शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाणा जिल्ह्यात संततधार : सरासरी 19.1 मि.मी पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2017 20:08 IST

बुलडाणा -  जिल्ह्यात नैरुत्य मान्सून पाऊस सक्रीय झाला असून सर्वदूर पाऊस होत आहे. पावसाची संततधार जिल्ह्यात सुरू आहे. काल रात्रीपासूनच बहुतांश ठिकाणी जिल्ह्यामध्ये पाऊस होत आहे.  या पावसाचा लाभ जिल्ह्यात रब्बी हंगामामध्ये होणार आहे. सर्वत्र पाऊस होत असल्यामुळे भुजल पातळीत वाढ होत आहे. जिल्ह्यात आज 21 सप्टेंबर रोजी सकाळी 8 वाजेपर्यंत महसूल विभागाकडील आकडेवारीनुसार सर्वात जास्त 63  मि.मी  पावसाची नोंद संग्रामपूर तालुक्यात झाली आहे.

ठळक मुद्देकाल रात्रीपासूनच बहुतांश ठिकाणी जिल्ह्यामध्ये पाऊस या पावसाचा लाभ जिल्ह्यात रब्बी हंगामामध्ये होणार

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा -  जिल्ह्यात नैरुत्य मान्सून पाऊस सक्रीय झाला असून सर्वदूर पाऊस होत आहे. पावसाची संततधार जिल्ह्यात सुरू आहे. काल रात्रीपासूनच बहुतांश ठिकाणी जिल्ह्यामध्ये पाऊस होत आहे.  या पावसाचा लाभ जिल्ह्यात रब्बी हंगामामध्ये होणार आहे. सर्वत्र पाऊस होत असल्यामुळे भुजल पातळीत वाढ होत आहे. जिल्ह्यात आज 21 सप्टेंबर रोजी सकाळी 8 वाजेपर्यंत महसूल विभागाकडील आकडेवारीनुसार सर्वात जास्त 63  मि.मी  पावसाची नोंद संग्रामपूर तालुक्यात झाली आहे.जिल्ह्यात सकाळी 8 वाजेपर्यंत जास्त पाऊस संग्रामपूर :63 मि.ली (484 मि.ली), चिखली : निरंक (653), मेहकर: 3 (694), दे.राजा: 11 (697),  लोणार: 4 (592), खामगांव : 15 (580.3), शेगांव : 20 (458), मलकापूर : 22 (649), मोताळा : 19 (607), नांदुरा: 23 (624.5), जळगांव जामोद : 20 (702), सि.राजा: 24 (682.1), बुलडाणा : 24 (926) मि.मी पावसाची नोंद करण्यात आली.  अशाप्रकारे जिल्ह्यात एकूण 248  मि.ली पावसाची नोंद करण्यात आली असून त्याची सरासरी 19.1  मि.ली आहे. आतापर्यंत सर्वात जास्त पाऊस  बुलडाणा तालुक्यात झाला असून सर्वात कमी पाऊस शेगांव तालुक्यात झाला आहे. जिल्ह्यात 1 जुन 2017पासून आतापर्यंत पडलेल्या पावसाची  सरासरी 642.2  मि.ली आहे.जिल्ह्यातील प्रकल्पांमधील जलसाठ्यात वाढबुलडाणा पाटबंधारे विभागाकडून प्राप्त माहितीनुसार, जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पांमध्ये गत 24 तासात झालेल्या पावसामुळे जलसाठ्यांमध्ये वाढ नोंदविण्यात आली आहे. प्रकल्पनिहाय जलसाठा द.ल.घ.मी नुसार पुढीलप्रमाणे..नळगंगा - प्रकल्पीय संकल्पीत साठा : 69.32 टक्के, आजचा पाणीसाठा : 34.55 टक्के, पेनटाकळी - प्रकल्पीय संकल्पीत साठा : 59.97 टक्के, आजचा पाणीसाठा : 17.10 टक्के, खडकपूर्णा - प्रकल्पीय संकल्पीत साठा : 93.47, आजचा पाणीसाठा : 5.05, पलढग - प्रकल्पीय संकल्पीत साठा : 7.51 टक्के, आजचा पाणीसाठा: 89.61 टक्के, ज्ञानगंगा - प्रकल्पीय संकल्पीत साठा : 33.93 टक्के, आजचा पाणीसाठा: 38.25 टक्के, मस : प्रकल्पीय संकल्पीत साठा : 15.04 टक्के, आजचा पाणीसाठा: 26.99, कोराडी : प्रकल्पीय संकल्पीत साठा : 15.12  टक्के, आजचा पाणीसाठा: 33.13 टक्के, मन : प्रकल्पीय संकल्पीत साठा : 36.83 टक्के, आजचा पाणीसाठा: 23.35 टक्के, तोरणा : प्रकल्पीय संकल्पीत साठा : 7.89 टक्के, आजचा पाणीसाठा: 28.39 टक्के, उतावळी : प्रकल्पीय संकल्पीत साठा : 19.79 टक्के, आजचा पाणीसाठा: 24.86 टक्के.