शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

स्वच्छता अभियानात बुलडाणा अव्वल

By admin | Updated: August 14, 2015 00:15 IST

जिल्ह्यात आठ हजार शौचालये; राज्यात बुलडाणा जिल्हा तिस-या क्रमांकावर.

बुलडाणा : शासनाच्यावतीने राज्यभरात राबविण्यात येत असलेल्या स्वच्छ भारत मिशन अभियानांतर्गत सन २0१५-१६ या वर्षात बुलडाणा जिल्ह्याने भरीव कामगिरी करीत विदर्भातून प्रथम क्रमांक पटकाविला आहे. जिल्ह्यात आतापर्यत ८ हजार ७६८ शौचालये बांधण्यात आली आहेत. राज्यात प्रथम क्रमांक नांदेड जिल्ह्याचा असून, दुसर्‍या क्रमांकावर उस्मानाबाद जिल्हा आहे., तर बुलडाणा जिल्हा तिसर्‍या क्रमांकावर आला आहे. शासनाच्या स्वच्छ भारत मिशन अंतर्गत राज्यभरात स्वच्छता अभियान राबविण्यात येत आहे. स्वच्छतेसाठी नागरिकांना प्रोत्साहन मिळावे. घरा-घरांत व प्रत्येक गावाने शौचालय बांधण्याचे उद्दिष्ट पूर्ण करावे. अशा गावांना शासनाच्यावतीने संत गाडेबाबा स्वच्छता पुरस्कार देण्यात येतो. जिल्ह्यातील अनेक गावे या पुरस्काराने सन्मानित झाली आहेत. ज्या गावात व्यक्तिगत स्वच्छतागृह बांधून त्याचा वापर होत नाही, अशा गावांना प्राधान्य देऊन ही योजना या गावात राबविण्यात आली. स्वच्छ भारत मिशन अंतर्गत अशा गावात व्यापक जनजागृती करून गावातील नागरिकांनी स्वच्छतागृह बांधून त्याचा वापर करावा, यासाठी प्रयत्न करण्यात आले. याशिवाय पालिकाक्षेत्रात पाणीपुरवठा, स्वच्छता विभागाने अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांसाठी वैयक्तिक शौचालयाची योजना सुरू केली. या योजनेंतर्गत लाभार्थींना स्वच्छतागृह बांधकामासाठी १२ हजार रुपये अनुदानही दिले जाते. जिल्ह्यात स्वच्छ भारत मिशन अंतर्गत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी दीपा मुधोळ यांच्या नेतृत्वात ही कामे चांगल्या पद्धतीने झालीत. अजूनही ज्या गावात शौचालये नाहीत, तेथे शौचालय बनविण्याची कामे युद्धपातळीवर सुरू आहेत.