शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाणा जिल्ह्यात ६५0 गावात पाणीटंचाईचे सावट!

By admin | Updated: February 22, 2017 02:36 IST

उन्हाळा सुरु होण्याआधीच गंभीर स्थिती

नीलेश शहाकार बुलडाणा, दि. २१- जिल्हा प्रशासनाने २0१६-१७ साठी पाणीटंचाई निवारण आराखडा तयार केला असून जिल्ह्यात ६५0 गावात संभाव्य पाणीटंचाई घोषित केली आहेत.गत वर्षी जिल्ह्यात चांगला पाऊस झाला होता. त्यामुळे बर्‍याच प्रकल्पातील जलपातळीत मोठी वाढ जलसंकट काही प्रमाणात टळले होते. शिवाय ग्रामीण भागात पाणीपुरवठा करणार्‍या टँकरच्या संख्येतही घट झाली. जिल्ह्यात जलसंधारणाच्या कामांमुळे पाणीपातळी वाढविण्यात प्रशासनाला यश आले. मात्र, ऑक्टोबरनंतर अपेक्षीत पाऊस न झाल्याने जलसाठय़ातील पाणीपातळी खालावली आहे. उन्हाळ्यातील संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेता, जिल्हा प्रशासनाने पाणीटंचाई निवारणार्थ आराखडा तयार केला. त्यानुसार ६५0 गावात संभाव्य पाणीटंचाई घोषित करुन उपाययोजना आखण्यात आल्या आहे. देऊळगावराजा, मेहकर, लोणार, सिंदखेडराजा, शेगाव व जळगाव जामोद सहा तालुक्यातील सर्वाधिक गावे पाणीटंचाईग्रस्त घोषित करण्यात आली आहे.योजनांचे काम कासव गतीनेपाणीटंचाई निवारणार्थ प्रशासनाकडून तयार करण्यात आलेला आराखडा ऑक्टोबर २0१६ ते जून २0१७ या कालर्मयादेसाठी तयार करण्यात आला आहे. यात नवीन विंधन विहिरी, कूपनलिका, नळयोजना विशेष दुरुस्ती, विंधन विहिरीची दुरुस्ती या योजनांची अंमलबजावणी ऑक्टोबरपासूनच झाली, तर उन्हाळ्यात निर्माण होणार्‍या पाणीटंचाईशी दोन हात करता येतील. मात्र, या योजनांचे काम कासव गतीने होत असून आतापर्यंत केवळ चार गावांमध्ये योजनांची कामे पूर्ण झाली आहेत.सहा तालुक्यांत सर्वाधिक गावे टंचाईग्रस्त४पाच वर्षांपासून जिल्ह्यातील बरीच गावे कायमस्वरुपी पाणीटंचाईची छळ सोसत आहेत. यावर्षीही देऊळगाव राजा, मेहकर, लोणार, सिंदखेड राजा, शेगाव व जळगाव जामोद या सहा तालुक्यांतील सर्वाधिक गावे पाणीटंचाईग्रस्त घोषित करण्यात आली आहेत.