शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाणा जिल्ह्यात २६ दिवसांत ९२९२ जण कोरोनाबाधित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 11:30 IST

Buldhana District Corona Update गेल्या २६ दिवसांत तब्बल ९,२९२ जण कोरोना संक्रमित झाले असून, ३८ जणांचा मृत्यू झाला आहे.

- नीलेश जोशीलोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : मिनी लॉकडाऊन, रात्रीची संचारबंदी, जिल्ह्यातील आठवडी बाजार स्थगित केल्यानंतरही बुलडाणा जिल्ह्यात कोरोनाचे संक्रमण वेगाने होत असून, गेल्या २६ दिवसांत तब्बल ९,२९२ जण कोरोना संक्रमित झाले असून, ३८ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनास आता कोरोना संक्रमण रोखण्यासाठी अधिक गंभीरतेने उपाय योजण्याची गरज निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे गेल्या एक वर्षात कारोनाबाधित आढळून आलेल्यांपैकी तब्बल ३९ टक्के व्यक्ती गेल्या २६ दिवसांत संक्रमित झाल्या आहेत. त्यामुळे प्रशासकीय पातळीवर आता याची गंभीर दखल घेण्याची वेळ आली आहे. दुसरीकडे जिल्ह्यात २० हजारांपेक्षा अधिक नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लसही दिली गेली आहे. यामध्ये आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाईन वर्कस, ज्येष्ठ नागरिक, पोलीस कर्मचारी यांचा समावेश आहे. त्या उपरही जिल्ह्यात कोरोना संक्रमणाचा आलेख हा सातत्याने वाढत आहे. परिणामी प्रशासकीय पातळीवर कॉन्टॅक्ट ट्रेसिंग कितपत वस्तुनिष्ठ होते हा कळीचा मुद्दा बनला आहे.गेल्या १४ फेब्रुवारीपासून जिल्ह्यात कोरोनाच्या चाचण्या वाढल्या आहेत. जसजशा चाचण्या वाढत आहेत तसतसा कोरोना संक्रमणाचा आकडाही फुगत आहे. परिणामी कोरोना प्रतिबंधासाठी लावण्यात आलेले निर्बंध अधिक कडक करण्याची गरज निर्माण झाली आहे. अन्यथा जिल्ह्यात समूह संक्रमणाचा धोका नाकारता येत नाही. गेल्या २६ दिवसांत मृत्यू पावलेले ३८ जण हे ६० पेक्षा अधिक वयाचे आहेत. यातील बहुतांश व्यक्ती या दुर्धर आजाराने ग्रस्त होत्या, असे डेथ ऑडिट समितीमधील एका सदस्याने सांगितले. त्यामुळे दुर्धर आजार असणाऱ्यांना कोरोनाचा धोका अधिक असल्याचे एकंदरीत आकडेवारी सांगते, तसेच आतापर्यंत जिल्ह्यात मृत्यू पावलेल्या २१५ जणांमधील अपवाद वगळता सर्वच जण हे दुर्धर आजाराने ग्रस्त असल्याचे समोर येत आहे. दुसरीकडे जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा २४ हजार १०७ झाला आहे. त्यापैकी ९ हजार २९२ बाधित हे या २६ दिवसांतील आहेत. म्हणजेच आजपर्यंत सापडलेल्या एकूण बाधितांपैकी ३९ टक्के बाधित हे या २६ दिवसांत सापडले आहेत. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याbuldhanaबुलडाणा