शहरं
Join us  
Trending Stories
1
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
2
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video
3
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
4
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
5
वॉरेन बफेटही चुकले! ज्या कंपनीत हात घातला तीच बुडाली, सर्वात मोठं नुकसान! नेमकं काय घडलं?
6
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
7
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
8
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
9
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!
10
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
11
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
12
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
13
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
14
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
15
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
16
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
17
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
18
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
19
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
20
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे

बुलडाणा :‘लॉकडाउन’मुळे चार एमआयडीसीमधील उद्योगधंद ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2020 15:04 IST

बुलडाणा जिल्ह्यात येळगाव, खामगाव, चिखली व मलकापूर येथे एमआयडीसी आहेत.

- योगेश देऊळकार लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : ‘लॉकडाउन’मुळे जिल्ह्यातील चारही एमआयडीसींमधील उद्योगधंदे ठप्प झाले आहेत. सध्या जीवनावश्यक वस्तुंचेच उत्पादन सुरू आहे. यामुळे संबंधित कंपन्यांना खूप मोठा आर्थिक फटका बसत आहे. कामगारांच्या उदरनिर्वाहाचाही प्रश्न निर्माण झाला असल्याचे चित्र आहे.  बुलडाणा जिल्ह्यात येळगाव, खामगाव, चिखली व मलकापूर येथे एमआयडीसी आहेत. यापैकी खामगाव येथील एमआयडीसी सर्वात मोठी असून येथे इतर ठिकाणच्या तुलनेत सर्वाधिक वस्तुंचे उत्पादन होते. यामध्ये सिमेंट, वीटा, पॅकींग फुड, मसाला, बिस्कीट, साबण यासह विविध प्रकारच्या उत्पादनांचा समावेश आहे. या सर्व उत्पादनांच्या निर्मितीसाठी जिल्ह्यातील हजारो कामगार याठिकाणी कार्यरत आहेत. या उद्योगधंद्यांमुळे स्थानिक नागरिकांना रोजगार प्राप्त झाला आहे. मात्र सध्या ‘लॉकडाउन’मुळे जीवनावश्यक वस्तू वगळता इतर वस्तुंचे उत्पादन पूर्णपणे बंद आहे. यामुळे येथे कार्यरत असलेल्या कामगारांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. ‘लॉकडाउन’ आणखी ३ मे पर्यंत असल्याने कामगारांच्या अडचणीत वाढ झाली आहे.  संबंधित कंपन्यांनादेखील खूप मोठा आर्थिक फटका बसला आहे. ‘लॉकडाउन’ उठल्यानंतरही हे सर्व उद्योगधंदे सुरळीत होण्यासाठी खूप मोठा कालावधी लागणार असल्याचे उद्योजकांनी सांगितले आहे. 

कामगारांना घरबसल्या वेतन मिळणार का?‘कोरोना’ चा प्रादुर्भाव टाळण्यासाठी राज्यातील विविध कंपन्यांनी उत्पादन बंद ठेवले आहे. यापैकी काही कंपन्यांनी काम बंद असले तरी कामगारांना वेतन देणार असल्याचे स्पष्ट केले आहे. मात्र जिल्ह्यातील किती कंपन्या कामगारांना घरबसल्या वेतन देणार? असा प्रश्न उपस्थित होत आहे. याबाबत अद्याप कोणत्याही प्रकारचा दुजोरा मिळाला नाही.

महिलांचेही अर्थचक्र बिघडलेजिल्ह्यातील छोट्या उद्योगांच्या ठिकाणी अनेक महिलादेखील काम करतात. आता संबंधित उद्योग बंद असल्याने त्या महिलांना घरीच थांबावे लागत आहे. यापैकी बºयाच महिला घरखर्च चालविण्यासाठी हातभार लावत असतात. सध्या  उत्पन्न बंद असल्याने त्यांचे अर्थचक्र बिघडले आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाkhamgaonखामगावMIDCएमआयडीसी