शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
3
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
4
देशपांडे लैय भारी! तुषारने पहिल्याच षटकात PBKS च्या स्टार फलंदाजांचे उडवले त्रिफळे, Video 
5
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
6
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
7
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
8
MS Dhoni पहिल्याच चेंडूवर बोल्ड! पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर CSK ची शरणागती, डाव संपला
9
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
10
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
11
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
12
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
13
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
14
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
15
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
16
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
17
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
18
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
19
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
20
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'

बुलडाणा जिल्ह्यातील नगरपालिकांची शौचालय बांधकामात दमदार कामगिरी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2018 12:07 AM

खामगाव:  स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत शौचालय बांधकामात  जिल्ह्यातील नगरपालिकांची दमदार कामगिरी असल्याचे दिसून येते. शौचालय बांधकामाच्या उद्दिष्टपूर्तीत घाटाखालील शेगाव, नांदुरा आणि जळगाव जामोद पालिका अग्रेसर ठरल्या आहेत, तर घाटावरील सिंदखेडराजा, देऊळगाव राजा, लोणार  पालिकांनी बाजी मारली आहे. 

ठळक मुद्देशेगाव, जळगाव जामोद पालिका अग्रेसरखामगाव, चिखलीही झाल्या ‘पास’!

अनिल गवई । लोकमत न्यूज नेटवर्क खामगाव:  स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत शौचालय बांधकामात  जिल्ह्यातील नगरपालिकांची दमदार कामगिरी असल्याचे दिसून येते. शौचालय बांधकामाच्या उद्दिष्टपूर्तीत घाटाखालील शेगाव, नांदुरा आणि जळगाव जामोद पालिका अग्रेसर ठरल्या आहेत, तर घाटावरील सिंदखेडराजा, देऊळगाव राजा, लोणार  पालिकांनी बाजी मारली आहे.  स्वच्छ भारत अभियानांतर्गत हगणदरीमुक्त शहरांची संकल्पना हाती घेण्यात आली. त्यानुषंगाने  शहरातील उघड्यावरील हगणदारी आणि शौचालय नसलेल्याचे सर्वेक्षण  करण्यात आले. यामध्ये स्वच्छ महाराष्ट्र अभियानाच्या पृष्ठभूमीवर पालिकेतर्फे शहरात शौचालय सर्वेक्षण मोहीम काही दिवसांपूर्वी राबविण्यात आली. त्यानुसार वेगवेगळ्या नगरपालिकांमध्ये फेर सर्वेक्षण करून उद्दिष्ट ठरविण्यात आले.  या अभियानांतर्गत शहरे हगणदरीमुक्त करण्यासाठी वैयक्तिक शौचालय बांधकामासाठी भर दिल्या जात आहे.  यामध्ये  शौचालय बांधकामाला म्हणजेच स्वच्छ महाराष्ट्र अभियानाला गती देण्यासाठी लाभार्थीला प्रत्येकी केंद्र, राज्य आणि स्थानिक पालिका प्रशासनाच्यावतीने १६ हजार रुपयांचे (काही ठिकाणी १२ हजार रुपये) अनुदानही दिल्या जाते. त्याअनुषंगाने जिल्ह्यातील नगरपालिका आणि नगरपंचायतींना कोट्यवधी रुपयांचा निधी वितरित करण्यात आला.  शौचालय बांधकामाच्या उद्दिष्टपूर्तीत शेगाव पालिका सुरुवातीपसूनच प्रगतिपथावर असून, जळगाव जामोद, नांदुरा, सिंदखेड राजा, देऊळगाव राजा पालिकेने दमदार कामगिरी केली असल्याचे उपलब्ध आकडेवारीवरून दिसून येते.

मोताळा नगर पंचायतीचाही वेगळा ठसा!नव्यानेच नगर पंचायतीचा दर्जा मिळालेल्या मोताळा नगर पंचायतीनेही शौचालय बांधकामात वेगळा ठसा उमटविला आहे. मोताळा नगर पंचायतीत ४,४00 एकूण घरांची संख्या आहे. यापैकी ५६0 घरांमध्ये शौचालय नसल्याचे निरीक्षण सर्वेक्षणात नोंदविण्यात आले. त्यानुसार येथे ५६0 शौचालय बांधकामाचे उद्दिष्ट ठरविण्यात आले. या उद्दिष्टापैकी  ५२0 शौचालयांची निर्मिती झाली असून, या ठिकाणी ४0 शौचालयांचे बांधकाम प्रगतीपथावर आहे.

बुलडाणा, चिखली आणि खामगावचीही आगेकूच!स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत शौचालय बांधकामाच्या उद्दिष्टपूर्तीत बुलडाणा, खामगाव आणि चिखली पालिकेचीही उद्दिष्टपूर्तीच्या दिशेने आगेकूच सुरू आहे. जिल्ह्यातील ११ नगरपालिकांपैकी बहुतांश नगर पालिकांनी उद्दिष्टपूर्तीच्या दिशेने वाटचाल करताना ७0 टक्क्यांपेक्षा अधिक टक्केवारी गाठली आहे, तर काही पालिकांची शंभर टक्के वाटचालीकडे आगेकूच असून, यामध्ये मोताळा नगर पंचायतीसह शेगाव, नांदुरा आणि जळगाव जामोद पालिकांचा समोवश आहे.

स्वच्छ महाराष्ट्र अभियानाच्या उद्दिष्टपूर्तीसाठी सुरुवातीपासूनच लक्ष केंद्रित केले. यशस्वी वाटचालीवर शेगाव पालिकेने जिल्ह्यात शिक्कामोर्तब केला आहे. शौचालय बांधकामाच्या उद्दिष्टपूर्तीत पदाधिकार्‍यांसह शहरातील नागरिकांचे योगदान अनमोल आहे.- अतुल पंतमुख्याधिकारी, नगर परिषद, शेगाव.

स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत शौचालय निर्मितीत जळगाव जामोद पालिकेने अल्पावधीत आगेकूच केली आहे. स्वच्छ सर्वेक्षणातही जळगाव जामोद पालिकेची कामगिरी उत्कृष्ट असल्याचे समाधान आहे. नागरिक आणि पदाधिकार्‍यांचे सहकार्य मिळत आहे.- डॉ. प्रशांत शेळकेमुख्याधिकारी, न.प, जळगाव.

टॅग्स :khamgaonखामगाव