शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

शंभरच्या नोटांद्वारे सोयाबीन खरेदी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2016 02:50 IST

अडचणीपोटी शेतक-यांचा नाईलाज; व्यापा-यांकडून शेतकर्‍यांची लूट.

खामगाव, दि. १३- ऐन सोयाबीन विक्रीच्या काळात पाचशे व हजार रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याच्या निर्णयाचा शेतकर्‍यांना फटका बसत आहे. जिल्ह्यातील शेतकर्‍यांना गरजेपोटी सोयाबीन विकावे लागत असून, व्यापार्‍यांकडून शंभरच्या नोटांद्वारे प्रतिक्विंटल ४00 ते ५00 रुपये दराने कमी भाव मिळत आहे.कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकर्‍यांनी सोयाबीन विक्रीला आणले असता शेतकर्‍यांना शंभराच्या पूर्ण नोटा मिळत नाही. जिल्ह्यातील सर्वच बाजार समितीत सद्यस्थिती शेतमाल विक्रीसाठी शेतकर्‍यांना शंभराच्या नोटांसाठी थांबावे लागत आहे. त्यामुळे चेकद्वारे शेतकर्‍यांना सोयाबीन विक्रीची रक्कम अदा केली जात असल्याचे चित्र आहे. नेमके याच संधीचा फायदा घेत ग्रामीण भागात व्यापार्‍यांनी सोयाबीन खरेदीसाठी मोर्चा वळविला आहे. शेतकर्‍यांना दैनंदिन खर्चाकरिता तसेच इतर रब्बी हंगामाच्या पेरणीसाठी गहू, हरभरा, खते खरेदीसाठी पैशाची आवश्यकता आहे. सोयाबीन विक्रीशिवाय शेतकर्‍यांना पर्याय नाही. तेव्हा व्यापार्‍यांनी थेट गावात सोयाबीन खरेदी सुरु केली. शंभरच्या नोटा देऊन सोयाबीन खरेदी होत असताना क्विंटलमागे ४00 ते ५00 रुपये कमी दर व्यापार्‍यांकडून देण्यात येत आहे. एकप्रकारे व्यापार्‍यांकडून शेतकर्‍यांची लूट सुरु आहे. दुसरीकडे शेतकर्‍यांजवळ पर्याय नसल्याने २000 ते २२00 रुपये प्रतिक्विंटल दराने सोयाबीन विक्री करावी लागत आहे.