शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाणा जिल्हा गारठला; पिकांवर हवामानाचा दुहेरी परिणाम!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2017 23:49 IST

बुलडाणा जिल्ह्यात दोन दिवसांपासून हवामानात बदल झाला असून, वाढती थंडी गहू पिकासाठी पोषक  ठरत आहे; मात्र थंडीबरोबरच ढगाळ वातावरणही निर्माण झाल्याने तूर व हरभरा पिकांवर  किडीच्या प्रादुर्भावाचा धोका वाढला आहे.

ठळक मुद्देगव्हाला पोषक; तर तूर, हरभरा धोक्यात!

ब्रह्मनंद जाधव । लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा :  जिल्ह्याच्या सरासरी रब्बी क्षेत्रापैकी ९५ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे. दरम्यान,  बुलडाणा जिल्ह्यात दोन दिवसांपासून  हवामानात बदल झाला असून, वाढती थंडी गहू पिकासाठी पोषक  ठरत आहे; मात्र थंडीबरोबरच ढगाळ वातावरणही निर्माण झाल्याने तूर व हरभरा पिकांवर  किडीच्या प्रादुर्भावाचा धोका वाढला आहे. त्यामुळे रब्बी पिकांवर थंडी व ढगाळ हवामानाचा  दुहेरी परिणाम जाणवत आहे.  जिल्ह्यात १ लाख ३४ हजार १९४ हेक्टर क्षेत्रापैकी १ लाख २७ हजार ९0७ हेक्टर क्षेत्रावर  रब्बीची पेरणी झाली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ९५ टक्के क्षेत्रावर रब्बीची पेरणी झालेली आहे.  त्यात गहू पिकाचे क्षेत्र १५ हजार ५00 हेक्टर व हरभरा पिकाचे क्षेत्र ९१ हजार १३६ हेक्टर  आहे. सध्या गहू व हरभरा पीक चांगले बहरले असून,  तूरही शेंगांनी लदबदली आहे. दरम्यान,  जिल्ह्यात होत असलेल्या वातावरणातील बदलांचा परिणाम पिकांवर जाणवत आहे.  सध्या  थंडीचे प्रमाण वाढल्याने  ही थंडी गहू पिकासाठी अत्यंत फायद्याची ठरत आहे. गहू पिकास रात्री  थंड आणि दिवसा कोरडे हवामान मानवते. गहू पिकाच्या चांगल्या उत्पन्नासाठी गव्हाला जास्तीत  जास्त थंडी मिळणे आवश्यक असते; परंतु रब्बी हवामानाच्या दिवसांमध्ये जिल्ह्यात दरवर्षी  थंडीचा कालावधी पाहिजे तेवढय़ा प्रमाणात जाणवत नाही. तसेच रात्रीच्या तापमानातसुद्धा बरीच  तफावत आढळून येते. पीकवाढीच्या काळात अचानक तापमानात वाढ झाली तर पीक लवकर  फुलावर येते व पर्यायाने उत्पन्नात घट होते. सध्या गहू पिकाला जवळपास १५ दिवस झाले असून,  पाणी देण्याच्या दोन पाळ्या झाल्या आहेत. आता जिल्ह्यात वाढलेली थंडी गहू पिकासाठी पोषक  ठरत आहे. यामुळे गहू पीक वाढण्यास मदत होते. वाढत्या थंडीमुळे गहू उत्पादकांना दिलासा  मिळाला आहे; मात्र थंडीसोबतच जिल्ह्यात ढगाळ वातावरणही निर्माण झाल्याने तूर व हरभरा  िपकावर किडीचा प्रादुर्भाव वाढण्याची दाट शक्यता दिसून येत आहे. 

२0 अंश सेल्सिअसपर्यंत तापमान उपयुक्त गहू पीक वाढीसाठी सुरुवातीच्या काळात १0 ते २0 अंश सेल्सिअस पर्यंतचे तापमान उपयुक्त ठर ते. सध्या जिल्ह्यात २0 ते २६ अंश सेल्सिअसपर्यंत तापमान राहत आहे. त्यामुळे या तापमानात  गहू बियाण्याची उगवण चांगली होत आहे; तसेच बागायती क्षेत्रावर आतापर्यंत झालेल्या गहू  पेरणीला थंडीचा जास्तीत जास्त लाभ मिळत आहे; मात्र डिसेंबर महिन्याच्या १५ तारखेनंतर  उशिरा किंवा अति उशिरा पेरणी केली असता, उत्पन्नात घट येऊ शकते. उशिरा पेरणी केलेल्या  गहू पिकास थंड हवामानाचा कालावधी फारच कमी मिळतो, त्यामुळे फुटव्यांची व ओंबीतील  दाण्यांची संख्या कमी होऊन उत्पन्नात घट येते.

तूर, हरभर्‍याचे नुकसान ढगाळ वातावरणामुळे तूर व हरभरा पिकावर किडीचा प्रादुर्भाव वाढत आहे. तुरीचे पीक सध्या  शेंगा भरण्याच्या अवस्थेत असून, त्यावर शेंगा पोखरणार्‍या अळीने हल्ला केला आहे, तर हरभरा  पिकावरसुद्धा घाटे अळीचा प्रादुर्भाव जाणवत आहे. ढगाळ वातावरणात किडीचा प्रादुर्भाव  नियंत्रणात ठेवणे शेतकर्‍यांसाठी अवघड झाले आहे. त्यामुळे तूर, हरभर पिकाचे नुकसान होत  आहे. 

बदलत्या हवामानाचा पिकांवर परिणाम होत आहे. थंडी सुटल्याने गहू पिकासाठी पोषण वातावरण  निर्माण झाले आहे; मात्र थंडीबरोबरच ढगाळ वातावरणही असल्याने तूर व हरभरा पिकावर  किडीचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. तेव्हा पिकांवरील कीड नियंत्रणासाठी वेळीच उ पाययोजना कराव्या.- डॉ. सी.पी.जायभाये,शास्त्रज्ञ, कृषी संशोधक केंद्र, बुलडाणा.

टॅग्स :agricultureशेती