शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

सुशोभीकरण गेलं चुलीत!... मुलांना पहिले स्वच्छतागृह द्या; देऊळघाटमध्ये जिल्हाधिकाऱ्यांचा संताप

By निलेश जोशी | Updated: January 30, 2024 19:20 IST

मतदान केंद्राची पाहणी करण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील हे ३० जानेवारी रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास बुलढाणा तालुक्यातील देऊळघाट येथे गेले होते

बुलढाणा : जी ट्वेंटीसह मोठमोठ्या कार्यक्रमांच्या आयोजनामध्ये महत्त्वपूर्ण सहभाग राहिलेले बुलढाण्याचे जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी ३० जानेवारी रोजी देऊळघाट ग्रामपंचायतीमधील कर्मचाऱ्याची चांगलीच शाळा घेतली. विद्यार्थ्यांना नीटनेटके स्वच्छतागृहच नसल्याचे निदर्शनास आल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांचा पारा चढला आणि त्यांनी ग्रामसेवकाला सभ्य भाषेत परंतु धारधार शब्दांत समज दिली. त्यामुळे सध्या तालुक्यात हा विषय चर्चेचा ठरत आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने प्रशासकीय पातळीवर तयारी सुरू आहे.

त्याअनुषंगाने मतदान केंद्राची पाहणी करण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील हे ३० जानेवारी रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास बुलढाणा तालुक्यातील देऊळघाट येथे गेले होते. त्यांच्या सोबत बुलढाणा उपविभागीय अधिकारी पुलकित सिंह, तहसीलदार रूपेश खंडारे व अन्य कर्मचारी होते. यावेळी त्यांनी जिल्हा परिषद उर्दू व मराठी शाळेतील मतदान केंद्राची पाहणी केली. तसेच स्वच्छतागृहसुद्धा तपासले. तेव्हा त्याची झालेली दयनीय अवस्था पाहून जिल्हाधिकारी अक्षरश: संतापले. मात्र, त्यांनी संयम राखत ग्रामसेवकाला येथील स्वच्छतागृहाची दुरुस्ती करण्याच्या सूचना दिल्या. मात्र, ग्रामसेवकाने सुशोभीकरण करायचे आहे, असे सांगत वेगवेगळी कारणे सांगितली. त्यामुळे जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी ‘सुशोभीकरण गेलं चुलीत, आधी स्वच्छतागृह द्या!!’ अशी समजूत तेथे उपस्थित ग्रामसेवकाला दिली. त्यामुळे उपस्थित ग्रामस्थही आवाक् झाले....तर लोक सोडणार नाहीतजिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यावेळी म्हणाले की, वित्त आयोगाचा निधी मिळतो. त्यातील ५० टक्के निधीही खर्च करता येतो. कसलं सुशोभीकरण करता. मुलांसाठी स्वच्छतागृह नाही. असंच राहिलं तर नागरिक तुम्हाला सोडणार नाही, असे वक्तव्य केले. स्वच्छतागृहाचे काम करा, असे जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी यावेळी सांगितले. दरम्यान, यावेळी ग्रामसेवकाने टॉयलेट बांधायचे असून टिनपत्रेही टाकावयाची असल्याचे सांगत दुसऱ्या ठिकाणी बांधकाम सुरू असल्याचे यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना सांगितले. मात्र, आधी शालेय मुलांना सुविधा देण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.