शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

मुद्रा कर्ज वाटपात नियमांना बगल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2020 11:28 IST

यामध्ये प्रामुख्याने राष्ट्रीयकृत बँकांचा समावेश असल्याचे चौकशी अहवालानंतर समोर आले.

- नीलेश जोशी लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: नवीन रोजगार निर्मितीसाठी नव उद्योजकांना मुद्रा कर्ज योजनेतंर्गत कर्ज वाटप करताना बँकांनी नियमांना बगल दिल्याचे स्पष्ट झाले असून जिल्ह्यातील दहा बँकांनी मुद्रा कर्ज पडताळणी समितीलाच सहकार्य केले नसल्याचे यासंदर्भातील अंतिम अहवालात स्पष्ट झाले आहे. यामध्ये प्रामुख्याने राष्ट्रीयकृत बँकांचा समावेश असल्याचे चौकशी अहवालानंतर समोर आले.हा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना मध्यंतरी सादर करण्यात आला आहे. ज्या काही मोजक्या सहा बँकांनी त्यांच्याकडील माहिती स्थानिक निधी लेखा शाखेचे सहाय्यक संचालक दिनकर जाधव यांच्या अध्यक्षतेखाली नियुक्त करण्यात आलेल्या पाच सदस्यीय समितीला सादर केली होती, त्यातही अनेक त्रुट्या आढळून आल्या आहेत. त्यामुळे योजनेच्या मुळ उद्देशालाच यात हरताळ फासल्या गेल्याचे दिसून येत आहे.दुसरीकडे कर्ज वाटपासंदर्भातील बँक निहाय स्थायी आदेश वेगवेगळे असल्याने मुद्रा कर्ज वाटप करताना त्यामध्ये किमान एक समानता आणण्यासाठी शासनस्तरावरच निर्णय होणे अपेक्षीत आहे. नोव्हेंबर २०१९ ते जून २०२० या कालावधीतील हे प्रकरण आहे.सलीम खा बनेखा पठाण नामक व्यक्तीने माहिती अधिकारात जिल्ह्यात मुद्रा कर्ज योजनेतंर्गत किती जणांना लाभ देण्यात आला, याची माहिती मागवली होती. त्याला प्रतिसाद न मिळाल्याने या प्रकरणात अल्पसंख्यांक आयोगाकडून थेट जिल्हाधिकाऱ्यांना नोव्हेंबर २०१९ मध्ये पत्र पाठविण्यात आले होते.तीन महिने पाठपुरावा करून तथा थेट बँकांच्या दारात जावून जिल्ह्यातील मुद्रा कर्ज वाटप पडताळणी समितीने करण्याचा प्रयत्न केला तसेत १७ बँकांना अर्धसमजपत्रेही दिली. मात्र बँकांनी असहकार धोरण ठेवल्याने समितीने त्यांचा अंतिम अहवाल सादर केला.गरज नसतानाही घेतले तारणमुद्रा कर्ज योजनेतंर्गत कोणतेही तारण किंवा जामिनदाराशिवाय कर्जपुरवठा करणे आवश्यक असताना तपासण्यात आलेल्या प्रकरणामध्ये जामीन, हमी घेतल्या गेली. प्रस्ताव तथा कर्ज प्रकरणासोबत कोरे धनादेश, मालमत्ता गहाण खताचीही कागदपत्रेही समितीच्या पाहणीत समोर आली. कर्जप्रकरणासाठी आवक, जावक नोदींही न ठेवल्या गेल्याने कोणत्या प्रकरणाला किती विलंब लागला, नामंजूर प्रकरणे किती याचा ताळमेळच बसत नसल्याचे स्पष्ट होत आहे. सरळ सरळ कर्ज परत करण्याची हमी आहे, अशांचेच प्रस्ताव स्वीकारण्यात येवून ते मंजूर करण्यात आल्याचे समितीच्या अहवालात स्पष्ट केले गेले आहे.

योजनेच्या उद्देशालाच फाटानव उद्योजक आणि नविन रोजगार निर्मिती या योजनेच्या मुळ उद्देशाला मुद्रा कर्जवाटप करताना १७ बँकांनी फाटा दिल्याचे अहवालावरून स्पष्ट झाले आहे. आधीपासूनच उद्योग व्यवसाय सुरू असलेल्यांनाच कर्ज दिल्या गेल्याचे अहवालत नमूद आहे. नॉन बँकिंग फायनान्शियल कंपनीकडूनच जिल्ह्यात अधिक कर्ज वाटप करण्यात आले असल्याचे स्पष्ट होत आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाbankबँक