शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

नव्या सरकारवर लोकांच्या अपेक्षांचे ओझे

By admin | Updated: October 31, 2014 00:02 IST

बुलडाणा जिल्हावासीयांची अपेक्षा; राज्यात चागले दिवसांची प्रतीक्षा.

बुलडाणा : राज्यात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात शुक्रवारी सरकार अस्तित्वात येईल. भाजपचे हे पहिले सरकार असणार आहे. केंद्रात नरेंद्र व राज्यात देवेंद्र ही घोषणा प्रत्यक्षात आल्याने ह्यअच्छे दिनह्ण ची प्रतीक्षा सर्वांनाच आहे. त्यानुषंगाने विविध क्षेत्रातील मान्यवरांनी व्यक्त केलेल्या भावना.* सहकार कायद्याची प्रभावी अंमलबजावणी असावी९७ व्या घटनादुरूस्तीमुळे सहकार क्षेत्रातील अनेक बंधने दूर झाली आहेत. त्यामुळे आता सहकार कायद्याची कठोरपणे अंमलबजावणी करण्याची गरज आहेच. नव्या सरकारने सहकार क्षेत्रातील अनेक संस्थांच्या रखडलेल्या निवडणुकांची कार्यवाही तातडीने हाती घेणे आवश्यक आहे. अनेक संस्थांच्या संचालक मंडळाची मुदत दोन तीन वर्षा आधीच संपली आहे; मात्र निवडणुका झालेल्या नाहीत. यासोबतच सहकार कायद्यांतर्गत कलम ८३ व ८८ च्या नोटीस बजावल्या जा तात, त्याची अंमलबजावणी होत नाही ती तातडीने व गंभीरतेने झाली तर सहकार क्षेत्राला शिस्त लागेल. यासोबतच डबघाईस आलेल्या बँकांना मदत देण्याबाबतही निर्णय होणे अपेक्षित असल्याचे बुलडाणा अर्बन बँकेचे संस्थापक अध्यक्ष राधेश्याम चांडक यांनी सांगीतले. *शेतकरी हिताचे कापूस धोरण ठरविणे आवश्यकविदर्भाचा मुख्यमंत्री झाल्यामुळे आता कापूस धोरणाबाबत शेतकरी हिताचा प्रामुख्याने विचार होईल, अशी अपेक्षा आहे. सीसीआय द्वारे कापूस खरेदी, पणन महासंघाचे खरेदी केंद्र सुरू करून कापसाचा हमीभाव हा उत्पादन खर्च भरून निघेल, असा असावा. कापसाच्या निर्यातवाढीसाठी केंद्र सरकारच्या माध्यमातून प्रयत्न केले पाहिजे, जेणे करून कापूस उत्पादक शेतकर्‍याचा लाभ होईल, याचाच विचार सरकारने केला पाहिजे, असे मत शेतकरी संघटनेचे जेष्ठ नेते नामदेवराव जाधव यांनी नोंदविले. *दिलेली आश्‍वासने पाळानिवडणूक प्रचार काळात भाजपाने लोकांना जी आश्‍वासने दिलीत ती त्यांनी प्रामाणिकपणे पूर्ण करावीत, जनतेचा भ्रमनिरास होणार नाही, एवढी काळजी जरी नव्या सरकारने घेतली तरी पुरे झाले. कारण आता लोकांना मूर्ख बनविण्याचे दिवस गेले आणि हे सरकार तितकी काळजी घेईल, अशी अपेक्षा आहे. वेगळ्या विदर्भासारखे संवेदनशील मुद्दे चार वर्षे तरी मुख्यमंत्र्यांना समोर आणता येणार नाहीत. कारण ते संयुक्त महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. मुंबई वगळून ते महाराष्ट्राचा विकास करू शकत नाहीत. दुसरीकडे सिंचन घोटाळ्याबाबत त्यांनी केलेली घोषणा प्र त्यक्षात त्यांची अंमलबजावणी अशी कसरत त्यांना करावी लागणार असल्याने सर्वांचाच वॉच व अपेक्षा या सरकारवर असल्याचे जेष्ठ विधिज्ञ अँड. अशोक सावजी यांनी नमूद केले. कर प्रणाली सुलभ होऊन राजकीय हस्तक्षेप थांबवाव्यावसायिकांना वेगवेगळे टॅक्स लावण्यात येतात. त्यामुळे किचकट असलेल्या करप्रणालीमध्ये सुधारणा करण्यासाठी प्रयत्न व्हायला हवे. टॅक्सेसचे सुलभीकरण झाले तर व्यावसायिकांना सोयीचे होईल; तसेच करभरणा वेळेवर होऊ शकेल. तेव्हा त्यादृष्टीने विचार व्हावा; तसेच भ्रष्टाचारमुक्त व भ्रष्टाचारविरोधी शासन असावे. गरज नसलेल्या क्षेत्रात वाढता राजकीय हस्तक्षेप कमी व्हावा, अशी अपेक्षा खामगाव चेंबर ऑफ कॉर्मस अँण्ड इंडस्ट्रिजचे अध्यक्ष किशोर गणात्रा यांनी व्यक्त केली.