शहरं
Join us  
Trending Stories
1
PM मोदींनी याही वर्ल्ड कप ट्रॉफीला स्पर्श केला नाही; जिंकली मने, जाणून घ्या स्पर्श न करण्यामागचे कारण
2
भारतीय महिला ‘वर्ल्ड चॅम्पियन’ कशा बनल्या? अमोल मुझुमदारांनी PM मोदींना सांगितली Untold Story
3
काय म्हणावे याला...! कोलकातामध्ये SIR विरोधात मोर्चा काढला, दुसऱ्याच दिवशी ममता बॅनर्जींनी BLOकडून 'फॉर्म' स्वीकारला...
4
‘वंदे मातरम्’ गीताला 150 वर्षे पूर्ण; देशभरात कार्यक्रमांचे आयोजन, गैर-इस्लामी म्हणत 'या' संघटनेचा विरोध
5
खळबळजनक! कर्ज घेतलं, हुंड्याची प्रत्येक मागणी पूर्ण, तरी...; लेकीचा मृतदेह पाहून बापाचा टाहो
6
IPO उघडण्यापूर्वीच अब्जाधीश बनले 'या' कंपनीचे मालक; किती आहे प्राईज बँड? GMP मध्ये तेजी
7
कार बाजारात खळबळ! हिरो ईलेक्ट्रीक कार लाँच करणार; 'नोव्हस NEX 3' ची पहिली झलक दाखविली...
8
1 डिसेंबरपासून मोबाइल रिचार्ज प्लॅन पुन्हा महागणार, 199 रुपयांचा पॅक किती रुपयांना होणार? मोठा दावा
9
हृदयद्रावक! बॉलिंगनंतर पाणी प्यायला, उलटी होताच बेशुद्ध होऊन खाली पडला, मैदानावरच मृत्यू
10
२.४० कोटींपैकी केवळ ८० लाख लाडक्या बहिणींचे eKYC पूर्ण, १८ नोव्हेंबरपर्यंतची मुदत; पुढे काय?
11
Lenskart IPO: लिस्टिंग गेन मिळेल का, केव्हा होणार शेअरचं अलॉटमेंट? जाणून घ्या तुमच्या प्रत्येक प्रश्नांची उत्तरं
12
"या नाटकाचा अविभाज्य घटक असलेली तू...", प्रिया मराठेच्या आठवणीत पुष्कर श्रोत्रीची भावुक पोस्ट
13
भारत इलेक्ट्रॉनिक्स ते पॉलीकॅब... 'या' ५ स्टॉक्सवर ब्रोकरेज 'बुलिश'; आगामी काळात तगडा परतावा देणार?
14
"काँग्रेस पराभव लपवण्यासाठी खोटे दावे करतेय"; मतचोरीवरून भाजपाचा राहुल गांधींवर हल्लाबोल
15
राहुल गांधींनी जिला 'ब्राझिलियन मॉडेल' म्हटलं, ती निघाली 'पिंकी'? काँग्रेसच्या मत चोरीच्या दाव्यानंतर, चकित करणारा खुलास!
16
इंदुरीकर यांच्या मुलीचा शाही साखरपुडा चर्चेत; एवढा खर्च कशासाठी?, महाराज म्हणाले...
17
"मी तीच रहस्यमयी महिला आहे..."; ब्राझीलच्या मॉडेलने केला भारतासाठी व्हिडिओ प्रसिद्ध 
18
"रस्ते चांगले असतील तर जास्त अपघात होतील"; बस अपघातावर भाजपा खासदाराचं वादग्रस्त विधान
19
Astro Tips: तुमच्या नशिबात प्रेम की धोका, हे कसे ओळखाल? ज्योतिष शास्त्र काय सांगते पाहा!
20
“अजित पवार कायम उप असतात, त्यांना ‘अखंड उप भव’ हा आशीर्वाद”; उद्धव ठाकरेंचा खोचक टोला

पीक नुकसानापोटी बुलडाणा जिल्ह्याला मिळाली  ४८ कोटींची मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2020 11:59 IST

Buldhana Agriculture News बुलडाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ही मदत मिळाल्यामुळे दिलासा मिळाला आहे.

 लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा:  खरीप हंगामात अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील ९४ हजार ५३६ हेक्टरवर झालेल्या शेत पीकांच्या नुकसानापोटी बुलडाणा  जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ४७ कोटी ८९ लाख २८ हजार रुपयांची मदत देण्यात आली असून तहसिलस्तरावर ती वाटपही करण्यात आली आहे. परिणामी दिपोत्सवाच्या ताेंडावर बुलडाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ही मदत मिळाल्यामुळे दिलासा मिळाला आहे.जिल्ह्यात खरीप हंगामात जून, जुलै, ऑगस्ट महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे ३२ हजार ८४७.८५  हेक्टरवरील तर सप्टेंबर महिन्यात ६१ हजार ६८९.२४ हेक्टवरील पिकांचे नुकसान झाले होते. यामध्ये पैनगंगा नदीसह अन्य नदी काठच्या भागातील शेतकऱ्यांची शेत जमीनही खरडून गेली होती. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. जून ते ऑगस्ट महिन्यात ७९ हजार ६५५ शेतकरी तर सप्टेंबर महिन्यात ६४ हजार ७१० शेतकरी असे मिळून १ लाख ४४ हजार ३६५ शेतकऱ्यांच्या खरीपाच्या पिकाचे नुकसान झाले होते. त्यामध्ये पहिल्या टप्प्यात जून ते ऑगस्ट या तीन महिन्यातील शेतकऱ्यांच्या नुकसानाचा आढावा घेण्यात आला होता. त्यानंतर सप्टेंबर महिन्यात झालेल्या नुकसानाचा आढावा घेण्यात आला होता. प्रकरणी राज्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानापोटी सविस्तर आढावा घेण्यात येवून २३ ऑक्टोबर रोजी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत शेतकऱ्यांना नुकसानापोटी मदत देण्यास मान्यता देण्यात आली. जून ते ऑक्टोबर २०२० याकालावधीत झालेल्या अतिवृष्टी व पुरामुळे शेतीपिकांचे व बहुवार्षिक पिकांचे किमान ३३ टक्के नुकसान झाले अशा बाधीत शेतकऱ्यांना शेती पिकांच्या जिरायती व आश्वासीत सिंचनाखाली असलेल्या पिकांच्या नुकसानासाठी दहा हजार रुपये रुपये पर्ती हेक्टर व बहुवार्षिक पिकांसाठी २५ हजार रुपये प्रती हेक्टर या दराने दोन हेक्टर मर्यादेत नुकसान भरपाई देण्याचा निर्णय घेण्यात आला होता.राज्य शासनाच्या १३ मे २०१५ च्या राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून तसेच वाढीव दरानुसार होणारा खर्च राज्य शासनाच्या निधूमधून खर्च करण्यास मान्यता देण्यात आल्यानंतर शेतकऱ्यांना ही मदत देण्यात येत आहे.    आदर्श आचारसंहितेचे पालन करून  हा निधी शेतकऱ्यांना वाटप करण्याच्या सुचना देण्यात आलेल्या आहेत. 

टॅग्स :buldhanaबुलडाणाagricultureशेती