शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

Buldhana News : कोरोना प्रतिबंधासाठी पायाभूत सुविधांवर ५२ कोटींचा खर्च

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2021 11:42 IST

Buldhana News: जिल्ह्यात आरोग्य क्षेत्रात गेल्या १५ महिन्यांत पायाभूत सुविधा उभारण्यासाठी प्राधान्याने प्रयत्न करण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : कोरानाच्या संकटाच्या मुकाबल्यासाठी जिल्ह्यात आरोग्य क्षेत्रात गेल्या १५ महिन्यांत पायाभूत सुविधा उभारण्यासाठी प्राधान्याने प्रयत्न करण्यात आले असून त्यावर जवळपास ५२ कोटी रुपये खर्च करण्यात आला आहे. परिणामी, कोरोना तपासणीसाठी आधुनिक प्रयोगशाळेसह, ऑक्सिजन प्लांट, कोविड समर्पीत रुग्णालय कार्यान्वित करण्यासोबतच आनुषंगिक साहित्य खरेदीवर भर दिला गेल्याचे एकंदरीत चित्र आहे. गेल्या वर्षी कोरोना संसर्गाच्या तपासणीसाठी नागपूरला नमुने पाठवावे लागत होते. ऑक्सिजन उपलब्धतेची साधी सोयही नव्हती. जेथे देशाच्या जीडीपीच्या अवघा ४ टक्के खर्च हा आरोग्यवर केला जात होता. तेथे बुलडाणा जिल्ह्यात आरोग्य क्षेत्रावर नेमका किती खर्च होत आहे, ही बाब स्पष्ट होणे अवघड होते. त्यातून आरोग्य क्षेत्रातील पायभूत सुविधांमधील उणिवा प्रकर्षाने समोर येत होत्या.  त्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या दूरदृष्टिकोनातून कोविड हॉस्पिटलमध्ये टाटा ट्रस्टच्या माध्यमातून जवळपास चार कोटींपेक्षा अधिक खर्च करून सेंट्रल ऑक्सिजन युनिट उभारण्यात आले. सोबतच ऑक्सिजनची बुलडाण्याची गरज पाहता २० केएलचा ऑक्सिजन प्लांट उभारण्यात आला आहे. आता जळगाव जामोद, देऊळगाव राजा, मेहकर, शेगाव, खामगाव येथे ऑक्सिजन प्लांट उभारण्याची कार्यवाही अल्पावधीतच सुरू होत आहे. राज्यात काही ठिकाणी रुग्णालयांना शॉर्टसर्किट होऊन लागलेल्या आगी पाहता बुलडाण्यातील रुग्णालयामध्ये इलेक्ट्रिक फिटिंग सुरळीत करण्यात आली. यासोबतच विलगीकरण कक्ष, आरटीपीसीआर लॅब, कोविड केअर सेंटरसाठी बेड, जम्बो ऑक्सिजन सिलिंडर, ड्युरा सिलिंडर खरेदी करून जिल्ह्याच्या ऑक्सिजनच्या मागणीची पूर्तता करण्यासाठी आवश्यक साठवणूक क्षमता निर्माण करण्यास प्राधान्य दिल्या गेले आहेत.

ब्लड बँकेत प्लाझ्मा काढण्याची सुविधाजिल्हा सामान्य रुग्णालयातील ब्लड बँकेमध्ये प्लाझ्मा काढण्याची सुविधा नव्हती. त्यादृष्टीने येथे दुरुस्ती करून आनुषंगिक सुविधा उपलब्ध करण्याच्या हालचालीही सध्या वेगावान झाल्या आहेत. अल्पावधीतच त्याचे दृश्य परिणाम समोर येतील. यासोबतच शेगाव येथील उपजिल्हा रुग्णालयात सीटीस्कॅन सेंटरही उभे राहले आहे. त्यामुळे आरोग्य क्षेत्रात कोरोना संकटामुळे असलेल्या धावपळीसोबतच पायाभूत सुविधा निर्माणाचाही वेग वाढला आहे. 

टॅग्स :buldhanaबुलडाणा