शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
2
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
3
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
4
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
5
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
6
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
7
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
8
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
9
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
10
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
11
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
12
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
13
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
14
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
15
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
16
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
17
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
18
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
19
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
20
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?

दहावी-बारावीच्या कोऱ्या उत्तरपत्रिकांचा शाळांवर बोजा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2021 04:35 IST

बुलडाणा : कोरोना रुग्णसंख्येत सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे आता दहावीची परीक्षा रद्द करण्यात आली आहे तर बारावीची परीक्षा ...

बुलडाणा : कोरोना रुग्णसंख्येत सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे आता दहावीची परीक्षा रद्द करण्यात आली आहे तर बारावीची परीक्षा नियोजित वेळापत्रकानुसार न होता पुढे ढकलण्यात आली आहे. मात्र, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने परीक्षेचे साहित्य यापूर्वीच शाळांकडे सोपविल्यामुळे ते सांभाळून ठेवण्याची जबाबदारी शाळांवर येऊन पडली आहे. दहावी-बारावीच्या कोऱ्या उत्तरपत्रिकांचा शाळांवर बोजा असून, शाळा बंद असल्यामुळे मुख्याध्यापकांचा ताप आणखीन वाढला आहे. दहावीची परीक्षा २३ तर बारावीची परीक्षा २९ एप्रिलपासून घेण्यात येणार होती. यासाठी परीक्षा मंडळाने शाळांकडे नियोजित वेळापत्रानुसार कोऱ्या उत्तरपत्रिका, पुरवणी, ग्राफ, मॅप, होलोक्रॉप्ट स्टीकर, सिटिंग प्लान, ए, बी. लिस्ट, विषयनिहाय, माध्यमनिहाय बारकोड, प्रात्याक्षिक परीक्षेचे साहित्य आदींचा पुरवठा केला आहे. मात्र, कोरोनाचे संकट वाढल्यामुळे शिक्षणमंत्र्यांनी या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय जाहीर केला. त्यामध्ये दहावीची परीक्षा तर रद्दच करण्यात आली आहे. बारावी परीक्षेच्या पुढील तारखा अद्यापही निश्चित नाहीत. त्यामुळे शाळांना पुरविण्यात आलेले साहित्य सद्यस्थितीत शाळांकडेच आहे. हे साहित्य जोखमीचे असल्यामुळे जिल्ह्यातील मुख्याध्यापकांचा ताप वाढला आहे. विशेष म्हणजे, जिल्ह्यातील शाळांची स्थिती चांगली आहे. मात्र, चोरांची नजर जर या साहित्याकडे गेली तर काय होईल, या भीतीने सध्या तरी मुख्याध्यापकांची झोप उडाली आहे. कोरोनामुळे संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे सद्यस्थितीत शाळा बंद आहे. अशावेळी शाळेत जाणेही मुख्याध्यापक, शिक्षकांना कठीण झाले आहे.

दहावीतील विद्यार्थी - ३९,६५८

बारावीतील विद्यार्थी - ३१,०२४

हे साहित्य कस्टडीत

कोऱ्या उत्तरपत्रिका, पुरवणी, ग्राफ, मॅप, होलोक्रॉप्ट स्टीकर, सिटिंग प्लान, ए. बी. लिस्ट, विषयनिहाय, माध्यमनिहाय बारकोड, प्रात्यक्षिक परीक्षेचे साहित्य, आदी.

परीक्षा कधी?

पुढील प्रवेश कधी?

१. परीक्षेच्या तारखा कधी घोषित होणार? पुढील प्रवेश कधी होणार? असे अनेक प्रश्न विद्यार्थ्यांना पडत आहेत.

२. शिक्षण विभागाने आता दहावीची परीक्षा रद्द केल्याने पुढील प्रवेश नेमका कोणत्या मूल्यांकनावर मिळणार, याचा संभ्रम पालकांमध्ये आहे.

३. कोरोनाचे संकट दिवसेंदिवस वाढतच आहे. त्यामुळे परीक्षा रद्द करण्याची वेळ शिक्षण विभागावर आली. आता बारावीच्या परीक्षेचे नेमके काय होतेय, असा प्रश्न विद्यार्थ्यांना पडला आहे.

मुख्याध्यापक म्हणतात...

दहावी बोर्डाच्या परीक्षेचे साहित्य १२ एप्रिलला मिळाले होते. हे सर्व साहित्य सांभाळणे म्हणजे जबाबदारीचे काम आहे. आपण सर्व साहित्य व्यवस्थित कुलूपबंद ठेवलेले आहे. आता दहावीच्या परीक्षाच रद्द झाल्यामुळे बोर्डाचे जे आदेश येतील, त्यानुसार पुढील अंमलबजावणी करण्यात येईल.

- सुरेश हिवरकर, मुख्याध्यापक,

बाबुराव पाटील विद्यालय, लोणी गवळी.