बुलडाणा : जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. शिवाजीराव गजरे यांना गुरूवारी हृदयविकाराचा झटका आला. सध्या त्यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. डॉ. गजरे हे नेहमीप्रमाणे दुपारी शासकीय कामात व्यस्त असताना त्यांच्या छातीत अचानक दुखू लागले. ही बाब येथील डॉक्टर व कर्मचारी यांच्या लक्षात येताच त्यांना लद्धड हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
बुलडाणा जिल्हा शल्यचिकित्सकांना हृदयविकाराचा धक्का
By admin | Updated: October 10, 2014 22:58 IST