शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाणा जिल्ह्यात गुरांची संख्या लाखोंच्या घरात; लस मात्र २० हजारच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2019 12:39 IST

गुरांची संख्या लाखोंच्या घरात असतानाही घटसर्प नावाची लस मात्र २० हजारच उपलब्ध झाली आहे. लसीकरणाच्या बाबतीत पशुवैद्यकीय विभागाच्या अनास्थेमुळे मुक्या प्राण्यांच्या आरोग्याचे काय? असा प्रश्न निर्माण होत आहे. 

- ब्रम्हानंद जाधव बुलडाणा: गुरांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी, पावसाळ्यापूर्वीच लसीकरण मोहीम राबविणे आवश्यक आहे. परंतू जिल्ह्यातील मुक्या प्राण्यांच्या अरोग्याची काळजी घेणाºया पशुवैद्यकीय विभागाकडेच पावसाळी लसीकरणाचा तुटवडा दिसून येत आहे. गुरांची संख्या लाखोंच्या घरात असतानाही घटसर्प नावाची लस मात्र २० हजारच उपलब्ध झाली आहे. लसीकरणाच्या बाबतीत पशुवैद्यकीय विभागाच्या अनास्थेमुळे मुक्या प्राण्यांच्या आरोग्याचे काय? असा प्रश्न निर्माण होत आहे. जनावरांच्या आरोग्याची भीस्त असलेल्या पशुवैद्यकीय दवाखान्याकडे कधी लसींचा अभाव, तर कधी कर्मचाºयांची रीक्त पदे अशा एक, ना अनेक समस्या कायमच असतात. सध्या अर्धा पावसाळा आटोपलेला असतानाही जनावरांचे लसीकरण पूर्ण झालेले नाही. पावसाळ्यात पावसाचे प्रमाण वाढल्यानंतर पाणी दुषित होणे, चाºयांवर किडीचा प्रादूर्भाव होणे असे प्रकार घडतात. याचा परिणाम गुरांवर होतो दुषित पाणी आणि किड लागलेला चारा खाण्यात गेल्याने विविध आजारांची लागण होते. त्यात घटसर्प या भयंकर आजाराचा समावेश आहे. या आजाराचा प्रसार दिवसेंदिवस वाढतच असल्याने गुरांचे आरोग्य धोक्यात सापडले आहे. अशा परिस्थितीत पशू संवर्धन विभागाकडून लसीकरण मोहिम राबविण्यासह गुरांची नियमित आरोग्य तपासणी करणे गरजेचे असते; परंतु पशू संवर्धन विभागाकडून त्याची दखल घेण्यात येत नसल्याचे दिसून येते. मागील पशुगणनेनुसार जिल्ह्यात १० लाख २० हजार ३७ पशुधन आहे. त्यामध्ये गायवर्ग व म्हैसवर्ग ५ लाख ६७ हजार ७३३, शेळ्यांची संख्या २ लाख ८४ हजार १७, मेंढ्यांची संख्या १ लाख ७ हजार ३० आहे. जिल्ह्यात लाखोंच्या संख्येने पशुधन असतानाही जिल्हा पशुसंवर्धन विभागाकडे घटसर्प नावाच्या केवळ २० हजार लस उपलब्ध झाल्या आहेत. जनावरांच्या संख्येच्या तुलनेत लसीचे प्रमाण अत्यल्प आहे. लसीकरणाअभावी जिल्ह्यातील लाखो जनावरांना पावसाळ्यात उद्भवणाºया आजारांचा धोका निर्माण झाला आहे.

 जिल्ह्यासाठी १६ हजारावर एकटांग्या लस उपलब्ध दोन वर्षाखालील जनावरांना पावसाळ्यामध्ये एकटांग्या नावाची लस दिल्या जाते. जिल्ह्यात छोट्या जनावरांची संख्या सुद्धा लाखोंच्याच घरात आहे. मात्र एकटांग्या नावाची लस अत्यंत कमी प्रमाणात उपलब्ध असल्याचे दिसून येते. पावसाळ्यात जनावरांच्या लसीकरणासाठी एकटांग्या नावाची १६ हजार ३५० लस जिल्ह्यासाठी उपलब्ध झाली आहे. तर घटसर्प नावाची लस २० हजारावर उपलब्ध झाल्याची माहिती आहे. ह्या दोन्ही प्रकारच्या लसींचे जिल्हाभरातील पशुवैद्यकीय संस्थांना वाटप करण्यात आलेली आहे. पशुवैद्यकीय विभागाकडून सध्या गावोगावी गुरांचे लसीकरण सुरू असल्याची माहिती आहे. परंतू जनावरांच्या तुलनेत ही लस अत्यंत कमी आहे. 

पुणे येथून येते लस, महिना अखेरपर्यंत इतर लस येणारपशुंना पावसाळ्यात संसर्गजन्य आजार होऊ नयेत, यासाठी जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाच्या वतीने पावसाळ्यापूर्वी जनावरांना प्रतिबंधात्मक लस दिली जाते. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पशुधन आहे. जिल्ह्यातील पशुधनाकरीता दिली जाणारी लस ही पुणे येथून येत असते. पावसाळ्यात जनावरांना विशेष करून घटसर्प, एकटांग्या, चौखुरा, आंत्रपिशार, शेळ्यांची पीपीआर, शेळ्या, मेंढ्यांवर येणारा देवी रोग आदी संसर्गजन्य रोगांचा प्रसार होते. यामुळे कित्येक जनावरे मृत्यूमुखी पडण्याची शक्यता राहते. या सर्व रोगांपासून जनावरांचा बचाव करण्यासाठी पावसाळा लागताच लसीकरण होणे आवश्यक आहे. त्यामुळे शासनाच्या मार्फत पशुसंवर्धन विभागाला औषध व लस पुरवठा केला जातो.

पशुगणनेचा आकडा गुलदस्त्यातमागील काही दिवसांपूर्वी झालेल्या पशुगणनेचा आकडा अद्यापही जिल्हा पशुसंवर्धन विभागाकडे उपलब्ध झाला नाही. पशुगणनेची संपूर्ण प्रक्रिया आॅनलाइन असल्याने जिल्ह्यातील पशुंची संख्या आॅनलाइनच उपलब्ध होईल अशी माहिती सुत्रांनी दिली. परंतू अद्याप जिल्ह्यातील पशुगणनेची संख्या गुलदस्त्यात ठेवण्यात आली आहे. 

जिल्ह्यात आवश्यक त्या ठिकाणी लसीकरण मोहीम सुरू आहे. सध्या घटसर्प लस २० हजार व एकटांग्याची १६ हजार ३५० लस उपलब्ध झाली आहे. उर्वरीत लस लवकरच उपलब्ध होईल. पुण्यावरून ही लस येते. त्यामुळे त्यांच्याकडून उपलब्ध झाल्यास ते लगेच कळवतात. आॅगस्टपर्यंत ही लस देणे आवश्यक आहे.  - डॉ. पुरूषोत्तम सोळंके, सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन, पशुवैद्यकीय विभाग, बुलडाणा.

टॅग्स :buldhanaबुलडाणा