शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी सक्तीच्या भूमिकेवरून साहित्यिक एकवटले; कवीने परत केला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार
2
'आप'ने पुन्हा पाडलं भाजपाच्या गडाला खिंडार; पोटनिवडणुकीतील दणदणीत विजयाची ५ कारणे काय?
3
"आधे इधर जाओ, आधे उधर जाओ, बाकी मेरे पीछे आओ" परराष्ट्र धोरणावरून काँग्रेसची सरकारवर टीका
4
अमेरिकेच्या बंकर बस्टर बॉम्बची ताकद किती? हा बॉम्ब कुणी बनवला?
5
बाजारात येणाऱ्या जाणाऱ्या महिलांना पाहून करत होता अश्लील इशारे;२० वर्षीय तरुणाला पोलिसांनी केली अटक
6
Inflation: २० वर्षांनंतर एक कोटींचं मूल्य असेल फक्त २५ लाख; महागाई कशी कमी करतेय तुमच्या पैशांचं मोल?
7
आम्ही ४ वर्षांपासून बोलत नव्हतो! संजय कपूर यांच्या निधनानंतर बहिणीची पोस्ट, म्हणाली- "जे काही घडलं ते भयानक..."
8
काळ आला होता पण..; घरगुती सिलिंडरचा भीषण स्फोट, पाहा अंगावर काटा आणणारा Video
9
'आम्हाला तिथेच लढायचेय' इराण-इस्रायल, अमेरिका युद्धात WWE का इरेला पेटला...
10
Ashadhi Ekadashi 2025: पांडुरंगाने कानात मकरकुंडले का धारण केली? मत्स्यावताराशी काही संबंध?
11
"तुम्ही विमान उडवण्याच्या लायक नाही, जा बूट...", इंडिगोच्या प्रशिक्षणार्थी पायलटचा वरिष्ठ अधिकाऱ्यांवर जातीभेदाचा आरोप; एफआयआर दाखल
12
Cluster Bomb: क्लस्टर बॉम्ब म्हणजे काय, १२३ देशांमध्ये त्यावर बंदी का?
13
गुजरातमध्ये 'आप'कडून मोदी आणि भाजपाला जबर धक्का, पोटनिवडणुकीत मिळवला दणदणीत विजय
14
ट्रम्प यांना नोबेल पुरस्कार देण्याची शिफारस आली अंगलट; पाकिस्तानी नेत्यांची पुन्हा फजिती
15
तुमचेही पैसे रिअल इस्टेटमध्ये अडकलेत का? फक्त १% लोकच कमवतायत नफा! तुम्ही 'या' चुका तर करत नाहीये ना?
16
Iran Israel War: मोठ्या संकटात अडकलाय भारत; ३.६ लाख कोटींचा आकडा का घाबरवतोय?
17
Assembly Bypoll Result 2025: पोटनिवडणुकांचे निकाल! गुजरातमध्ये एका जागेवर आप भाजपाला टक्कर देतेय; पंजाबमध्ये संजीव अरोरा आघाडीवर
18
नवीन युगाची सुरुवात! ड्रायव्हरशिवाय धावल्या गाड्या; Tesla ची Robotaxi सेवा सुरू...
19
सोनम रघुवंशीला 'वाचवणारा आणि लपवणारा' लोकेंद्र तोमर कोण? राजा हत्याकांडात आणखी एक मोठा खुलासा
20
Devendra Fadnavis: राहुल गांधींना मेक इन इंडिया माहिती नाही, त्यांनी गृहपाठ करायला हवा; फडणवीसांचा टोला!

बुलडाणा जिल्ह्यात ३८ दिवसानंतर ५४ टक्केच लसीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2021 11:40 IST

coronavaccine news कर्मचाऱ्यांच्या लसीकरणाने आता वेग घेतला असला तरी लसीकरण मोहिमेचा सरासरी वेग कमीच आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : कोरोना लसीकरणास प्रारंभ होऊन ३८ दिवस पूर्ण झाल्यानंतरही आरोग्य कर्मचारी व फ्रंटलाईन कर्मचारी मिळून केवळ ५४ टक्केच लसीकरण झाले आहे. एकीकडे कोरोनाचे संक्रमण जिल्ह्यात वाढत असताना त्या तुलनेत हा वेग कमी असल्याचे चित्र आहे. त्यातच फ्रंटलाईन कर्मचाऱ्यांच्या लसीकरणाने आता वेग घेतला असला तरी लसीकरण मोहिमेचा सरासरी वेग कमीच आहे.प्रामुख्याने आरोग्य कर्मचाऱ्यांच्या लसीकरणाचा वेग कमी आहे. बुलडाणा जिल्ह्यात २६,५५० आरोग्य कर्मचारी व फ्रंटलाईन कर्मचाऱ्यांना कोरोना लस देण्याचे उद्दिष्ट असून, १८ हजार १०० आरोग्य कर्मचाऱ्यांपैकी आतापर्यंत ११ हजार ९५ कर्मचाऱ्यांनीच लस घेतली आहे, तर फ्रंटलाईन कर्मचाऱ्यांचे लसीकरण उशिरा सुरू होऊनही ते ३७ टक्क्यांवर पोहोचले आहे. विशेष म्हणजे बऱ्याच फ्रंटलाईन कर्मचाऱ्यांची पोर्टलवर नोंद होण्यास विलंब झाला होता.  ८,४५० फ्रंटलाईन कर्मचाऱ्यांपैकी ३१४४ कर्मचाऱ्यांनी आतापर्यंत लस घेतली आहे. त्यामुळे  फ्रंटलाईन कर्मचाऱ्यांच्या लसीकरणाचा वेग सध्या वाढलेला दिसत आहे.  बुलडाणा जिल्हा सामान्य रुग्णालयातील लसीकरण केंद्रावर २४ फेब्रुवारी रोजी प्रत्यक्ष पाहणी केली असता प्रामुख्याने फ्रंटलाईन कर्मचाऱ्यांचीच संख्या त्या अधिक असल्याचे निदर्शनास आले.बुलडाणा जिल्ह्यात एकूण १३ केंद्रांवर कोराेना प्रतिबंधक लसीकरण करण्यात येत आहे. प्रतिदिन एका केंद्रावर किमान महत्तम ५० व्यक्तींना कोरोना लस देण्यात येते. मंगळवार व रविवारी हे लसीकरण बंद असते. त्यातच नोंदणी केलेल्या काही कर्मचाऱ्यांची नावे अद्याप ॲपवर दिसत नाहीत. त्यामुळे अडचणी असल्याचे एका कर्मचाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले.  पहिल्या डोसानंतर १०९२ जणांनी कोरोनाचा दुसरा डोस घेतला आहे. हे सर्व आरोग्य विभागातील कर्मचारी आहेत. फ्रंटलाईन वर्कर्सचे अद्याप दुसऱ्या टप्प्यातील लसीकरण झालेले नाही. 

एकही डोस गेला नाही वायाजिल्ह्यात सध्याच्या घडीला ५९,१०० व्हॅक्सिनचे डोस उपलब्ध असून, बुलडाणा येथील डिस्टिक व्हॅक्सिन स्टोअरमध्ये सुसज्ज शीतकरण साखळीमध्ये ते ठेवण्यात आलेले आहे. कोविशिल्डचे ५१,१०० तर को-वॅक्सिनचे ७,१०० डोस उपलब्ध झालेले आहे.  जिल्ह्यातील अन्य केंद्रांवर बुलडाणा येथून जवळपास आठवडाभर पुरतील एवढे व्हॅक्सिन देण्यात येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

प्रतीक्षालयात गर्दीकोरोना लसीकरणासाठी आलेल्यांची बुलडाणा लसीकरण केंद्रावर गर्दी झाल्याचे निदर्शनास आले. या ठिकाणी सुरक्षित अंतरही राखल्या गेले नव्हते. त्या तुलनेत निरीक्षण केंद्रामध्ये योग्य पद्धतीने शारीरिक अंतर पाळल्या जात होते तर आरोग्य यंत्रणाही येते सज्ज होती.

टॅग्स :buldhanaबुलडाणाCorona vaccineकोरोनाची लस