शहरं
Join us  
Trending Stories
1
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
2
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
3
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
4
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
5
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
6
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
7
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
8
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
9
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
10
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
11
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
12
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
14
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
15
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
16
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
17
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
18
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
19
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
20
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा

बुलडाणा, साखरखेडर्य़ात शोककळा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2017 00:37 IST

बुलडाणा :  पोटाची भूक भागविण्यासाठी दररोज हजारो तरूण कामासाठी धावत असतात. त्यातच बुलडाणा शहरातील इकबाल नगरातील अनेक तरूण काम करण्यासाठी जिल्ह्याबाहेरही दररोज ये-जा करतात. इकबाल नगरातील पाच व्यक्ती नेहमीप्रमाणे वेल्डींगचे काम करण्यासाठी इतर कामगारांसोबत  ऑटोने बाळापूरकडे निघाले होते. दरम्यान, आज सकाळी टेंभुर्णा फाट्याजवळ समोर असलेल्या ट्रकला ओव्हरटेक करीत असताना समोरून येणार्‍या एका ट्रकने जोरदार धडक दिल्याने इकबाल नगरातील शे.आसिफ हा तरूण जागीच ठार झाला, तर इतर चार व्यक्ती जखमी झाले. कुटुंबीयांचे पालनपोषण करण्यासाठी आपल्या वडिलांना हातभार लावणार्‍या शे.आसिफचा घटनास्थळीच मृत्यू झाल्याने इकबाल नगरावर शोककळा पसरली आहे.

ठळक मुद्देट्रक-ऑटो अपघात साखरखेडर्य़ाच्या दोघांचा समावेश  

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा :  पोटाची भूक भागविण्यासाठी दररोज हजारो तरूण कामासाठी धावत असतात. त्यातच बुलडाणा शहरातील इकबाल नगरातील अनेक तरूण काम करण्यासाठी जिल्ह्याबाहेरही दररोज ये-जा करतात. इकबाल नगरातील पाच व्यक्ती नेहमीप्रमाणे वेल्डींगचे काम करण्यासाठी इतर कामगारांसोबत  ऑटोने बाळापूरकडे निघाले होते. दरम्यान, आज सकाळी टेंभुर्णा फाट्याजवळ समोर असलेल्या ट्रकला ओव्हरटेक करीत असताना समोरून येणार्‍या एका ट्रकने जोरदार धडक दिल्याने इकबाल नगरातील शे.आसिफ हा तरूण जागीच ठार झाला, तर इतर चार व्यक्ती जखमी झाले. कुटुंबीयांचे पालनपोषण करण्यासाठी आपल्या वडिलांना हातभार लावणार्‍या शे.आसिफचा घटनास्थळीच मृत्यू झाल्याने इकबाल नगरावर शोककळा पसरली आहे.बुलडाणा शहरातील इकबाल नगरात बांधकाम, वेल्डींग आदी जड कामे करणार्‍या मजुरांचा कुटुंबियांची मोठय़ा प्रमाणात घरे आहेत. त्यामुळे बाळापूर येथे वेल्डींगचे मोठे काम मिळाल्यामुळे भुसावळ, साखरखेर्डासह इकबाल नगरातील साबिरशाह अलीशाह वय ४२, आबिदशहा अलील शहा वय २५, शे.अमीर शे.शबिर वय २३ व शे.आसिफ शे.शशिद वय २६ हा तरूण वडील रशिदखा नासिरखा वय ६५ यांच्यासह इतर ठिकाणच्या मजुरांसह एका ऑटोने बाळापूरकडे निघाले होते. यावेळी मजुरांमध्ये कामाबाबत चर्चा सुरू असताना टेंभुर्णा फाट्याजवळ ेसमोर असलेल्या ट्रकला ओव्हरटेक करीत असताना समोरून येणार्‍या एक ट्रकने जोरदार धडक दिली. धडक एवढी भीषण होती की, ऑटोतील इकबाल नगरातील रहिवासी शे.आसिफ शे.रशिद  हा तरूण जागीच ठार झाला तर शे.आसिफचे वडील रशिदखा नासिरखा, साबिरशाह अलीशाह , आबिदशहा अलील शहा, शे.अमीर शे.शबिर हे चौघे गंभिर जखमी झाले. या घटनेतील जखमींना उपचारार्थ सामान्य रुग्णालयात भरती करण्यात आले. या घटनेची माहिती मिळताच इकबाल नगरावर शोककळा पसरली. शे.आसिफच्या जाण्याने रशिदखा नासिरखा कुटुंबियातील सदस्यांनी एकच हंबरडा फोडला. दरम्यान, शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार यू.के. जाधव, ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार शे.रफिक, भाजपा शहराध्यक्ष संजय शिनगारे, एमआयएमचे शहराध्यक्ष आरिफ पहेलवान, बुलडाणा पालिकेचे  सदस्य मो.सज्जाद, रमेश अवचार, संजय खंडेराव यांनी रुग्णालयात   धाव घेऊन जखमींची विचारपूस केली.  

शे.आसिफवर संध्याकाळी उशिरा दफनविधीइकबाल नगरातील शे.आसिफ या तरूणचा मित्रवर्ग मोठा होता. त्याच्या अचानक जाण्याने मित्रवर्गासह कुटुंबियावर शोककळा पसरली. या अपघाताची माहिती मिळताच अनेक नातेवाईक, मित्रांनी इकबाल नगरात धाव घेऊन शे.आसिफच्या कुटुंबियांचे सांत्वन केले. दरम्यान, संध्याकाळी उशिरा मलकापूर रस्त्यावरील कब्रस्थानात शे.आसिफचा दफनविधी करण्यात आला.

मृतांमध्ये साखरखेडर्य़ातील दोन मजूरसाखरखेर्डा : येथील  दोन बांधकाम मजूर  टेंभुर्णा फाट्याजवळ झालेल्या ऑटोच्या भीषण अपघातात ठार झाल्याने साखरखेर्डा गावात शोकाकुल वातावरण निर्माण झाले. आज सकाळी कामानिमित्त साखरखेर्डा येथील समाधान झिने वय ४0 वर्षे आणि भागाजी कांबळे  ४५ हे दोघे निघाले होते; मात्र टेंभुर्णा फाट्याजवळ झालेल्या अपघातात हे दोघेही ठार झाले. अपघाताची माहिती नातेवाइकांना कळताच साखरखेर्डा येथील वार्ड क्र.६ मधील झोपडपट्टीत एकच आक्रोश झाला. दोघेही बांधकाम मजूर म्हणून साखरखेर्डा येथील ठेकेदार भगवान लवकर यांनी वरुड येथील जि.प.प्राथमिक शाळेचे काम घेतले होते. त्या कामावर जात असताना त्यांच्यावर काळाने झडप घातली. आज रात्री ८ वाजता मोठय़ा शोकाकुल वातावरणात समाधान झिने यांच्यावर साखरखेर्डा येथे तर भागाजी कांबळे यांच्यावर सासरी सावंगीवीर प्रल्हाद सुखधाने यांच्याकडे अंतिम संस्कार करण्यात आले. अपघात घडताच साखरखेर्डा येथून भगवान लवकर, दत्ता लवकर, ग्रा.पं.सदस्य राजू डुकरे यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली, तर कुटुंबियांचे सांत्वन करण्यासाठी माजी सैनिक अर्जुन गवई, नामदेव गवई, शालीग्राम गवई आणि समाजबांधव सहभागी झाले होते. समाधान झिने यांच्या पश्‍चात दोन मुले,  मुलगी, पत्नी, आई-वडील असा परिवार आहे.