शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

 बुलडाणा: सिंदखेडराजा येथून सावित्री ज्योतीला प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2018 01:49 IST

सिंदखेडराजा: मातृतीर्थ सिंदखेड राजा येथून राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेबांना अभिवादन करून ८ मार्च रोजी सावित्री ज्योतीला प्रारंभ करण्यात आला. सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे ही ज्योत जाणार आहे.

ठळक मुद्देसातारा जिल्ह्यातील नायगाव येथे ही ज्योत जाणार

लोकमत न्यूज नेटवर्कसिंदखेडराजा: मातृतीर्थ सिंदखेड राजा येथून राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेबांना अभिवादन करून ८ मार्च रोजी सावित्री ज्योतीला प्रारंभ करण्यात आला. सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे ही ज्योत जाणार आहे.राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेबांच्या जन्मगावी जिजाऊ सृष्टी निर्माणाचे कार्य शासनाने हाती घेतले. त्याच धर्तीवर क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे जन्मगाव सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे सावित्री सृष्टी निर्माण व्हावी, या हेतूने दीपक ठाकरे, संतोष खांडेभराड, संजय मेहेत्रे यांनी गेल्या चार वर्षांपासून सावित्री ज्योत सुरू केली. ८ मार्च रोजी राजवाड्यामधून ज्योत निघाली असून, त्याचा समारोप १० मार्च रोजी नायगाव येथे होणार आहे.जागतिक महिला दिनाच्या दिवशी ८ मार्च रोजी सकाळी ८ वाजता नायगाव येथून आलेल्या सावित्रीबाई महिलांच्या ढोल पथकांच्या गजरात जिजाऊ मासाहेबांना अभिवादन करून स्मृती ज्योतीचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर भास्करराव आंबेकर, कल्याण आखाडे, सचिन गुलदड,  अ‍ॅड. नाझेर काझी, तोताराम कायंदे, श्याम जाधव, संतोष खांडेभराड, डॉ. राजेंद्र शिंगणे, आशा झोरे, वसंत    मगर, ऋषिकेश जाधव, दीपक  बोरकर, पवन झोरे, सत्यजित      खरात, विमल माळोदे, मंदा ठाकरे, धृपदराव सावळे, विश्वनाथ माळी,   डॉ. सुनील कायंदे सह आजी-माजी नगराध्यक्ष, उपाध्यक्ष, सदस्य व शहरातील सर्व पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व महिला नागरिकांनी सावित्रीबाई    फुले यांच्या प्रतिमेचे पुष्पहार घालून पूजन केले. त्यानंतर शहरामधून वाजतगाजत शोभायात्रा काढण्यात आली व स्मृतिज्योत देऊळगावराजा मार्गे जालना, औरंगाबादकडे रवाना झाली.   

टॅग्स :buldhanaबुलडाणा