शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

घटस्फोटाची धमकी मिळाल्याने बाळ विकत घेण्याचा सौदा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2017 14:30 IST

अनिल गवई खामगाव : पतीकडून घटस्फोटाची धमकी मिळाल्यानेच दिल्लीस्थित मल्लिका खानने बाळ विकत घेण्याचा सौदा केला. यातूनच स्थानिक सामान्य रुग्णालयातून नवजात बालकाचे अपहरण करण्यात आले असल्याचे उघडकीस आले आहे. यामध्ये सुंदर व गुटगुटीत बाळासाठी मल्लिकाचा आग्रह असल्यानेच सुमैय्या परवीनचे बाळ चोरुन नेण्यात आले.स्थानिक सामान्य रुग्णालयातून २७ सप्टेंबर रोजी पहाटे ३.३० वाजताच्या ...

ठळक मुद्देसुंदर व गुटगुटीत बाळासाठी होता मल्लिकाचा आग्रह

अनिल गवई 

खामगाव : पतीकडून घटस्फोटाची धमकी मिळाल्यानेच दिल्लीस्थित मल्लिका खानने बाळ विकत घेण्याचा सौदा केला. यातूनच स्थानिक सामान्य रुग्णालयातून नवजात बालकाचे अपहरण करण्यात आले असल्याचे उघडकीस आले आहे. यामध्ये सुंदर व गुटगुटीत बाळासाठी मल्लिकाचा आग्रह असल्यानेच सुमैय्या परवीनचे बाळ चोरुन नेण्यात आले.

स्थानिक सामान्य रुग्णालयातून २७ सप्टेंबर रोजी पहाटे ३.३० वाजताच्या सुमारास एका बुरखाधारी महिलेने नांदुरा तालुक्यातील वडनेर भोलजी येथील सुमैय्या परवीन या महिलेचे नवजात बाळ पळवून नेले होते. ही बाब उघडकीस आल्यानंतर एकच खळबळ उडाली. या घटनेचा तपास पोलिसांनी सुरु केल्यानंतर तिसºया दिवशी सिल्लोड येथून महिलेसह दोघांना ताब्यात घेण्यात आले होते.त्यांची कसून चौकशी केल्यानंतर मिळालेल्या माहितीच्या आधारे तब्बल पाचव्या दिवशी रविवारी अपहृत बाळ दिल्ली येथून ताब्यात घेण्यात आले. सदर बाळाचा अपहरणकर्त्यांनी ३५ लाखात विकण्याचा सौदा केला होता. हे बाळ दिल्ली येथील रहिवाशी मल्लिका हिंमत खान या महिलेने विकत घेतले होते. याबाबत केलेल्या चौकशीमध्ये मल्लिका हिला मूलबाळ होत नसल्याने तिचा दुबईस्थित पती हिंमत खान याने घटस्फोटाची धमकी दिली होती. त्यामुळे तिने बाळ खरेदी करण्याचे ठरविले. यासाठी रेबिका पिल्ले (प्रीतीची आई) रा. खामगाव या महिलेशीे बाळ खरेदी करण्याचा सौदा केला. त्यानुसार रेबिका हिने स्थानिक सामान्य रुग्णालयातून सुमैय्याचे बाळ पळवून ते मल्लिकाला विकले. तर आरोपी प्रीती हिने मोहसीन हुसैन खान याच्याशी वर्षभराच्या प्रेमसंबंधातून दुसरे लग्न केलेले असून तिचा पतीचीही या प्रकरणात साथ मिळाली.  एखाद्या सिनेमाला साजेशा या अपहरण नाट्याची पटकथा ही रेबिकाने रचली असल्याचे दिसून येते.

 

सुंदर बाळासाठी आग्रह

 पतीला संशय येवू नये व आपलेच बाळ वाटावे यासाठी मल्लिकाने सुंदर व गुटगुटीत बाळच पाहिजे अशी अट घातली होती. त्यामुळे रेबिकाने पहिल्यांदा दाखविलेले अन्य महिलेचे बाळ मल्लिकाने नापंसत केले व सुमैय्याचे बाळ पसंत करुन ते आणण्यास  सांगितले. त्यावरुन रेबिकाने तिची मुलगी प्रीतीमार्फत पहाटेच्या वेळी डाव साधला.

 

बबिताने फिरविला शब्द 

मल्लिकाला बाळ देण्यासाठी रेबिकाने शहरातील (काल्पनिक नाव) बबिता नामक महिलेशी सौदा केला होता. तिला प्रसुतीसाठी सामान्य रुग्णालयात भरतीही केले. मात्र तीन मुलीनंतर चवथ्या वेळेस मुलगा झाल्याने तिने शब्द फिरविला. त्यामुळे रेबिकाने दुसरे बाळ शोधले.

 

दुचाकीवरुन लागला सुगावा

रेबिकाला सामान्य रुग्णालयात पोहचविण्यासाठी खामगाव येथील एमएच २८ एन ९८१० या दुचाकीचा वापर झाला होता. तसेच बाळ पळविणाºया चारचाकी वाहनाचा चालक राजे जहाँगीर खान हा मस्तान चौकात मुक्कामी होता. सदर स्प्लेंडर दुचाकी जप्त करण्यात आल्यानंतर या प्रकरणाचा सुगावा पोलिसांना लागला असल्याची माहिती आहे.

 मुस्लीम समाजाची सामंजस्याची भूमिका

सामान्य रुग्णालयातून बाळ चोरी गेल्यानंतर २८ सप्टेंबर रोजी मोर्चाचे नियोजन करण्यात आले होते. मात्र पोलिसांनी तत्पूर्वीच या घटनेच्या तपासाला गती दिली. महत्वपूर्ण धागे दोरेही पोलिसांच्या हाती लागले. त्यामुळे मुस्लीम बांधवांनी सामंजस्याची भूमिका घेत मोर्चा रद्द केला.