शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
4
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
5
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
6
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
7
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
8
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
9
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
10
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
11
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
12
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
13
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
14
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
15
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
16
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
17
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
18
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
19
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
20
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
Daily Top 2Weekly Top 5

Buldhana: राजे लखुजीराव जाधवांच्या समाधी परिसरात सापडले शिवमंदिर, मंदिर की समाधी यावर मतमतांतरे

By संदीप वानखेडे | Updated: May 19, 2024 20:55 IST

Buldhana News: राजे लखुजीराव जाधव यांच्या समाधी परिसरात रविवारी शिवमंदिराचा शोध लागला आहे. अत्यंत सुबक नक्षीकाम असलेल्या दगडी चौकटी व गर्भगृहात मोठी शिव पिंड मिळाल्याने हा चर्चेचा विषय ठरला आहे.

- संदीप वानखडे सिंदखेडराजा - राजे लखुजीराव जाधव यांच्या समाधी परिसरात रविवारी शिवमंदिराचा शोध लागला आहे. अत्यंत सुबक नक्षीकाम असलेल्या दगडी चौकटी व गर्भगृहात मोठी शिव पिंड मिळाल्याने हा चर्चेचा विषय ठरला आहे.

मातृतीर्थ सिंदखेडराजा हे एक ऐतिहासिक शहर आहे. येथे राजे लखुजीराव जाधव यांनी अनेक वर्षे आपली राजवट चालवली. सन १६२९मध्ये त्यांची दौलताबाद येथील देवगिरी किल्ल्यावर हत्या झाली. त्यानंतर त्यांच्यावर शहराच्या पश्चिम भागात असलेल्या रामेश्वर मंदिरशेजारील जागेत अंत्यसंस्कार करण्यात आले. सन १६३०मध्ये त्यांच्या समाधी मंदिराचे बांधकाम सुरू झाले ते पुढील १० वर्षे चालले. देशातील हिंदु राजाची सर्वांत मोठी दगडी समाधी म्हणून या वास्तूची नोंद घेतली जाते.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून शहराच्या ऐतिहासिक वास्तू जतन, संवर्धनाचे काम सुरू आहे. समाधी परिसरातदेखील केंद्रीय पुरातत्व सर्वेक्षण अंतर्गत खोदकाम गेल्या काही दिवसांपासून सुरू होते. रविवारी असेच काम सुरू असताना येथे समाधी चौथऱ्यापासून पाच फूट खोल व समाधी मंदिरपासून साधारण २० फूट अंतरावर मोठी शिवपिंड दिसून आली. अधिक खोदकाम केले असता शिवपिंड असलेल्या बाजूला दर्शनी भागात सुबक नक्षीकाम असलेली चौकट मिळून आली आहे.

शिवपिंड की समाधी यावरून संभ्रमहे शिव मंदिरच असल्याचा प्राथमिक अंदाज केंद्रीय पुरातत्व सर्वेक्षण टीमकडून करण्यात आला आहे. दुसरीकडे समाधी परिसरात सापडलेले हे अवशेष, शिवपिंड हे तत्कालीन राजे घराण्यातील मोठ्या व्यक्तीची समाधी असण्याची शक्यता काही जाणत्यांनी व्यक्त केली आहे. राजे लखुजीराव जाधव यांच्या समाधी जिथे चिन्हीत आहेत, तेथेही पुरातन शिवपिंड दिसून येते. त्याच परिसरात असलेल्या तत्कालीन महिलांच्या समाधीमध्ये बांगड्या घातलेला महिलांचा उजवा हात दर्शविण्यात आला आहे. त्यावेळी हे चिन्ह सती जाणाऱ्या महिलांसाठी चिन्हीत केले असावे, असे अभ्यासकांचे मत आहे. त्यामुळे रविवारी सापडलेली शिवपिंड हे मंदिर आहे की समाधी, या विषयाचा खुलासा होणे गरजेचे आहे.

नागरिकांची गर्दीरविवारी याबाबत शहरात माहिती मिळताच नागरिकांनी मंदिरसदृश अवशेष पाहण्यासाठी गर्दी केली होती. केंद्रीय पुरातत्व सर्वेक्षणचे नागपूर येथील वरिष्ठ अधिकारी अरुण मलीक, शाम बोरकर, शाहेद अखतर, शुभम अर्जेरिया यांनी परिसराची पाहणी केली.

टॅग्स :buldhanaबुलडाणा