शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाणा जिल्ह्यात स्वाइन फ्लूचा कहर!

By admin | Updated: May 11, 2017 07:10 IST

दोघांचा मृत्यू, तर बारा रुग्ण पॉझिटिव्ह : प्रशासन झटकतेय हात!

विवेक चांदूरकर बुलडाणा : एक महिन्यापासून जिल्ह्यात स्वाइन फ्लूच्या आजाराने कहर केला असून, दोघांचा मृत्यू, तर पाच रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. या व्यतिरिक्तही जिल्ह्यात स्वाइन फ्लूचे रुग्ण असून, त्यांचे नमुनेच पाठविण्यात आले नसल्यामुळे निदान होत नसल्याचे वास्तव आहे. दुसरीकडे प्रशासन मात्र हात झटकत असून, स्वाइन फ्लूचे रुग्णच नसल्याचा दावा करीत आहे. जिल्ह्यात एक महिन्यापासून स्वाइन फ्लूच्या रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. बुलडाणा शहरातील एका खाजगी रुग्णालयात ताप व सर्दी झालेले काही रुग्ण दाखल झाले होते. त्यांचे नमुने पुणे येथे तपासल्यानंतर पाच जणांना स्वाइन फ्लू झाल्याचे निष्पन्न झाले. या रुग्णांपैकी मलकापूर तालुक्यातील दाताळा येथील प्रदीप निनाजी नारखेडे यांचा मृत्यू झाला. तसेच बुलडाण्यातील केशवनगरातील ठेकेदार मोहम्मद अफजल मो. नजीर यांचा औरंगाबाद येथे स्वाइन फ्लू या संसर्गजन्य आजाराने एमआयटी हॉस्पिटल औरंगाबाद येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला. यासोबतच सविता संजय चोपडे, राहुल चव्हाण यासह बारा जणांना या भीषण आजाराची लागण झाली आहे. जिल्ह्यातील विविध रुग्णालयांमध्ये स्वाइन फ्लूच्या आजाराचे रुग्ण आहेत. मात्र, त्यांचे नमुने तपासण्यात आले नसून, काही नमुने घेण्यातही टाळाटाळ करण्यात येत आहे. त्यामुळे स्वाइन फ्लूने बाधित रुग्णांचा आकडा समोर येत नाही. जिल्ह्यातील काही रुग्ण हे अकोला व औरंगाबाद येथील रुग्णालयात दाखल आहेत. त्यांना स्वाइन फ्लू झाला असून, त्यांची आकडेवारीही समोर येत नाही.           स्वाइन फ्लू आहे की नाही, हे तपासण्याकरिता नमुने पुण्याला व्हायसॉलॉजी लॅबमध्ये पाठविण्यात येतात. सदर नमुने पाठविण्याकरिता खासगी डॉक्टरांना जिल्हा सामान्य रुग्णालयाशी संपर्क करावा लागतो. त्यानंतर शासकीय रुग्णालयातून एक किट मिळत असून, या किटमध्येच रुग्णांचे नमुने पुण्याला पाठविण्यात येतात. या किचकट प्रक्रियेमुळे अनेक डॉक्टर रुग्णांचे नमुने पाठविण्यास टाळाटाळ करतात. त्यामुळे आणखी काही रुग्णांना स्वाइन फ्लू असला, तरी त्याचे निदान होत नसल्याचे वास्तव आहे. माझ्या रुग्णालयात काही रुग्ण सर्दी व ताप असल्यामुळे दाखल झाले होते. मी त्यांचे नमुने पुण्याला स्वाइन फ्लूच्या तपासणीसाठी पाठविले. यामध्ये पाच रुग्णांना स्वाइन फ्लू झाल्याचे पुण्याहून आलेल्या अहवालावरून स्पष्ट झाले आहे. तसेच नारखेडे यांचा स्वाइन फ्लूने मृत्यू झाला. नागरिकांनी रेल्वे स्थानक, बसस्थानकासारख्या ठिकाणी जाणे टाळण्याची गरज असून, स्वाइन फ्लू आजार होणार नाही, यासाठी काळजी घेणे गरजेचे आहे. - डॉ. दीपक लद्धड, बुलडाणा.