शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

बुलढाणा : नगर पालिकेच्या लेखी अजूनही अकोटकर हेच मुख्याधिकारी, खामगाव नगर पालिकेचा कारभार ढेपाळला

By अनिल गवई | Updated: April 5, 2023 14:16 IST

स्थानिक नगर पालिकेचे मुख्याधिकारी मनोहर अकोटकर ३१ मार्च रोजीच सेवा निवृत्त झाले.

खामगाव: स्थानिक नगर पालिकेचे मुख्याधिकारी मनोहर अकोटकर ३१ मार्च रोजीच सेवा निवृत्त झाले. त्यांचा निरोप समारंभही पालिकेत पार पडला. दरम्यान, अकोटकर यांच्या सेवानिवृत्तीला पाच दिवस लोटूनही त्यांचा नावाचा फलक पालिकेच्या दालनात आजही कायम आहे. त्यामुळे पालिकेच्या लेखी मुख्याधिकारी म्हणून मनोहर अकोटकर हेच कायम असल्याचे दिसून येते.

बुलढाणा जिल्ह्यातील सर्वात मोठी नगर पालिका म्हणून खामगाव नगर पालिकेचा नावलौकीक आहे. मात्र, अलिकडच्या काळात खामगाव नगर पालिकेचा कारभार चांगलाच ढेपाळल्याचे दिसून येत आहे. येथील नगर पालिकेचे मुख्याधिकारी मनोहर अकोटकर ३१ मार्च रोजी सेवानिवृत्त झाले. त्यांच्या सेवानिवृत्तीचा सोहळाही खामगाव पालिकेत साजरा झाला. त्यांच्या सेवानिवृत्तीला तब्बल पाच दिवस लोटले. त्यांचा कागदोपत्री प्रभार शेगाव नगर पालिकेच्या मुख्याधिकारी जयश्री काटकर यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. मात्र, त्यांनी अद्यापही खामगाव पालिकेचा प्रभार सांभाळेला नाही. परिणामी, खामगाव पालिकेचे कामकाज चांगलेच प्रभावित झाले आहे.उपमुख्याधिकारी रजेवर, अनेकांची अघोषित सुटीनगर पालिकेत मुख्याधिकारी नसतानाच उपमुख्याधिकारी दोन दिवसांच्या रजेवर गेले आहेत. बडे अधिकारी कार्यालयात नसल्याची संधी साधत काही अधिकारी आणि कर्मचारी अघोषित सुटीचा आनंद घेत आहेत. त्यामुळे पालिकेत सर्वकाही ऑलबेल असल्याचे चित्र दिसून येत आहे. मंगळवारी आणि बुधवारी कार्यालयीन वेळेत अनेक कर्मचारी गायब असल्याचे दिसून आले. उपमुख्याधिकारी वगळता कुणाच्याही सुटीचा अर्ज कार्यालयात नव्हता. वरिष्ठांचा वचक नसल्यामुळे अनेक अधिकारी, कर्मचारी चालढकल वृत्तींने कामकाज करीत असल्याने पालिकेचे कामकाज चांगलेच प्रभावित झाले आहे.

कचरा व्यवस्थापन ढेपाळले, कर वसूली रखडलीस्थानिक नगर पालिकेच्या कचरा व्यवस्थापनाचे धिंडवडे विधानसभेत निघाले. त्यानंतरही शहरातील कचरा व्यवस्थापनात कोणत्याही प्रकारचा बदल झालेला दिसून येत नाही. त्याचवेळी पालिकेची कर वसुलीही अपेक्षेप्रमाणे होत नसल्याची धक्कादायक वस्तुस्थिती समोर येत आहे. बांधकाम, पाणी पुरवठा, विद्युत या विभागासोबतच वृक्ष आणि इतर विभागातही मंगळवारी आणि बुधवारी कर्मचार्यांची संख्या रोडावल्याचे दिसून आले.

टॅग्स :buldhanaबुलडाणा