बुलडाणा: सलग तिसर्या दिवशी जिल्ह्यात अवकाळी पावसाचा फटका बसला आहे. बुलडाणा शहर व परिसरात विजेच्या कडकडाटासह पावसाने जोरदार हजेरी लावली. तालुक्यातील देऊळघाट येथे वीज कोसळून एक बालक ठार, तर एक जखमी झाला. लोणार तालुक्यातील शेलगाव देशमुख येथे गारांसह पाऊस कोसळला. सलग तीन दिवसांच्या पावसामुळे तालुक्याला सर्वाधिक फटका बसला असून, अनेकांचे संसार उघड्यावर आले आहेत.
बुलडाणा जिल्ह्याला सलग तिस-या दिवशीही अवकाळीचा फटका
By admin | Updated: March 2, 2016 02:26 IST