शहरं
Join us  
Trending Stories
1
अल्पसंख्याक अन् एससी-एसटींविरुद्ध भेदभाव केल्यास होणार तुरुंगवास; काँग्रेसच्या 'रोहित वेमुला' विधेयकात काय?
2
...नाहीतर भारत-पाकिस्तानमध्ये अण्वस्त्र युद्ध झालं असतं; डोनाल्ड ट्रम्प यांचा स्फोटक दावा
3
Video: प्रतीक्षा संपली, इलॉन मस्क यांची भारतात एन्ट्री! असं आहे Tesla चं मुंबईतील पहिलं शोरुम
4
"कमी बोला, जास्त काम करा"; पक्षातील नेत्यांना एकनाथ शिंदेंच्या कानपिचक्या, म्हणाले...
5
Stock Market Today: २० अंकांनी घसरुन उघडला सेन्सेक्स; फार्मा आणि मेटल क्षेत्रात खरेदी, थोड्याच वेळात का आली तेजी?
6
जगातील सर्वात वृद्ध धावपटू फौजा सिंग यांचे वयाच्या ११४ व्या वर्षी निधन; महामार्गावर झाला होता अपघात
7
क्रूरतेचा कळस! सैनिकाचे पोट फाडून त्यात ठेवला बॉम्ब; नक्षलवादी योगेंद्र कसा पकडला गेला?
8
हुंड्यासाठी छळ केल्याचा आरोप, विवाहितेचे कापले केस; दीड वर्षाच्या चिमुकलीसह महिलेनं संपवलं आयुष्य
9
हे तर भयंकरच! मुंबई लोकल की, मृत्यूचे कारण?; 8 वर्षात 8 हजार 273 प्रवाशांचा मृत्यू
10
इराणची भीती संपेना! इस्राइलवर आता विश्वासच नाही; पुन्हा करतायत युद्धाची तयारी
11
पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला पाकिस्तानी नेत्यांनी घडवून आणला होता, अहवालात मोठा दावा
12
पडघम वाजले; मात्र प्रत्यक्ष बंधुऐक्य दूरच; उद्धव ठाकरेंना हवीय इंडिया आघाडीची बैठक...
13
ओला इलेक्ट्रीक स्कूटरवर महाराष्ट्रात गंडांतर; ३८५ शोरूम पडले बंद
14
म्हाडाने घर विक्रीसाठी प्रतिनिधी नेमलेले नाहीत; ५,२८५ घरांसाठी नोंदणी सुरू; १३ ऑगस्टपर्यंत करा अर्ज 
15
आजचे राशीभविष्य, १५ जुलै २०२५: नकारात्मक वृत्ती दूर ठेवल्याने आर्थिक लाभ होईल
16
दीड महिना झाला... भोलानाथ, सांग पाऊस कधी येणार! शहर, उपनगरात हजेरी; मात्र मोठ्या पावसाची प्रतीक्षा
17
शिवसेना, धनुष्यबाण कुणाला मिळणार? आता फैसला महापालिका निवडणुकीपूर्वी 
18
संपादकीय: रयतेच्या राजाचा वारसा! आपल्याला तरी समजला आहे का?
19
कुचकामी कायदा, बनावट प्रमाणपत्रे आणि खोटे दिव्यांग; पूजा खेडकर एकटी नाही...
20
बोइंग विमानांची इंधन लॉकिंग प्रणाली तपासा; अहमदाबाद विमान अपघाताच्या प्राथमिक अहवालानंतर डीजीसीएची सूचना

सीएए लागू झाल्यास देशाची अखंडता धोक्यात - मुफ्ती अशफाक कासमानी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2020 17:58 IST

संविधान बचाव समिती खामगांवच्यावतीने शनिवारी स्थानिक भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर परिषद मैदानावर ‘जनआक्रोश प्रदर्शन’ आयोजित करण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: नागरिकता संशोधन कायदा केंद्र शासनाने बहुमताच्या जोरावर संसदेत पारीत केला. हा कायदा संविधानाचे उल्लंघन करणारा असून सदर कायदा देशात लागू केल्यास देशाची एकता आणि अखंडता धोक्यात येऊ शकते, असे  प्रतिपादन प्रमुख मार्गदर्शक मुफ्ती अशफाक कासमानी (अकोला) यांनी येथे केले.संविधान बचाव समिती खामगांवच्यावतीने शनिवारी स्थानिक भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर परिषद मैदानावर ‘जनआक्रोश प्रदर्शन’ आयोजित करण्यात आले. या कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून मुफ्ती अशफाक कासमानी बोलत होते. यावेळी मुफ्ती अशफाक म्हणाले की, भारत देश सर्वधर्म समभाव मध्ये विश्वास ठेवतो. इथे जाती, धर्माच्या आधारावर कोणालाही नागरीकता देणे किंवा काढणे भारतीय संविधानाचे उल्लंघन करण्या सारखे आहे. देशात एनआरसी, एनपीआर लागू झाल्यास सरकारला कागदपत्र देऊ नका, असे आवाहनही त्यांनी शेवटी केले.मंचावर मौलाना युनूस नदवी, मौलाना अनिस अशरफी, हाफिज अजमतउल्ला खान, सीपीएमचे सी.ए. जाधव, माजी आमदार दिलीपकुमार सानंदा, अ‍ॅड. मनदीपसिंह चव्हाण, संभाजी ब्रिगेडचे रवि महाले, मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीचे जितेंद्र चोपडे, काँग्रेस सेवादल जिल्हा अध्यक्ष तेजेंद्रसिंह चौहान, वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश अध्यक्ष अशोक सोनोने, काँग्रेस नेते ज्ञानेश्वरदादा पाटील, हाफिज सैय्यद सरफराज खान,  मौलाना सोहेल निजामी, आलीम सईद साहेब, मौसिकउल्ला खान साहेब, मौलाना युनूस साहेब, मौलाना अजमतउल्ला खान, अ‍ॅड. प्रशांत दाभाडे, मौलाना सिद्दीक, मौलवी खलील साहेब, मौलाना शकिल साहेब आदी उपस्थित होते.या ‘जनआक्रोश प्रदर्शन’ मध्ये सामिल होण्यासाठी शहरातील अनेक भागातून मुस्लिम समाजाचे जत्थे मैदानावर पोहोचताना दिसत होते. यावेळी पोलिसांनी तगडा बंदोबस्त ठेवला होता. कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी आपले विचार व्यक्त केले.प्रास्ताविक प्रा. उमर अहमद खान यांनी केले.  संचालन शरीफउल हसन यांनी केले. आभार  डॉ. वकार उल हक खान यांनी मानले. कार्यक्रमाचा समारोप मौलवी युनुस यांनी केलेल्या प्रार्थनेनंतर झाला. कार्यक्रमाला हजारोच्या संख्येने नागरीक उपस्थित होते. यावेळी अशोक सोनोने यांनी उपस्थित मान्यवरांना संविधानाची पुस्तक भेट केली. कार्यक्रम पश्चात संविधान बचाव समितीचे प्रतिनिधी मंडलच्या सदस्यांनी उपविभागीय महसूल अधिकारी कार्यालयात निवेदन दिले. निवेदन देते वेळी समय मौलावी युनूस, मौलाना अनिस, हाफिज अजमतउल्ला खान, शोहरत खान, अजमल खान, डॉ. नवीद देशमुख, शेख अनिस, बुढन चौधरी, शेख रहेमान, नूरमोहम्मद शाह, मोहम्मद आरीफ पहेलवान, अब्दुल रशिद, गुलजमा शाह, सैय्यद वसीम, हाजी अलीमोद्दीन, शेख फारूक, मोहम्मद नईम आदि उपस्थित होते.

मुस्लिम समाजाने प्रतिष्ठान ठेवली बंदसंविधान बचाव समिती द्वारा आयोजित ‘जनआक्रोश प्रदर्शन’ मध्ये सहभागी होण्यासाठी मुस्लिम समाजाच्या लोकांनी  आपली प्रतिष्ठान बंद ठेवली.  शहराच्या मुस्लिम बाहुल्य असलेल्या बर्डे प्लॉट, मस्तान चौक, बोरीपूरा, हरीफैल, शंकर नगर तथा बसस्टँड आदी परिसरातील मुस्लिम समाजाने आपली प्रतिष्ठान बंद केली होती.