शहरं
Join us  
Trending Stories
1
Isro Dharali Photos: गाव नाही, भगीरथी नदीही गिळली; बघा ISROच्या सॅटेलाईटने टिपलेले फोटो, किती झालाय विध्वंस
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर टॅरिफ बॉम्ब! चीनने चढवला हल्ला; म्हणाला, 'हा टॅरिफचा दुरुपयोग'
3
Kenya Plane Crash: घरांवरच कोसळले वैद्यकीय पथकाला घेऊन जाणारे विमान; २ डॉक्टरसह ६ जण ठार
4
‘अच्छे दिन’ आल्याने आम्हालाही काही मिळावे हा भाव सोडा; सरसंघचालक भागवतांनी टोचले कान
5
सिनेमाचं आमिष, पार्ट्यांचा बहाणा...;खेवलकरच्या मोबाईलमध्ये १७०० अश्लील फोटो अन् व्हिडिओ, महिलांची तस्करी उघड
6
शालार्थ आयडी घोटाळा: राज्य शासनाची ‘एसआयटी’ गठीत, पुणे विभागीय आयुक्तांच्या नेतृत्वात तीन सदस्यीय समिती करणार तपास
7
महाराष्ट्रातील गरजू आणि पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार; महसूलमंत्री बावनकुळे यांनी दिली महत्त्वाची माहिती
8
कपिल शर्माच्या कॅनडा कॅफेमध्ये पुन्हा गोळीबार, 'या' गुंडाने व्हिडीओ पोस्ट करून जबाबदारी घेतली
9
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
10
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
11
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
12
शुबमन गिलची आशिया कपसाठीच्या संघातून सुट्टी? Duleep Trophy स्पर्धेत लागलीये कॅप्टन्सीची ड्युटी
13
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
14
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट
15
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
16
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
17
VIDEO : सॉरी सॉरी...! वैभव सूर्यवंशीची पॉवर; गोळीच्या वेगानं मारला चेंडू; बचावासाठी कॅमेरामनची 'कसरत'
18
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सॅमसंगने आणलाय 5G फोन, किंमतही कमी!
19
रिक्षातून घरी जाणाऱ्या महिलेचं अपहरण, कारमध्ये नेऊन बलात्काराचा प्रयत्न, पाच जणांविरोधात गुन्हा दाखल
20
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी

बुलडाणा जिल्ह्यात मने बदलली..अन् मतेही.!

By admin | Updated: May 19, 2014 00:03 IST

युपीए कार्यकाळातील घोटाळयाविरोधात झालेला जनआक्रोश संघटीत करण्याचे काम भाजपाने नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात चोख केले.

राजेश शेगोकार / बुलडाणा

       यह पब्लीक है.यह सब जानती है. हे गाणे खूप जुने असले तरी ते सर्वकालीक आहे. परवा लागलेल्या लोकसभा निवडणूक निकालाच्या पृष्ठभूमीवर तर हे गाणे अधिक चपखल बसले आहे. केंद्रातील युपीए सरकारने राबविलेल्या विविध योजना कितीही कल्याणकारी असल्या तरी या योजनांपेक्षाही युपीए सरकारच्या काळात झालेले घोटाळे, वाढलेली महागाई, भ्रष्टचाराचा झालेला शिष्टाचार यामुळे प्रचंड असंतोष निर्माण झाला होता. हा असंतोष संघटीत करण्याचे काम भाजपाने नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात चोख केले. आक्रमक प्रचार अन् मोदी पंतप्रधान या दोन मुद्यावर संपूर्ण देश ढवळून निघाला व वारूळातुन मुंग्या बाहेर पडाव्यात, तशा स्वरूपात ईव्हीएम मधून मते बाहेर पाडली. ही सारी प्रक्रीया एक दिवसात झाली नाही. लोकांची मने हळहळू बदलली व या बदललेल्या मनांवर जात-पात, धर्म, विचारधारा यासोबतच कुठल्याही स्थानिक मुद्यांचा प्रभाव पडला नाही. मते बदलली, मते बनली, मते ठाम राहिली व चमत्कार घडला याला बुलडाणाही अपवाद राहिलेला नाही.

      बुलडाणा लोकसभा मतदारसंघात यावेळी शिवसेनेचे प्रतापराव जाधव यांनी मिळवलेला लाखाधिक्याचा विजय हा केवळ अशा बदललेल्या मनांचा परिणाम आहे. ही मने फक्त प्रतापरावांसाठी निश्‍चितच बदलली नाहीत तर मोदींसाठी झालेले हे मन परिवर्तन आहे, हे आता सर्वच मान्य करत आहेत. तसे पाहिले तर बुलडाण्यात ही निवडणुक महायुतीसाठी अडचणीचीच होती. राष्ट्रवादीचा उमेदवार कोण ? यावरच महायुतीचे अध्रे यश होते, दोन मराठय़ांमध्ये निवडणूक झाली असती तर काय झाले असते, इथपासुन तर काँग्रेसला जागा सुटली व उमेदवार कोण? इथपर्यत प्रतापराव जाधव यांनी रणनिती आखली होती. गेल्यावेळी प्रतापरावांच्या विजयात मोलाचा वाटा असलेल्या खामगाव, जळगाव या मतदारसंघात त्यांच्या विषयी कुरबुर ऐकायला येत होती. जिल्हाप्रमुखाच्या निवडीवरून बुलडाण्यात शिवसेनेचे दोन गट उघडपणे समोरासमोर आले होते तर तर मेहकर, लोणारमधील प्रतापगडाच्या साम्राज्यालाही धक्का लागला होता. त्यातच जिल्हा बँकेचा मुद्दा राज्यभर गाजला होता; मात्र या सर्व प्रतिकुल परिस्थितीवर मात करीत प्रतापराव जाधव यांनी आपली बाजु भक्कम केली. नाराजी मोडून काढली, कार्यकर्ते जोडले, नेत्यांना सोबत घेतले, या सर्व प्रयत्नांना मोदींचा कृपाप्रसाद मिळाल्याने प्रतापरावांनी दणदणीतपणे दिल्लीत प्रवेश केला आहे.

    खरंतर राष्ट्रवादीने कृष्णराव इंगळे यांच्यासारखा अनुभवी नेता रिंगणात उतरविला होता, तो केवळ जातीचे गणीत समोर ठेवूनच. माळी समाजाचे एकगठ्ठा मतदान, मोदींच्या विरोधात असलेले मुस्लिम व भारिप-बमसंचा उमेदवार रिंगणात न ठेवल्यामुळ दलित मतांची मोट बांधुन प्रतापरावांच्या प्रती असलेल्या अँन्टी इन्कम्बन्सीचा फायदा उचलविण्याचा राष्ट्रवादीचा प्रयत्न होता, तो मोदी लाटेपुढे सपेशल फेल ठरला. विशेष म्हणजे कृष्णरावांचीही प्रचारात त्यांच्याच पक्षाने अनेकदा गोची केली. संपूर्ण पवार कुटुंबीयांनी प्रतिष्ठा लावूनही कृष्णरावांची ह्यघडीह्ण नीट बसली नाहीच, त्यांच्यासाठी माळी समाज एकवटला पण तो विजयात परावर्तीत होऊ शकला नाही. कारण लाटच मोठी होती. प्रतापरावांसाठीही मराठा समाजात एकजूट झाली, हे मान्यच. परंतु मिळालेले मताधिक्य हे केवळ मराठा एकजुटीचे नाही, हे ही मान्यच करावे लागेल. या निकालाचे विेषण करताना केवळ मोदी लाट होती. हे निकालच सांगतात, मात्र या लाटेमागील कार्यकारणभाव ही लक्षात घेणे गरजेचे आहे. लोकांना आता गृहीत धरता येणार नाही. आज ते तुमच्या सोबत असले तरी ईव्हीएमपर्यत त्यांचे मते बदलू शकतात, हे विसरता येणार नाही. लोक बोलत नाहीत करून दाखवितात याचे प्रत्यंतर या निमित्ताने आले आहे. निवडणुकीत मोठी हवा निर्माण करण्याचा आव आणलेल्या अपक्ष उमेदवार बाळासाहेब दराडे यांना तर मतदारांनी सपशेल नाकारले आहे. अण्णा, ङ्म्रीङ्म्री रविशंकर यांचा आधार घेऊन नवा विचार देण्याचा दावा करणारे दराडे हे सोशल मिडीयावर गाजले. परंतू ह्यसोशलह्ण झाले नाहीत. लोकांना आता सत्य समजते, उमजते व ते प्रगटही होते हे निकालाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य आहे. त्यामुळे येणार्‍या विधानसभेत आता पब्लीक फस्र्ट हेच लक्षात ठेवायला लागेल यात शंका नाही.

     हा निकाल म्हणजे सर्वच राजकीय पक्षांना ठेच आहे ती आता लागली फक्त पुढे शहाणा कोण होतो यावरच सारे काही अवलंबून आहे.