शहरं
Join us  
Trending Stories
1
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
4
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
5
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
6
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
7
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
10
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
11
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
12
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
13
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
14
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
15
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
16
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
17
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
18
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
19
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
20
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

बैलजोडीला आला सोन्याचा भाव!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 05:38 IST

शेतकऱ्यांनी आधुनिक शेतीची कास धरल्याने गुरांची संख्या घटली आहे. प्रामुख्याने बैलांचा खर्च शेतकऱ्यांना परवडत नसल्याने आता बैलांची संख्या घटली ...

शेतकऱ्यांनी आधुनिक शेतीची कास धरल्याने गुरांची संख्या घटली आहे. प्रामुख्याने बैलांचा खर्च शेतकऱ्यांना परवडत नसल्याने आता बैलांची संख्या घटली आहे. त्यामुळेच बाजारात बैलांच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. जिल्ह्यातील सर्वांत मोठ्या मानल्या जाणाऱ्या खामगाव, मेहकर तालुक्यात डोणगाव व लोणारसह अनेक ठिकाणी बैलबाजार भरतो. सध्या डोणगाव येथील बाजारात बुधवारी दमदार बैलजोडीला एक लाखाच्या वरच दर मिळत असल्याचे दिसून आले. डोणगाव येथील गुरांच्या बाजारात बुलडाणा जिल्ह्यासह वाशिम, अकोला जिल्ह्यातील शेतकरीही गुरांच्या खरेदीसाठी येतात. त्यामुळे या बाजारात दर बुधवारी लाखोंची उलाढाला केवळ बैलांच्या खरेदी-विक्रीतूनच होते. परिसरात मेहकर, लोणार, जानेफळ परिसरात बाजारातील उलाढाल वाढली आहे.

पूर्वी गुरांचा गोठा नाही, असा शेतकरी मिळणे कठीण होते; परंतु गुरांच्या चाऱ्यासह विविध गोष्टींसाठी लागणाऱ्या खर्चात मोठी वाढ झाली आहे. भाकड जनावरांची समस्याही आता गंभीर झाल्याने गुरे पाळण्याचा विचारही करणे अशक्य आहे.

- सतीश खरात, शेतकरी.

चाऱ्याचा मोठ्या प्रमाणात असलेला तुटवडा तसेच गुरांची देखभाल करण्यासाठी द्यावा लागणारा वेळ, या गोष्टी अडचणीच्या ठरत आहेत. वातावरणातील बदलामुळे वाढत असलेल्या आजारांमुळे गुरे पाळणे आता कठीण होऊन बसले आहे.

- गणेश देशमुख, शेतकरी

गेल्या काही वर्षांपासून चाऱ्याची समस्या गंभीर झाली आहे. कडबा मिळणे दुरपास्त असून, कुटाराचे दरही मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. बैलांसाठी पुरेसा चारा असणे आवश्यक आहे. त्यामुळे एकंदर गुरे पाळणे ही समस्याच झाली आहे.

- विलास खरात, शेतकरी.

१५ लाखांची उलाढाल

बुलडाणा जिल्ह्यातील डोणगाव येथील गुरांच्या बाजारात मेहकर तालुक्यासह रिसोड, मालेगाव, पातूर तालुक्यातील शेतकरी गुरांच्या खरेदीसाठी येत असतात. या ठिकाणी गाय, बैल, म्हैस यांच्यासह शेळ्यांची सर्वाधिक खरेदी-विक्री होते. यातून दर आठवड्याला १०-१५ लाखांच्या वर उलाढाल होत आहे. त्यात बैलांसह म्हशीच्या किमती अधिक असल्याने प्रामुख्याने या दोन वर्गातील गुरांच्या खरेदी-विक्रीतूनच अधिक उलाढाल होत असल्याचे दिसून येते.

दुधाळ जनावरांची मागणी घटली

चाऱ्याची टंचाई आणि संगोपनावरील खर्च यामुळे गुरे पाळणे कठीण झाले आहे. त्यामुळे दुधाळ जनावरांची मागणी घटली आहे.

गायीचे पोषण, देखभाल, चारा आणि आजारांवरील उपचाराचा वाढलेला खर्च पाहता, गायी पाळण्याबाबत पशुपालक उदासीन आहेत.

एकीकडे गुरांच्या खर्चात वाढ झाली असताना दुधाचे दर मात्र जेमतेम ५० रुपये लीटरपर्यंतच आहेत. त्यामुळेही दुधाळ जनावरांच्या मागणीत घट झाली आहे.

बैलजोडीवर दिवसाला १५० रुपये खर्च

आधीच चाऱ्याचे दर वाढले असताना बैलांच्या देखभालीसाठी ठेवल्या जाणाऱ्या गड्याची मजुरीही वाढली आहे. त्यामुळे एका बैलजोडीसाठी कडबा, कुटार आणि गड्याच्या मजुरीसह इतर खर्च मिळून शेतकऱ्यांना दीडशे रुपये खर्च येत आहे.