे.