शहरं
Join us  
Trending Stories
1
Monorail Accident: ट्रॅक सोडला, मधोमध अडकली! मोनोरेलचा वडाळ्याजवळ अपघात, ट्रायल रनवेळी घडली घटना
2
"लाडली, लक्ष्मी, बहीण..."; निवडणूक वर्षात महिलांसाठी रोख रकमेचा महापूर; सरकारं घाट्यात! आरबीआयनं दिलाय मोठा इशारा 
3
मिर्झापूरजवळ भीषण अपघात; रेल्वे रुळ ओलांडताना 'कालका मेल'खाली चिरडून ६ भाविकांचा मृत्यू
4
Sonam Raghuvanshi : ना कागद, ना कापड... राजा रघुवंशीच्या हत्येनंतर धूर्त सोनमने कसे पुसले हत्यारावरचे रक्ताचे डाग?
5
SBI ची नोकरी सोडून सुरू केली शेती, आज ७ कोटींच्या हेलिकॉप्टरचा मालक! ५ एकरापासून सुरुवात
6
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
7
"तुम्हाला अपेक्षित असलेलं उत्तर मिळू शकत नाही"; मतदार याद्यांच्या वादावरून CM फडणवीसांचे राज ठाकरेंना प्रत्युत्तर
8
काँग्रेससाठी टीव्ही डिबेट करणारी भाव्या निघाली लष्करी अधिकारी; 'डबल रोल' करणारी कोण आहे ही...
9
मानव-बिबट्या संघर्षावर सरकारचे निर्णायक पाऊल; मनुष्यहानी रोखायला प्राधान्य, ११ कोटी मंजूर
10
'संबंध ठेवण्यापूर्वी कुंडली जुळवायची होती!'; पोलिस अधिकाऱ्यांच्या हायप्रोफाईल प्रकरणावर सुप्रीम कोर्टाची उपरोधिक टिप्पणी
11
"होनराव म्हणजे तू मराठी ना? तुझी बायको भैयिणी...", कमेंट वाचून मराठी अभिनेत्याचा संताप, म्हणाला...
12
जगातील टेक उद्योगात उलथापालथ: ॲमेझॉन, गूगल नंतर आता 'या' कंपनीच्या हजारो कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
13
"माझ्यापेक्षा मोठा गुंड नाही"; भाजपाच्या आजी-माजी खासदारांमध्येच जुंपली, एकमेकांना भिडले अन्...
14
Zohrab Mamdani: न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनले जोहरान ममदानी, ट्रम्प यांच्या धमक्यांनंतरही मोठा विजय!
15
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
16
“स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीमध्ये समन्वय साधून अंतिम निर्णय”: सुनील तटकरे
17
Vijay Mallya : 'जप्त केलेल्या मालमत्ता आणि थकीत कर्जाची माहिती द्या,' विजय माल्ल्यानं न्यायालयात काय म्हटलं?
18
Astrology: नशिबात नसलेल्या गोष्टीही स्वामीकृपेने मिळवता येतात का? ज्योतिष शास्त्र काय सांगते? पाहू
19
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?

बुलडाणा जिल्ह्यात नाफेडकडून दोन लाख क्विंटल धान्याची खरेदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2018 01:29 IST

शेगाव:  खरीप हंगामात केंद्र शासनाने निश्‍चित केलेल्या हमीभावाने तेलबिया व कडधान्याची खरेदी प्रक्रिया पार पडली असून, बुलडाणा जिल्ह्यातील १३ खरेदी केंद्रांवर २ लाख ८ हजार ७0२ क्विंटल मालाची खरेदी करण्यात आली आहे. यामध्ये मूग खरेदीत शेगाव केंद्र अव्वल राहिले असून, उडीद खरेदीत दुसर्‍या क्रमांकावर आहे.  

ठळक मुद्देमूग खरेदीत शेगाव केंद्र अव्वल तर उडीद खरेदीत द्वितीय

लोकमत न्यूज नेटवर्कशेगाव:  खरीप हंगामात केंद्र शासनाने निश्‍चित केलेल्या हमीभावाने तेलबिया व कडधान्याची खरेदी प्रक्रिया पार पडली असून, बुलडाणा जिल्ह्यातील १३ खरेदी केंद्रांवर २ लाख ८ हजार ७0२ क्विंटल मालाची खरेदी करण्यात आली आहे. यामध्ये मूग खरेदीत शेगाव केंद्र अव्वल राहिले असून, उडीद खरेदीत दुसर्‍या क्रमांकावर आहे.  राज्य शासनाच्या सहकार पणन व वस्त्रोद्योग विभागाने सूचित केल्याप्रमाणे हंगाम २0१७-१८  मध्ये नाफेडच्या शेगाव, चिखली, मेहकर, दे. राजा, संग्रामपूर, बुलडाणा, सिं. राजा, मोताळा, मलकापूर, खामगाव, लोणार, नांदुरा, जळगाव जामोद या खरेदी केंद्रावर शेतकर्‍यांनी तेलबिया व कडधान्य विक्रीसाठी आणले होते. यामध्ये शेगाव केंद्र- उडीद ३२ हजार ७६९.७५ क्विंटल, चिखली- ४६ हजार ९४२.७0, मेहकर-१९ हजार ५६.0५, दे. राजा- एक हजार ८११.७८, संग्रामपूर- १ हजार ३४७.१७, बुलडाणा- ८ हजार ७८८.३६, सिं. राजा- ५ हजार ३९0.७४, मोताळा-१ हजार ४५२.७0, मलकापूर-२ हजार ८१0.५0, खामगाव-२४ हजार २४९.५0, लोणार-४ हजार ७६0.२१, नांदुरा- ३ हजार ३२२.६0, जळगाव जामोद-९८१.१६ असा एकूण  १ लाख ५२ हजार ९६९.६२ क्विंटल उडीद खरेदी करण्यात आला. मूग - शेगाव-५ हजार ४६0.९५  क्विंटल, चिखली- २ हजार ६.३३, मेहकर-१ हजार ५९0.१८, दे. राजा- ५५८.५0, संग्रामपूर- ३१0.३५, बुलडाणा- १४५.६८, सि. राजा- ७३८.३३, मोताळा- ६७७.४0, मलकापूर- ११ क्विंटल, खामगाव- १ हजार ३१४.३९, लोणार- २ हजार १९३.३५, नांदुरा- ४५७, जळगाव जामोद- ५६६.२0 अशी एकूण १६ हजार ७९.६६ क्विंटल मुगाची खरेदी करण्यात आली. सोयाबीन शेगाव केंद्र, ३ हजार ८७३.३0 क्विंटल, चिखली- ६0२.२२, मेहकर- ७८६.0६, दे. राजा-१ हजार १७0.७२, संग्रामपूर- एक हजार ५0 , बुलडाणा- ६४.८१, सि. राजा- ३७२.११, मोताळा ८११.७0, मलकापूर- ५ हजार ७४७.३0, खामगाव- ८ हजार ९५३.३४, लोणार- ५१८.७२, नांदुरा- १ हजार ४५५.५0, जळगाव जामोद- ७९९.३९ असा एकूण २६ हजार २0५.१७ क्विंटल सोयाबीन खरेदी करण्यात आले आहे. मका खरेदी केंद्र-शेगाव केंद्र- १0७.४0 क्विंटल, संग्रामपूर-२ हजार १३६.५0, मोताळा- २७७.५0, मलकापूर- ६ हजार ६८, नांदुरा- ३९६, जळगाव जामोद- २ हजार ६५७ क्विंटल असा एकूण ११ हजार ६४२.४0 क्विंटल मका खरेदी करण्यात आला आहे. हंगाम २0१७-१८ मध्ये केंद्र शासनाने निश्‍चित केलेल्या हमी भावाने मूग- ५ हजार ५७५ रुपये, उडीद- ५४00 रु. प्रति क्विंटलप्रमाणे व सोयाबीन- ३ हजार ५0 रु प्रति क्विंटलप्रमाणे दि. महाराष्ट्र स्टेट  को-ऑपरेटिव्ह  मार्केटिंग फेडरेशन लिमिटेड अंतर्गत नाफेडच्या वतीने १३ तालुक्यातील तेलबिया व कडधान्य हा शेतमाल खरेदी केला असल्याचे जिल्हा मार्केटिंग अधिकारी  पी. एस. शिंगणे  यांनी सांगितले.

ऑनलाइन प्रक्रियेने काम सोपेया करिता ३ ऑक्टोबर २0१७ पासून माल खरेदीसाठी ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया राबविण्यात आली. ३१ डिसेंबर २0१७ पर्यंत जिल्ह्यात २ लाख ८ हजार ७0२ क्विंटल तेलबिया व कडधान्याची खरेदी झाली. 

शेगावात आणखी शेतमाल पडून अद्यापही शेगाव नाफेड गोदामात १२ हजार क्विंटल उडीद, ३ हजार क्विंटल मूग, ४.५0 क्विंटल साोयाबीनचा माल पडून असल्याचे खरेदी-विक्री संघाचे व्यवस्थापक ताठे यांनी सांगितले.

टॅग्स :buldhanaबुलडाणा