शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

अधुनिक युगात मातीच्या तव्याची क्रेझ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2020 12:14 IST

Buldhana News मातीच्या भांड्यातील भाजी किंवा तव्यावरील पोळी तथा भाकरीला विशिष्ट चव येत असल्याचे खवय्यांचे म्हणणे आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा/डोणगाव: अधुनिक युगात स्वयंपाकासाठी मातीच्या तव्यासह मातीची भांडी वापरण्याकडे नागरिकांचा कल वाढत असल्याचे चित्र आहे. त्यातच कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर न्युट्रीशीयन मिळविण्याच्या दृष्टीनेही ही भांडी उपयुक्त असल्याची नागरिकांची भावना बनल्यामुळे मातीच्या तव्याची क्रेझ आता वाढत आहे.राजस्थानमधून मातीची भांडी आणि तवे तथा खेळणी विकण्यासाठी आलेल्या व्यक्तींकडून प्रामुख्याने तवा घेण्याकडे नागरिकांचा कल वाढत आहे. डोणगाव, चिखली, बुलडाण्यासह जिल्ह्यातील बहुतांश भागत सध्या हे अस्थायी विक्रेते फिरत आहेत. त्यांना सार्वत्रिक स्वरुपात काही प्रमाणात प्रतिसादही मिळत असल्याचे पोपललाल या विक्रेत्याने सांगितले.राजस्थानातून ही भांडी प्रामुख्याने बुलडाणा जिल्ह्यात जालना जिल्ह्यातून रेल्वेमार्गे पोहोचत आहेत. मातीच्या भांड्यातील भाजी किंवा तव्यावरील पोळी तथा भाकरीला विशिष्ट चव येत असल्याचे खवय्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे या भांड्यांना आता मागणी वाढत आहेत. त्यातच मिशन बिगीन अगेन सुरू झाल्याने परराज्यातील हे मजूर तथा कामगार बुलडाणा जिल्ह्यात येवून रेडीमेड तयार असलेली ही मातीची भांडी व तवे विकत असल्याचे चित्र आहे.मातीचे भांडे किंवा तवा हळुहळू गरम होतो. त्यामुळे त्यामध्ये शिजविण्यात आलेल्या अन्न पदार्थाला एक वेगळी चव येते. त्याचा स्वाद चांगला लागलतो. त्यामुळे प्रामुख्याने मातीचा तवा घेण्याकडे नागरिकांचा कल असतो. त्यास बुलडाणा येथील फिटनेस कोच नीलेश परदेशी यांनीही दुजोरा दिला. सोबतच यातून न्युट्रीशियन्स ही भेटतात, असे त्यांनी सांगितले. सोबतच गॅसवर शिजविलेल्या अन्नाची आणि चुलीवर शिजविलेल्या अन्नाची वेगळी चव लागते. गॅसचे आगीत रुपांतर होवून नंतर अन्न शिजते तर चुलीवर थेट आग ही अन्नाला मिळते, असे ते म्हणाले.माती अल्कली धर्मीयमाती अल्कली धर्मीय आहे. त्यामुळे अन्नातील आम्लधर्मीय तत्वे तथा अ‍ॅसीड मारले जाते. सोबतच अन्न पचनास यामुळे मदत होते. तसेच मातीच्या भांड्यातील अन्न पदार्थाला तेलही कमी लागते. त्यातून फॅट्स वाढत नाही. सोबतच अन्न हे हळुहळु शिजते. त्यामुळे अन्नातील नैसर्गिक तत्व तथा घटक कायम टिकून राहतात. या व्यतिरिक्त मातीमध्ये कॅल्शियम मॅग्नेशियम, आर्यन, सल्फर हे शरीरासाठी आवश्यक घटकही या माध्यमातून उपलब्ध होत असतात, अशी माहिती जिल्हा सामान्य रुग्णालयातील फिजिशियन डॉ. विजय सोळंकी यांनी ‘लोकमत’शी बोलताना स्पष्ट केले. त्यातून ही क्रेझ वाढत असल्याचे एकंदरीत चित्र आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणा