बुलडाणा : विधानसभा निवडणुकीसाठी १५ ऑक्टोबर रोजी जिल्हाभरातील सात विधानसभा मतदारसंघांमध्ये मतदार राजा आपला मतदानाचा हक्क बजावणार आहे. या प्रक्रियेसाठी बुलडाणा जिल्ह्यात साडेचार हजारांपेक्षा जास्त शाईच्या बाटल्या लागणार आहेत. एक शाईची बाटली ३५ ते ४0 मतदारांना पुरते. मात्र, मतदानाच्या दिवशी कमतरता पडू नये म्हणून निवडणूक आयोगाकडून काळजी घेतली जात आहे. मतदान करण्या पूर्वी डाव्या हाताच्या बोटाच्या नखाला शाई लावण्यात येते. ही त्या व्यक्तीने मतदान केल्याची ओळख असते. ही शाई पुसणे सध्या तरी शक्य नाही. शाई बोटावर दिसत असताना कोणी मतदान करण्याचा प्रयत्न केला, तर त्या व्यक्तीवर कायदेशीर कारवाई केली जाते. शाई बोटाला लावल्यानंतर ती किमान तीन आठवडे तरी पुसली जात नाही. मतदान करताना डाव्या हाताच्या बोटाला लावण्यात येणारी गडद निळ्या रंगाची शाई कर्नाटकातील म्हैसूर येथील म्हैसूर पेंट्स अँड वॉर्निश लिमिटेड या सरकारी कंपनीद्वारे बनविण्यात येते. सन १९६२ पासून या कंपनीद्वारे उत्पादित करण्यात येणार्या शाईचा वापर मतदान केंद्रांवर केला जातो. निवडणूक विभागाच्या नॅशनल फिजिकल लॅबोरेटरी व नॅशनल रिसर्च डेव्हलपमेंट कॉपोर्रेशनच्या (एनआरडीसी) विशेष तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली ही शाई तयार केली जाते. मतदान केल्यानंतर मतदाराच्या बोटावर लावण्यात येणारी शाई तीन आठवड्यापर्यंत पुसता येत नाही. ही शाई पुसण्यासाठी बाजारात कोणत्याही प्रकारचे केमिकल उपलब्ध नसल्याचे उपजिल्हा निवडणूक अधिकारी रमेश घेवंदे यांनी स्पष्ट के ले. मतदारसंघ शाई बॉटल मतदानकेंद्रमलकापूर ६५0 २७३बुलडाणा ६५0 २७५चिखली ६५0 २७२सिंदखेडराजा ७५0 ३१४मेहकर ७00 २९६खामगाव ६९0 २९१जळगाव जा. ६५0 २७0
बुलडाणा जिल्ह्यात शाईच्या साडेचार हजार बाटल्यांची गरज
By admin | Updated: October 11, 2014 23:19 IST