शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

समृद्धी महामार्गालगतच ५३ गावांजवळून धावणार बुलेट ट्रेन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2021 10:36 IST

Bullet train will run through 53 villages along Samrudhi Highway : बुलडाणा जिल्ह्यातून जाणाऱ्या बुलेट ट्रेन मार्गाच्या संदर्भाने लवकरच सार्वजनिक सुनावणी घेण्यात येणार असल्याचे संकेत मिळाले आहेत.

- नीलेश जोशी

लोकमत न्यूज नेटवर्क

बुलडाणा : देशातील सात प्रस्तावित बुलेट ट्रेन मार्गांपैकी एक असलेल्या मुंबई-नागपूर बुलेट ट्रेनसंदर्भाने मध्यंतरी झालेल्या हवाई लिडार सर्वेक्षणानंतर आता बुलडाणा जिल्ह्यातून जाणाऱ्या बुलेट ट्रेन मार्गाच्या संदर्भाने लवकरच सार्वजनिक सुनावणी घेण्यात येणार असल्याचे संकेत मिळाले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात ही सुनावणी होणार आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयासही दोन दिवसांपूर्वीच नॅशनल हायस्पीड रेल्वे कॉर्पोरेशनचे (एनएचआरसी) एक पत्र मिळाले आहे. जिल्ह्यातील देऊळगाव राजा, सिंदखेड राजा, लोणार आणि मेहकर या तालुक्यांतील जवळपास ५३ गावांतून या बुलेट ट्रेनचा प्रस्तावित मार्ग आहे. देशातील सात प्रस्तावित बुलेट ट्रेनच्या मार्गांपैकी मुंबई-नागपूर हा एक ७३६ किमी लांबीचा महत्त्वपूर्ण मार्ग असून प्राधान्य क्रमाने तो पूर्णत्वास नेण्याचे प्रयत्न आहेत. यासंदर्भाने मार्च महिन्यादरम्यान सर्वेक्षण करण्यात आले होते. आता या मार्गामुळे सामाजिक आणि पर्यावरणावर नेमका काय प्रभाव पडेल, हे मुद्दे घेऊन आता २२ जुलै रोजी सार्वजनिक सुनावणी घेतली जाण्याची शक्यता आहे.

समृद्धीलगतच प्रस्तावित मार्ग

समृद्धी महामार्गालगतच बुलेट ट्रेनचा मार्ग प्रस्तावित असून यासंदर्भात आलेल्या काही हरकती व सूचनांच्या आधारावर प्रसंगी यामध्ये बदल होण्याची शक्यता नाकारता येत नाही. साधारणत: समृद्धी महामार्गालाच समांतर किमान एक किमी अंतरावरून हा मार्ग जाणार असल्याचे संकेत आहे. बुलडाणा जिल्ह्यात डोणगावनजीक २६९ प्लस २६ चेनिंगपासून ते ३५२ प्ल्स ६१ चेनिंगदरम्यान जिल्ह्यातील हा प्रस्तावित मार्ग असून बुलडाणा जिल्ह्यातील ५३ गावांजवळून तो जाईल. मात्र, प्रत्यक्षात सार्वजनिक सुनावणीनंतरच त्यातील काही बाबी स्पष्ट होतील.

टॅग्स :Bullet Trainबुलेट ट्रेनSamruddhi Mahamargसमृद्धी महामार्गbuldhanaबुलडाणा