शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

डिजिटल साक्षरतेत बुलडाणा जिल्हा माघारला!

By admin | Updated: February 19, 2016 01:33 IST

शासनाद्वारे रजिस्ट्रेशन बंद; त्यामुळे अनेकांना फटका, अभियानावर प्रश्नचिन्ह.

गिरीश राऊत / खामगावपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील प्रत्येक नागरिकाला डिजिटल साक्षर करण्यासाठी राष्ट्रीय डिजिटल साक्षरता अभियान (दिशा) सुरू केले आहे. या अभियान अंतर्गत पहिल्या टप्प्यात देशातील ५४ लाख नागरिकांना डिजिटल साक्षर करण्याचे लक्ष्य असून, राज्याला ६0 हजार नागरिकांना साक्षर करण्याचे लक्ष्य आहे; मात्र यासाठी नोंदणीमध्ये असमानता दिसून येत असून, यामध्ये राज्यातील काही जिल्ह्यातील नोंदणी १0 हजाराच्या वर तर काही जिल्ह्यांतील नोंदणी ३ ते ४ हजारावरच थांबली आहे. आता वेबसाईट बंद झाल्याने याचा फटका बुलडाणा जिल्ह्यातील नागरिकांना बसत असून, जिल्ह्यात आतापर्यंंंत फक्त ४ हजार ९७७ नागरिकांचीच या प्रशिक्षणासाठी नोंदणी झाली आहे.                                 डिजिटल साक्षर अंतर्गत देशातील प्रत्येक नागरिकांना संगणक साक्षर करण्याचा संकल्प पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे. यासाठी देशातील १८७२ सहयोगी कंपनीद्वारे ४८ लाख ८४ हजार ८७ नागरिकांची नोंदणी करण्यात आली आहे. यापैकी ३६ लाख ४१ हजार २३७ नागरिक डिजिटल साक्षर झाले असून, यापैकी १४ लाख ३५ हजार ४८६ जणांना डिजिटल साक्षरतेबाबत प्रमाणपत्रसुद्धा देण्यात आले आहेत. महाराष्ट्र राज्यासाठी या पहिल्या टप्प्यात फक्त ६0 हजार नागरिकांना साक्षरतेचे लक्ष्य देण्यात आले होते. यामधून २५ लाख लोकसंख्या असलेल्या बुलडाणा जिल्ह्यातील केवळ ४ हजार ९७७ नागरिकांची नोंदणी झाली असून, नोंदणी होणारी वेबसाईट बंद झाली आहे. यामुळे या अभियानाच्या सफलतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, स्वस्त धान्य दुकानदार अशा एकूण ५२.५ नागरिकांना दोन टप्प्यात प्रशिक्षित केल्या जाणार आहे. पहिल्या टप्प्यात १0 लाख लाभार्थिंना या योजनेंतर्गत प्रशिक्षित केल्या जात आहे. यामध्ये ६.३ लाख लाभार्थिंना १ स्तराचे प्रशिक्षणासाठी तर २.७ लाख लाभार्थिंना स्तर २ चे तर ९ लाख लाभार्थिंना शासनाकडून प्रशिक्षण शुल्क सहायतेसाठी पात्र ठरविण्यात आले आहे, तर १ लाख लाभार्थिंना उद्योजक व स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून प्रशिक्षित केल्या जाणार आहे. दुसर्‍या टप्प्यात ४२.५ लाख नागरिकांना प्रशिक्षित केल्या जाणार आहे.