शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

कर्णबधिरांच्या बेरा टेस्टची बुलडाणा जिल्ह्यात सुविधाच नाही !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2017 21:09 IST

बुलडाणा जिल्ह्यात ७ ठिकाणी कर्णबधिर विद्यालये.

ठळक मुद्देमुंबई, औरंगाबादला घ्यावे लागतात हेलपाटे शाळा प्रवेशात अडचण

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : जिल्ह्यातील विविध कर्णबधिर विद्यालयात प्रवेश घेण्यासाठी कर्णबधिरांचे बेरा टेस्ट प्रमाण पत्र आवश्यक आहे. जिल्हा शल्य चिकित्सकांकडून ही तपासणी करण्यात येते; परंतु जिल्ह्यात ही सुविधाच उपलब्ध नाही. त्यामुळे कर्णबधिरांच्या शाळा प्रवेशात अडचणी निर्माण होत असून, पालकांना मुंबई, औरंगाबाद येथे हेलपाटे घ्यावे लागत आहेत.जिल्ह्यात खामगाव, मलकापूर, बुलडाणा, लोणार, हिवरा आश्रम, देऊळगाव मही व चांडोळअशा ७ ठिकाणी कर्णबधिर विद्यालये आहेत. या विद्यालयांमध्ये कर्णबधिर विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जा तो; मात्र प्रवेशाकरिता या विद्यार्थ्यांचे बेरा टेस्ट प्रमाणपत्र आवश्यक असते. जिल्हा शल्य चिकित्सक कर्णबधिर मुलांची तपासणी करून त्यांना हे प्रमाणपत्र देतात; परंतु सदर तपासणीसाठी लागणारी साधनसामग्री जिल्हा सामान्य रुग्णालयात उपलब्ध नाही. त्यामुळे बुलडाण्यात ही तपासणी होऊ शकत नसल्याने पालकांची अडचण होत आहे. अकोला येथे ही तपासणी करण्याची सुविधा खासगी रुग्णालयात उपलब्ध आहे; परंतु तेथील तपासणीचे प्रमाणपत्र शाळा प्रवेशाकरिता ग्राह्य धरले जात नाही. त्यामुळे कर्णबधिर मुलांच्या पालकांना मुंबई, पुणे किंवा औरंगाबाद येथे सदर तपासणी करण्यासाठी जावे लागते. यामध्ये त्यांना आर्थिक, शारीरिक व मानसिक त्रास सहन करावा लागतो. तरी संबंधितांनी याकडे लक्ष देऊन सदर तपासणीची सुविधा जिल्हा सामान्य रुग्णालयात उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी कर्णबधिर मुलांच्या पालकांकडून होत आहे.खामगावात नाही नाक,कान,घसा तज्ज्ञयेथील सामान्य रुग्णालयास जिल्हा रुग्णालयाचा दर्जा प्राप्त झालेला आहे; पण याठिकाणी नाक,कान,घसा तज्ज्ञ उपलब्ध नाहीत, त्यामुळे लहान-सहान तपासण्यांसाठी अकोला येथे धाव घ्यावी लागते. आरोग्याच्या बाबतीत सुविधांचा अभाव रुग्णांसह कर्णबधिरांसाठी त्रासदायक ठरत आहे.