लोकमत न्यूज नेटवर्कमोताळा (जि. बुलडाणा) : मलकापूरवरून सोलापूरकडे जाणार्या एसटी बसने शनिवारी दुपारी मूर्ती फाट्याजवळ झाडाला धडक दिल्याने १५ प्रवासी जखमी झाले असून, ४ जणांची प्रकृती गंभीर आहे. मलकापूर- सोलापूर बस (एम.एच.१४ बी.टी.४३५६) सकाळी ११.२५ च्या सुमारास मोताळाकडून बुलडाणाकडे जात असताना मुर्ती फाट्यानजिक वाहकाचे नियंत्रण सुटल्याने झाडाला धडकली. यामध्ये १५ प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींना बुलडाणा येथील जिल्हा सामान्य रूग्णालयात उपचारासाठी भरती करण्यात आले आहे. या पैकी चौघांना पुढील उपचारासाठी अकोला येथे दाखल करण्यात आले आहे. सदर अपघातामध्ये सोपान कोथळकर नरवेल (५0), फारूकशाह कोथळी (१५), सै.अलीम कोथळी (१५), कैलास सावळे, सुरेश सावजी (मलकापूर), धिरज भोयर (मलकापूर), रामदास हिवाळे (पळसखेड), सुरेश कोथळकर (नरवेल), देविदास कोथळकर (नरवेल), लक्ष्मी देविदास जाधव (सावरगाव डुकरे), सुनिल जवरे, अफसर खान (चांदुरबिस्वा), सुरेश सोनुने, सुनिल वराडे, (मलकापूर), बाबुराव सुरेश खाडे (वालसावंगी) आदी प्रवासी जखमी झाले आहेत.अफसर खान, चालक सुरेश सोनुने धिरज भोयर यांच्यासह अन्य दोन जखमींना पुढील उपचारासाठी अकोला येथे नेण्यात आले आहे.
चालकाचे नियंत्रण सुटल्याने बसचा अपघात; १५ प्रवासी जखमी
By admin | Updated: June 11, 2017 02:27 IST