शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

नवरात्र उत्सवात मेहकर आगाराने केल्या बसेस बंद!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2017 00:00 IST

सिंदखेडराजा : मेहकर आगाराने साखरखेर्डा रोडवरील अनेक एसटी बसच्या फेर्‍या नवरात्र उत्सवात बंद केल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत. एसटी बस आगाराचा हा नियोजनशून्य कारभार सुरु असून, बंद बसेस तत्काळ सुरु कराव्यात, अशी मागणी प्रवाशी संघटनेने केली आहे.साखरखेर्डा हे गाव आडवळणी असल्याने या गावावरुन एकही बस लांब पल्ल्याची नाही. २0 हजार लोकसंख्या असलेल्या गावात दोन मोठे धार्मिक स्थळे आहेत. तसेच साखरखेर्डा ते सिंदखेडराजाचे अंतर ५0 किमी आहे.

ठळक मुद्देप्रवासी झाले त्रस्त एसटी बस आगाराचा नियोजनशून्य कारभार 

लोकमत न्यूज नेटवर्कसिंदखेडराजा : मेहकर आगाराने साखरखेर्डा रोडवरील अनेक एसटी बसच्या फेर्‍या नवरात्र उत्सवात बंद केल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत. एसटी बस आगाराचा हा नियोजनशून्य कारभार सुरु असून, बंद बसेस तत्काळ सुरु कराव्यात, अशी मागणी प्रवाशी संघटनेने केली आहे.साखरखेर्डा हे गाव आडवळणी असल्याने या गावावरुन एकही बस लांब पल्ल्याची नाही. २0 हजार लोकसंख्या असलेल्या गावात दोन मोठे धार्मिक स्थळे आहेत. तसेच साखरखेर्डा ते सिंदखेडराजाचे अंतर ५0 किमी आहे. तालुक्यातील ३0 ग्राम पंचायतीच्या निवडणूका असून प्रत्येक कामासाठी उमेदवाराला सिंदखेडराजा येथे जावे लागते. त्याचबरोबर निवडणूक संबंधी कामासाठी ग्रामसेवक, शिक्षक, पटवारी यांना बैठकीसाठी जावे लागते. तालुक्याच्या ठिकाणी जाणार्‍या बसेस मेहकर आगाराने गेल्या एक महिन्यापासून बंद केल्याने प्रवाशी, कर्मचारी यांचे हाल होत असून, त्यांना खाजगी वाहनाने प्रवास करावा लागतो. याबाबत अनेकवेळा तक्रार करुनही मेहकर आगारातील काही अधिकार्‍यांच्या मनमानी कारभारामुळे बसेस बंद करुन त्या इतरत्र वळविण्याचा प्रकार सुरु आहे. दुपारी १२.३0 वाजता मेहकर येथून सुटणारी मेहकर ते जालना ही बस एकतर बंद ठेवतात, नाहीतर वाहकाला मशिन मिळत नाही त्यामुळे कर्मचारी असूनही हा प्रकार घडविल्या जातो. साखरखेर्डा येथून सकाळी ६ वाजता जालन्याकरीता बस सुरु होती. त्या बसला कारण नसताना लव्हाळा फाट्यावर मुक्कामी पाठविल्या जाते. साखरखेर्डा ते जालना ही सकाळी ६ वाजता जाणारी बस एक महिन्यापासून बंद आहे. 

बसेस कमी असल्याने त्या बंद केल्या आहेत. लवकरच सुरु करण्याचा आमचा प्रयत्न  राहील.- चंद्रकांत पाथरकरआगार व्यवस्थापक,मेहकर.