शहरं
Join us  
Trending Stories
1
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
2
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
3
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
4
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
5
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
6
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
7
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
8
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
9
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
10
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
11
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
12
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
13
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
14
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
15
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
16
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
17
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
18
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
19
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
20
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
Daily Top 2Weekly Top 5

रहदारीमुळे बायपासचा प्रश्न ऐरणीवर

By admin | Updated: October 29, 2014 23:01 IST

मलकापूर येथे आधीच अरुंद रस्ते, त्यात जडवाहतुकीमुळे वाहतुकीची कोंडी नित्याचीच.

हनुमान जगताप / मलकापूरविदर्भाचे प्रवेशद्वार मानल्या जाणार्‍या मलकापूर नगरीत छोट्या व जडवाहनांमुळे रहदारी प्रचंड वाढली आहे. अशात जनसामान्य नागरिकांमध्ये बैचेनी वाढली असून, तालुक्यातील घिर्णी, दाताळा या बायपास मार्गाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. राज्यातील नवीन सरकार त्याकडे लक्ष देईल, अशी अपेक्षा शहरात व्यक्त होत आहे.मलकापूर येथील महत्त्वाच्या मानल्या जाणार्‍या तहसील चौक, हनुमान चौक, बसस्थानक चौक या ठिकाणी दिवसभरात किमान दहा वेळा चक्काजाम होतो. आठवडी बाजार आणि सणासुदीच्या काळात तर अक्षरशा वाहनांची रेलचेल असल्याने चक्काजाम दिवसभरात अनेकदा होतो. शहरात नांदुरा, मुक्ताईनगर व बुलडाणा, बोदवड या चार ठिकाणावरून वाहनांची ये-जा सुरू असते. त्यात बाहेरून येणारी वाहने अन शहरातील वाहने यांची संख्या पाहता, प्रत्येक चौकात वाहनांची अन वाहनांचीच भाऊगर्दी निदर्शनास येते. त्यामुळे शहरातील मुख्य चौकात दिवसातून अनेकदा चक्काजामचा अनुभव नागरिक घेतात, हे वास्तव आहे. यात प्रामुख्याने जड वाहने, जी मुंबई, नागपूर, जालना, औरंगाबाद या ठिकाणावरून ये-जा करतात, त्यांचाही मोठा सहभाग आहे. जर मलकापूर तालुक्यातील बेलाड-घिर्णी व दाताळा या दरम्यानच्या बायपास रस्त्याची निर्मिती झाल्यास शहरातील रहदारीवरचा ताण मोठय़ा प्रमाणात कमी होऊ शकतो. शहरात पोलिसांची ट्राफिक यंत्रणा काम करते, हे जरी खरं असलं तरी वाहनांची भाऊगर्दी रोखण्यासाठी मलकापूर तालुक्यात घिर्णी बायपास रस्त्याचा प्रश्न ऐरणीवर आला असून, राज्यातील नवीन सरकारने तातडीने बायपासचा प्रश्न मार्गी लावून शहरातील वाहतुकीचा कोंडी सोडवावी, अशीे शहरातील जनसामान्यांची शहरातील सुज्ञ लोकप्रतिनिधींकडून अपेक्षा व्यक्त होत आहे.