शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

नाफेडमार्फत शेतकऱ्यांच्या मालास नापसंती तर व्यापाऱ्यांकडून निकृष्ट उडीद खरेदी

By admin | Updated: December 28, 2016 23:29 IST

येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शासकीय हमीभाव योजनेअंतर्गत नाफेडमार्फत शेतकऱ्यांच्या शेतमालास नापसंती दर्शविण्यात येते.

 ऑनलाइन लोकमत
शेगाव, (जि.बुलडाणा), दि. 28 -  येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शासकीय हमीभाव योजनेअंतर्गत नाफेडमार्फत शेतकऱ्यांच्या शेतमालास नापसंती दर्शविण्यात येते. मात्र ज्येष्ठ संचालक, व्यापारी प्रतिनिधी यांचे मर्जीतील व्यापाऱ्यांकडून निकृष्ट प्रतीचा उडीद, खरेदी करण्यात आल्याचे उघड झाले असून शेतकºयांच्या तक्रारीनंतर सदर उडीद नाकारण्यात आला.
शासकीय हमीभाव योजनेअंतर्गत नाफेडमार्फत दि महाराष्ट्र स्टेट को-आॅप. मार्केटींग फेडरेशन व्दारा उडीद या शेतमालाची शासकीय भावाप्रमाणे खरेदी सुरू आहे. याठिकाणी खरेदी-विक्री संघ शेगावचे अस्थायी लेखापाल प्रदीप साहेबराव ताथोड तर जिल्हा मार्केटींगचे प्रतिनिधी व्ही.एम. क्यावल हे दोघे शासकीय खरेदी करीत आहेत. या दोघांचे काही व्यापाºयांसोबत आर्थिक संबंध असल्याचा संशय शेतकºयांना होता. त्यामुळे शेतकऱ्यांनी नाफेड केंद्रावरील व्यवहारावर नजर ठेवली असता व्यापाºयांचा निकृष्ट दर्जाचा २५० क्विंटल उडिद ६ हजार २०० रूपये भावाने २८ डिसेंबर रोजी घेऊन त्याची एमएच२८-एबी८१२२ या गरीब रथामध्ये परस्पर भरून विल्लेवाट लावण्यात येत असल्याचे काही शेतकºयांच्या नजरेस आले.  याबाबतची माहिती शेतकºयांनी बाजार समिती सचिव व सभापती यांना दिली असता दोघांनी ही घटनास्थळाचा पंचनामा करून नाफेडने खरेदी केलेला निकृष्ट दर्जाचा उडीद जिल्हा मार्केटींग प्रतिनिधीस रद्द करण्यास भाग पाडले. 
याबाबत खरेदी विक्री संघाचे अस्थाई कर्मचारी प्रदीप ताथोड यांना विचारणा केली असता त्यांनी उडवाउडवीचे उत्तरे दिली. प्रदीप ताथोड व व्ही.एम. क्यावल हे व्यापाºयांकडून ३०० रूपये प्रति क्विंटल जास्त घेत असल्याचे नाव न सांगण्याचे अटीवर एका व्यापाºयाने प्रतिनिधीस माहिती दिली. नाफेडतर्फे शासकीय हमी भावाने खरेदी होत असल्याने शेतकºयांनी आपल्याकडील उडीद बाजार समितीमध्ये आणला असता खरेदी विक्री संघाचे प्रतिनिधी प्रदीप ताथोड व जिल्हा मार्केटींगचे व्ही.एम. क्यावल हे शेतकऱ्यांच्या माल नापास करून फक्त व्यापाºयांकडून माल खरेदी करीत असल्याच्या शेतकºयांच्या तक्रारी आहेत. तर नाईलाजाने शेतकरी आपला शेतमाल व्यापाऱ्यांना कमी किंमतीत विकतात. मात्र नाफेडने नापसंद केलेला तोच माल व्यापाºयांकडून खरेदी करण्यात येतो. यासाठी ज्येष्ठ संचालक, व्यापारी प्रतिनिधी, प्रयत्नरत असतात. आतापर्यंत शेकडो टन उडीद नाफेडकडून खरेदी करण्यात येवून शेतकºयांच्या फायद्याकरीता शासनाचे उपक्रमास खरेदी विक्री संघ प्रतिनिधी प्रदीप ताथोड व जिल्हा मार्केटींग प्रतिनिधी व्ही.एम. क्यावल हे दोघे स्वत:चे स्वार्थापोटी हरताळ फासण्याचा प्रयत्न करीत आहेत. या दोघांवर कोणती कारवाई होते याकडे शेतकºयांचे लक्ष लागून आहे. (प्रतिनिधी)