शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
2
"इराणने आम्हाला संपवण्याची धमकी दिली, आता स्वतःच...!" शांतता चर्चा फिसकटल्याने नेतन्याहू भडकले
3
शांतता चर्चा फिस्कटल्याने डोनाल्ड ट्रम्प चिडले; आता इराणची खैर नाही, घेराव टाकण्याची दिली धमकी
4
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
5
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
6
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
7
डॉक्टर, मला मृत्यू हवाय..., लिविंग विल हा पर्याय किती उपयुक्त?
8
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
9
सुविधा देताना रेल्वेचे 'सावत्र' प्रेम!; मध्य-पश्चिम रेल्वेत दुजाभाव होतोय, प्रवाशांची भावना
10
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
11
IPL 2026: सुरुवात धमाकेदार, पण 'वैभव'शाली प्रवासाचा दीर्घ पल्ला शिल्लक
12
पाणी हेच पहिले औषध... पण किती आणि केव्हा प्यावे?
13
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
14
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
15
Manav Shah : Video-"एकटेपणा, जेलसारखं वाटायचं"; ४० लाखांचं पॅकेज सोडून भारतात परतला तरुण, काय घडलं?
16
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
17
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
18
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
19
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
20
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
Daily Top 2Weekly Top 5

बुलढाणा: आग लागल्याने घरातील साहित्य जळून खाक, संपूर्ण कुटुंब बेघर

By विवेक चांदुरकर | Updated: May 20, 2024 16:57 IST

आदिवासी ग्राम वसाली येथील घटना : आगीत अन्नधान्य, कपडे, रोकड, कागदपत्रांसह इतर साहित्य भस्मसात 

संग्रामपूर : तालुक्यातील आदिवासी ग्राम वसाली येथे सोमवारी सकाळी ११:३० वा. दरम्यान अचानक घराला आग लागल्यामुळे घरासह साहित्य जळून खाक झाल्याने कुटुंब रस्त्यावर आले आहे. १६ लाख ७८ हजार रुपयांहून अधिक नुकसान झाले आहे. वसाली येथील तेजलीबाई गणेश मोरे कुटुंबासह शेतात गेल्या असता त्यांच्या घराला अचानक आग लागली. यामध्ये घरासह इतर सर्व साहित्य भस्मसात झाले. घरी कोणी नसल्याने जीवितहानी झाली नाही. या आगीत सागाचे ४९ खांब, १० क्विंटल गहू, १० क्विंटल ज्वारी, ५ क्विंटल मका, १ क्विंटल भुईमूग, १ क्विंटल तूरडाळ, ५० किलो मूगडाळ, ५० किलो उडीदडाळ, २० किलो हरभरा असे धान्य जळून नष्ट झाले. 

तसेच, अंथरून, कपड्यांसह २ लाख ३० हजारांची रोकड, अडीच किलो चांदी, ८० हजारांचे सोन्याचे दागिने, त्याचप्रमाणे अत्यावश्यक कागदपत्रे यामध्ये आधार कार्ड, रेशन कार्ड, मुला- मुलींच्या शाळेतील कागदपत्रे, घरातील एलईडी टी.व्ही., लॅपटॉप, मोबाइल, शिलाई मशीन, २ कूलर, दिवान, कपाट, पलंगाची राख रांगोळी झाली आहे. घराला आग कशाने लागली हे स्पष्ट झाले नाही. अन्नधान्यासह इतर साहित्य जळून खाक झाल्याने मोरे कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आली आहे. मंडळ अधिकारी राजू चामलाटे, ग्रामसेवक बी. पी. धोंडगे, तलाठी एस. ए. गाडे, सोनाळा तलाठी डी. एच. जाधव यांनी घटनास्थळाचा पंचनामा करून अहवाल तहसील कार्यालयात सादर केला. शासनस्तरावरून या कुटुंबाला तातडीने आर्थिक मदतीची मागणी करण्यात येत आहे. आग लागली तेव्हा संपूर्ण कुटुंब शेतात होतेतेजलीबाई गणेश मोरे यांना १४ वर्षीय बादल नामक एक मुलगा आहे. तर अंजली (वय १२ वर्षे), आरुषी गणेश मोरे (वय १० वर्षे), अमृता (वय ८ वर्षे) अशा ३ मुली आहेत. सकाळी त्या मुला -मुलींसह शेतात गेले असता अचानक त्यांच्या घराला आग लागली. त्यामुळे कुटुंब बेघर झाले असून त्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाfireआग