शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाणा जिल्ह्यात सरासरी २५ टक्के कमी पाऊस!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2017 21:59 IST

सर्वत्र रिमझिम पाऊस, प्रकल्प कोरडेच!

हर्षनंदन वाघ।लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : जिल्ह्यात मागिल चार-पाच दिवसांपासून सर्वत्र रिमझिम पाऊस सुरू झाला आहे. या  पावसामुळे पिकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला असला, तरी जिल्ह्यातील प्रकल्प मात्र कोरडे आहेत. मागिल वर्षीेपेक्षा यावर्षी जवळपास सरासरी २५ टक्के कमी पाऊस असल्यामुळे भविष्यात पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे.यावर्षी पाऊस चांगला होणार असल्याचे संकेत हवामान विभागाने दिले होते. त्यानुसार थोड्या उशिरा का होईना, पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे अनेक शेतकºयांनी पेरणीला सुरुवात केली; मात्र पिकांनी जमिनीबाहेर मान काढल्यानंतर पावसाने दडी मारली. त्यामुळे अनेक परिसरातील पिके कोमेजली.  दरम्यान, दोन दिवस कमी-जास्त प्रमाणात पाऊस झाल्याने काही प्रमाणात पिकांना दिलासा मिळाला,  तर अनेक शेतकºयांनी दुबार पेरणी केली. त्यानंतर पुन्हा आॅगस्ट महिन्यात सुरुवातीला दडी मारल्याने  चांगल्या परिस्थितीत असलेल्या पिकांनी माना टाकायला सुरुवात केली. आता पुन्हा मागिल चार-पाच दिवसांपासून जिल्ह्यात रिमझिम पाऊस सुरू झाला आहे. या पावसामुळे पुन्हा शेतकºयांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत; मात्र पावसाचे प्रमाण पाहता भविष्यात तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे.जिल्ह्याचे सरासरी पर्जन्यमान सरासरी ७१२.७ मि.मी. आहे. मागिलवर्षी आज पर्यंत ५५५.४ मि.मी.  पाऊस झाला होता, तर यावर्षी ४१९.२ मि.मी. पाऊस झाला आहे. यावरून मागिल वर्षीपेक्षा यावर्षी सरासरी २५ टक्के कमी पाऊस झाला आहे. त्यामुळे यावर्षी सरासरी पावसाचे प्रमाण कमी झाल्यामुळे जिल्ह्यात प्रकल्पात अल्प जलसाठा असून, भविष्यात तीव्र पाणी पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे.आतापर्यंत सरासरी ४१९ मि.मी. पाऊसयावर्षी पावसाळा सुरू झाल्यानंतर आजपर्यंत सरासरी ४१९.२ मि.मी. पाऊस झाला असून, रविवारी रात्री ते सोमवारी सकाळी ८ वाजेपर्यंत जिल्ह्यात सरासरी ३२.६ मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली आहे. त्यात बुलडाणा तालुक्यात २९.० मि.मी., चिखली १७.०, देऊळगाव राजा ४८.०, मेहकर १६.०,  लोणार ९०.०, सिंदखेड राजा ३९.६, मलकापूर ३२.०, नांदूरा ३६.०, मोताळा ४२.०, खामगाव ०४.२,  शेगाव २१.०, जळगाव जामोद ३७.०, संग्रामपूर तालुक्यात १०.० मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली आहे.तब्बल ४५ दिवसांनंतर पावसाची हजेरीधाड : तब्बल ४५ दिवसानंतर बुलडाणा तालुक्यात पावसाने दमदार हजेरी लावत खरिपांच्या पिकांना जीवनदान दिले; मात्र या भागात प्रदीर्घ पावसाच्या उघडीपीचा सोयाबीन, मका, कपाशी या नगदी  पकांना ३० टक्के फटका बसला आहे. शेवटी प्रदीर्घ खंडानंतर १९ आॅगस्ट रोजी सकाळी ११ वाजता सुरू झालेला संततधार पाऊस २० आॅगस्ट रोजी सकाळी १० पर्यंत सुरूच होता. अगोदरचकर्जमाफीच्या घोषणा आणि प्रत्यक्ष अंमलबजावणी यामध्ये हैराण झालेल्या शेतकºयास दुष्काळी स्थितीने गलीतगात्र केले. शेतशिवारात पिके सुकून माना टाकताना दिसत होते.