शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाणा जिल्ह्याची काेराेनामुक्तीकडे वाटचाल!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2021 10:54 IST

Buldana district on its way to become CoronaFree : जिल्ह्यात साेमवारी केवळ १६ सक्रिय रुग्ण असून, अनेक तालुक्यांमध्ये गत काही दिवसांपासून नवीन रुग्ण सापडले नसल्याचे चित्र आहे. 

- संदीप वानखडे लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : आराेग्य विभाग आणि प्रशासनाने केलेल्या प्रयत्नांमुळे जिल्ह्यातून काेराेना परतीच्या मार्गावर असल्याचे दिलासादायक चित्र आहे. जिल्ह्यात साेमवारी केवळ १६ सक्रिय रुग्ण असून, अनेक तालुक्यांमध्ये गत काही दिवसांपासून नवीन रुग्ण सापडले नसल्याचे चित्र आहे. जिल्ह्यात दुसऱ्या लाटेची भीषणता आराेग्य विभागासह सर्वसामान्य नागरिकांनी अनुभवली आहे. गत काही दिवसांपासून आराेग्य विभाग आणि प्रशासनाने केलेल्या प्रयत्नांमुळे, तसेच नागरिकांनी नियमांचे पालन केल्याने काेराेनाची दुसरी लाट ओसरत असल्याचे दिलासादायक चित्र आहे. जिल्ह्याचा रिकव्हरी रेट ९९.२१ टक्क्यांवर पाेहोचला आहे, तसेच साेमवारचा पाॅझिटिव्हिटी रेट अवघा ०.५७ टक्के हाेता.  नागरिकांनी यापुढेही नियमांचे पालन केल्यास जिल्हा लवकरच काेराेनामुक्त हाेणार आहे. तिसऱ्या लाटेचा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे. त्यातच रुग्णसंख्या कमी झाल्याने ग्रामीण भागात नियमांचे सर्रास उल्लंघन करण्यात येत आहे,  तसेच फिजिकल डिस्टन्सिंग, वारंवार हात धुणे, मास्कचा वापर करणे आदी बाबींचा सर्वसामान्यांना विसर पडत असल्याचे चित्र आहे. 

आठ तालुक्यांमध्ये प्रत्येकी केवळ एक रुग्ण सक्रिय जिल्ह्यातील १३ तालुक्यांपैकी आठ तालुक्यांमध्ये प्रत्येकी एक रुग्ण सक्रिय आहे, तसेच मलकापूर तालुक्यात एकही रुग्ण नसल्याचे चित्र आहे. एक रुग्ण असलेल्या तालुक्यांमध्ये चिखली, देऊळगाव राजा, लाेणार, खामगाव, शेगाव, संग्रामपूर, नांदुरा, माेताळा आदी तालुक्यांचा समावेश आहे, तसेच बुलडाणा, सिंदखेडराजा आणि जळगाव जामाेद तालुक्यात प्रत्येकी दाेन रुग्ण सक्रिय आहेत. 

 

जिल्ह्यात गत काही दिवसांपासून काेराेना रुग्णांची संख्या कमी हाेत असल्याचे दिलासादायक चित्र आहे. मात्र, जिल्हा काेराेनामुक्त हाेत असल्याचा अंदाज वर्तविणे आता थाेडे घाईचे हाेईल. आणखी आठ दिवस अशीच स्थिती राहिल्यास काेराेनामुक्तीकडे वाटचाल असे म्हणता येईल. काेराेनाची संभाव्य तिसरी लाट पाहता नागरिकांनी नियमांचे पालन करण्याची गरज आहे. -डाॅ. बाळकृष्ण कांबळे,  जिल्हा आराेग्य अधिकारी, बुलडाणा 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याbuldhanaबुलडाणा