शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

Buldhana: ५८ पानटपरीधारकांवर कारवाई, १४ हजारांचा दंड, बुलढाण्यात तंबाखू नियंत्रण पथकाच्या कारवाईचे सत्र 

By ब्रह्मानंद जाधव | Updated: May 23, 2023 19:14 IST

Buldhana: बुलढाणा जिल्हा तंबाखू नियंत्रण पथकाने शहरातील पानटपरी चालकांवर २३ मे पासून कारवाईचे सत्र सुरू केले आहे. पहिल्या दिवशी तंबाखू नियंत्रण पथकाने ५८ पानटपरीधारकांवर कारवाई केली आहे.

- ब्रह्मानंद जाधवबुलढाणा : जिल्हा तंबाखू नियंत्रण पथकाने शहरातील पानटपरी चालकांवर २३ मे पासून कारवाईचे सत्र सुरू केले आहे. पहिल्या दिवशी तंबाखू नियंत्रण पथकाने ५८ पानटपरीधारकांवर कारवाई केली आहे. यामध्ये पानटपरी चालकांकडून १४ हजार रूपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार पोलिस अधीक्षक सुनील कडासने, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. भुसारी, जिल्हा आरोग्य अधिकारी एम. एम. राठोड, पाटील, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. वासेकर, ठाणेदार प्रल्हाद काटकर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा अंमलबजावणी पथकाने राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत कारवाईचे सत्र सुरू केले आहे. पहिल्याच दिवशी बुलढाणा शहरातील ५८ पानटपरीधारकांवर कारवाई केली आहे. यामध्ये पानटपरी चालकांकडून १४ हजार २०० रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. ही कारवाई तंबाखू नियंत्रण कक्षाचे जिल्हा सल्लागार डॉ. लता भोसले, समुपदेशक सरकटे, सामाजिक कार्यकर्ता आराख, अन्न औषध प्रशासन विभाग वसावे, स्थानिक गुन्हे शाखेचे जुमडे, बोचे, खेरडे यांनी ही कारवाई केली आहे.

तंबाखू नियंत्रण कार्यक्रमप्रशासकीय पातळीवरून आता तंबाखू नियंत्रण कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. भुसारी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. पाटील यांच्या मार्गदर्शनात संपूर्ण जिल्हाभर गेल्या पाच वर्षापासून हृदयरोग, मधुमेह, अर्धांगवायू, कर्करोग या आजारांसाठी कारणीभूत तंबाखू व्यसनावर मार्गदर्शन, प्रशिक्षण, मुख तपासणी, मुख कर्करोगावरील मोफत शस्रक्रिया आदी उपक्रम राबविण्यात येत आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणा