शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
4
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
5
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
6
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
7
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
8
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
9
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
10
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
11
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
12
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
13
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
14
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
15
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
16
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
17
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
18
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
19
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
20
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
Daily Top 2Weekly Top 5

Buldhana: गुजरातमधील वडनगरमधून ऑनलाईन फसवणुकीतील आरोपीस अटक

By निलेश जोशी | Updated: July 13, 2024 19:16 IST

Buldhana Crime News: गुजरातमधील महेसाना जिल्ह्यातील वडनगर येथून बुलढाणा सायबर पोलिसांनी १० लाख २० हजार रुपयांची ऑनलाईन फसवणूक करणाऱ्या एकास आरोपीस अटक केली आहे. दरम्यान कधी काळी झारखंडमधील जामताडा हे गाव सायबर गुन्ह्यासाठी प्रसिद्ध होते तर आता त्यात वडनगरचीही भर पडत असल्याचे चित्र आहे.

- नीलेश जोशी बुलढाणा - गुजरातमधील महेसाना जिल्ह्यातील वडनगर येथून बुलढाणा सायबर पोलिसांनी १० लाख २० हजार रुपयांची ऑनलाईन फसवणूक करणाऱ्या एकास आरोपीस अटक केली आहे. दरम्यान कधी काळी झारखंडमधील जामताडा हे गाव सायबर गुन्ह्यासाठी प्रसिद्ध होते तर आता त्यात वडनगरचीही भर पडत असल्याचे चित्र आहे. बुलढाणा शहरालगतच्या सुंदरखेड येथील रहिवाशी अभिजीत अनिल जाधव (३९) यांची शेअर मार्केटच्या नावाखाली १० लाख २० हजार रुपयांनी फसवणूक झाल्याची तक्रार बुलढाणा सायबर पोलिस ठाण्यात दिली होती.

प्रकरणाच्या तांत्रिक तपासामध्ये पोलिसांना आरोपीचे लोकेशन गुजरातमधील महेसाना जिल्ह्यातील वडनगर दाखवत होते. त्यामुळे जिल्हा पोलिस अधीक्षक सुनील कडासने यांच्या मार्गदर्शनाखाली बुलढाणा सायबर पोलिस ठाण्याचे प्रमुख प्रकाश सदगीर पोलीस कर्मचारी शकील खान, रामू मुंडे, राजदीप वानखेडे, क्षीतीज तायडे, विक्की खरात यांचे पथक गुजरातमध्ये गेले. वडनगर येथून त्यांनी आरोपी अनिलजी अर्जुनजी ठाकूर याचा शोध घेत त्यास १३ जुलै रोजी सकाळी बुलढाण्यात आणले. त्याच्यावर बुलढाणा, वडनगर तसेच हैदराबाद येथे देखील सायबर फसवणुकीचा गुन्हा दाखल असल्याची माहिती आहे. दरम्यान गुजरातमधील वडनगर येथील रेल्वे स्टेशनवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लहान असतांना त्यांना वडिलांना चहा विकण्यास मदत केली होती. त्याच वडनगरमधून पोलिसांनी ऑनलाईन फसवणुकीतील आरोपीस ताब्यात घेतले आहे.

एसपींशी चर्चा झाल्यानंतर दिले ताब्यात सुमारे ८०० किमी लांबीचा प्रवास करत बुलढाण्याचे सायबर पोलिस हे वडनग येथे पोहोचले. स्थानिक पोलिसांना सोबत घेऊन त्यांनी आरोपीचा शोध लावत त्यास ताब्यात घेत तेथील पोलिस ठाण्यात आणले. मात्र वडनगरच्या ठाणेदाराने आरोपीला बुलडाणा पोलिसांच्या ताब्यात देण्यास नकार दिला. आम्ही आमच्याकडील गुन्ह्यात त्यास अटक करत असल्याचे कारण त्यासाठी दिले. त्यामुळे आरोपीचा शोध लावल्यानंतरही रिकाम्या हाताने कसे जायचे, असाप्रश्न सायबर पोलिसांसमोर होता. त्यामुळे पोलिस निरीक्षक प्रकाश सदगीर यांनी जिल्हा पोलिस अधीक्षक सुनील कडासणे यांना याची माहिती दिली. त्यांनी महेसानाचे पोलिस अधीक्षक यांच्याशी सविस्तर चर्चा केली. त्यानंतर आरोपीस बुलढाणा सायबर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

टॅग्स :buldhanaबुलडाणाCrime Newsगुन्हेगारी