शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाणा लोकसभा निवडणूक निकाल 2019:  प्रतापराव जाधवांची विजयाची हॅट्रीक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2019 14:28 IST

बुलडाणा : लोकसभा निवडणुकीत सलग तिसरा विजय मिळवत युतीेचे उमेदवार प्रतापराव जाधव यांनी बुलडाणा लोकसभेच्या इतिहासातील दुसरी विजयाची हॅट्रीक नोंदवली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क

बुलडाणा : लोकसभा निवडणुकीत सलग तिसरा विजय मिळवत युतीेचे उमेदवार प्रतापराव जाधव यांनी बुलडाणा लोकसभेच्या इतिहासातील दुसरी विजयाची हॅट्रीक नोंदवली आहे. दरम्यान, १९९९ पासून शिवसेनाचा बालेकिल्ला राहलेला बुलडाणा लोकसभा मतदार संघ अभेद्य असल्याचे स्पष्ट झाले आहे. मतमोजणी दरम्यानच्या पहिल्या फेरीपासूनच आघाडी घेत ती शेवटच्या फेरीपर्यंत कायम ठेवण्याची किमया नवनिर्वाचित खासदार प्रतापराव जाधव यांनी साधली आहे. सलग तिसऱ्यांदा विजय मिळवितांना त्यांनी त्यांचे पारंपारिक व कट्टर प्रतिस्पर्धी आघाडीचे उमेदवार डॉ. राजेंद्र शिंगणे यांचा १ लाख ३३ हजार २८७ मतांनी पराभवत करत २००९ च्या इतिहासाची पुनरावृत्ती केली आहे.दहा वर्षापूर्वी राजकीय-सामाजिक सहानुभूती तर २०१४ मध्ये मोदी लाटेत तरल्याची कायम टिका सहन करणाºया शिवसेनेचे प्रतापराव जाधव यांनी २०१९ च्या १७ व्या लोकसभा निवडणुकीत पुन्हा एकदा मोठ्या मताधिक्याने पारंपारिक प्रतिस्पर्धी डॉ. राजेंद्र शिंगणे यांचा परभाव केला आहे.सोबतच आपल्या राजकीय मुस्सदेगिरीचीही चुनूक या माध्यमातून दाखवून दिली आहे. अ‍ॅन्टी इनकम्बन्सीमध्ये यंदा प्रतापराव जाधव कितपत तरतात याबाबत राजकीय जाणकारांकडून शंका व्यक्त केल्या जात होत्या. मात्र प्रतापराव जाधवांनी सामाजिक समिकरणे सांभाळतांनाच राजकीय समिकरणाचीही घडी योग्य पद्धतीने बसवत हा विजय साकारला आहे. हा नुसताच विजय साकारला नाही तर बुलडाणा लोकसभेच्या इतिहासात ५० वर्षे अबाधीत राहिलेल्या काँग्रेसच्या श्रीराम यांनी केलेल्या विजयाच्या हॅट्रीकची बरोबरी साधली आहे. त्यामुळे त्यांचा हा विजय राजकीय दृष्ट्या बुलडाण्याच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंद घेणारा ठरणारा आहे.१९९९ पासून बुलडाणा लोकसभा मतदार संघात काँग्रेसची निर्माण झालेली मक्तेदारी मोडीत काढ शिवसेनेने संपूर्ण जिल्हा हा युतीचा बालेकिल्लाच करून टाकलेला आहे. त्यातच भाजपची गेल्या पाच वर्षात वाढलेली ताकदीच्या जोरावर भाजपचे तीन आमदार आणि शिवसेनेच्या दोन आमदारांमुळे जिल्ह्यात युतीचा दबदबा वाढला आहे.खासदार प्रतापराव जाधव यांना पाच लाख २१ हजार ९७७ मते मिळाली तर त्यांचे पारंपारिक प्रतिस्पर्धी डॉ. राजेंद्र शिंगणे यांना तीन लाख ८८ हजार ६९० मते मिळाली. वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार बळीराम सिरस्कार यांना एक लाख ७२ हजार ६२७ मते मिळाली. दरम्यान अन्य नऊ उमेदवारांना नोटापेक्षाही कमी मते मिळाली असून या उमेदवारांना त्यांची अनामत रक्कमही वाचविता आलेली नाही. वैध मतांच्या १/८ मतेही ते घेऊ न शकल्याने ही अनामत रक्कम ते वाचवू शकले नाही.

टॅग्स :Lok Sabha Election 2019 Resultsलोकसभा निवडणूक निकालbuldhana-pcबुलडाणाPrataprao Jadhavप्रतावराव जाधवShiv Senaशिवसेना