शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाणा जिल्ह्यात ‘बर्ड फ्लू’ संकटाच्या पृष्ठभूमीवर उपाययोजना सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2021 12:09 IST

Bbird flu पशुवैद्यकीय कर्मचाऱ्यांकडून रोजच्या आणि आठवडी बाजारात विशेष सर्वेक्षण मोहीम राबविण्यात येणार आहे. 

ठळक मुद्दे१४ पथक (आरआरटी) स्थापन करण्यात आले आहेत. पीपीई किटचा मुबलक साठा उपलब्ध करून ठेवण्यात येत आहे.

- ब्रह्मानंद जाधवलोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: राजस्थान, हिमाचल प्रदेश, मध्य प्रदेशमध्ये ‘बर्ड  फ्लू’मुळे काही पक्ष्यांचा मृत्यू झाला. जिल्ह्यात ‘बर्ड फ्लू’ संकटाच्या पृष्ठभूमिवर ८ जानेवारीपासून प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू झाल्या आहेत. जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभागाकडून १४ पथक (आरआरटी) स्थापन करण्यात आले आहेत. पशुवैद्यकीय कर्मचाऱ्यांकडून रोजच्या आणि आठवडी बाजारात विशेष सर्वेक्षण मोहीम राबविण्यात येणार आहे. इतर राज्यांमध्ये कावळे, वन्य पक्षी व स्थलांतरी पक्षी यांच्यामध्ये ‘बर्ड फ्लू’ रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. बर्ड फ्लू’ पार्श्वभूमिवर रोग अन्वेषण विभागाकडून सतर्कता बाळगण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार बुलडाणा जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभागाने खबरदारीची भूमिका घेत शासनाच्या सूचनांनुसार आवश्यक त्या उपाययोजना राबविणे सुरू केले आहे. पशुसंवर्धन सहआयुक्तांकडून जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभागाला ७ जानेवारी रोजी उशिरा प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत  सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार ८ जानेवारीला जिल्हा परिषदेकडून प्रत्येक तालुका स्तरावर एक दक्षता पथक नेमण्यात आले आहे. जिल्हा स्तरावर आरआरटी पथक (रॅपिड रिस्पॉन्स टेस्ट) स्थापन करण्यात आले आहे. शिवाय पीपीई किटचा मुबलक साठा उपलब्ध करून ठेवण्यात येत आहे. सध्या जिल्ह्यात कुठेही ‘बर्ड फ्लू’मुळे पक्ष्यांचा मृत्यू झाला नसला, तरी प्रतिबंधात्मक उपाययोजनांकडे पशुसंवर्धन विभागाने लक्ष केंद्रित केले आहे. 

पक्ष्यांच्या वाहतुकीवर बंदीबुलडाणा जिल्ह्यातून विदर्भासह मराठवाड्यातही पक्ष्यांची वाहतूक होते; परंतु ‘बर्ड फ्लू’मुळे आता या वाहतुकीला आळा बसणार आहे. संशयीत क्षेत्रावरून पक्ष्यांची वाहतूक व ने-आण करण्यावर बंदी घालण्यात आली आहे. सर्वेक्षणासाठी रोग नमुने नियमित प्रयोगशाळेत पाठविण्यात येणार आहेत. 

‘बर्ड फ्ल्यू’ रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येत आहेत. पशुसंवर्धन आयुक्तांकडून आलेल्या मार्गदर्शक सुचनांनुसार नियोजन करण्यात आले आहे. डॉ. की. मा. ठाकरे, पशुसंवर्धन अधिकारी, बुलडाणा. 

तालुकास्तरावर दक्षता पक्षकांची स्थापना करण्यात आली आहे. पोल्ट्री फार्मसाठी जैवसुरक्षाबाबत सुचना देण्यात येत आहेत. प्रत्येक पोल्ट्री फार्मसनी पक्षांच्या आरोग्यासाठी मुलभूत स्वच्छता विषयक नियमांचे पालन करावे.  डॉ. तृप्ती पाटील, पशुधन विकास अधिकारी, जिल्हा परिषद, बुलडाणा.

टॅग्स :buldhanaबुलडाणाBird Fluबर्ड फ्लू