खामगाव : शेगाव विकास आराखडा अंतर्गत सुरू असलेल्या कामांमुळे होणार्या त्रासाबाबतही प्रशासनाला काही घेणे-देणे नसल्याचे दिसून येत आहे. याचाच प्रत्यय ४ मे रोजी सकाळी १0.३0 वाजताच्या सुमारास दिसून आला. शहरातील एक शेतकरी शेतातील काम आटोपून बैलगाडीने घराकडे येत होता. गोळेगाव मार्गावरून निघल्यानंतर शेगाव-आकोट मार्गावर निर्माणाधीन ओव्हरब्रिजवरील शेवटच्या टोकावरून घराकडे जात असताना एका वाहनचालकाने वाजविलेल्या कर्णकर्कश्श हॉर्नमुळे बैलगाडीला जुंपलेले बैल बिथरले व बैलगाडी ओव्हरब्रिजच्या डाव्या बाजूने असलेल्या चांदूरकर यांच्या घराजवळील पाच फूट नालीत जाऊन कोसळली. यामध्ये सुदैवाने जीवितहानी टळली.
बैलगाडी पाच फूट नालीत कोसळली
By admin | Updated: May 5, 2015 00:09 IST